प्रथम वर्षाचा कीर्तन अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
अ) कीर्तन निरूपण
यामध्ये संपूर्ण किर्तन आणि निरूपण या प्रक्रियेचा समावेश आहे.
ब) कीर्तन गायन
यामध्ये विणेकरी पंचपदी, कीर्तनकाराची पंचपदी, मूळ अभंग गायन आणि कीर्तन प्रमाण चाली यांचा समावेश आहे.
प्रथम वर्षासाठी श्रीमद् भगवद्गीतेचे तीस श्लोक आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली कृत हरिपाठ याचे नऊ अभंग आणि ज्ञानेश्वरीतील काही निवडक ओव्यांचे पाठांतर असा अभ्यासक्रम आहे.
सूचना : आपण हरिकीर्तन प्रबोधिनीत प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर खालील सर्व अभ्यासक्रम पाहू शकता याची नोंद घ्यावी .