ऑनलाइन माध्यमातून महाराष्ट्रभरातील विद्यार्थी कीर्तनाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना कीर्तन प्रक्रियेचे थेट समोरासमोर मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळावे, त्याचप्रमाणे त्यांना कीर्तन सादर करण्याची संधी मिळावी, त्यांच्या पाठांतराची परीक्षा व्हावी, त्यांच्यात सभाधीटपणा निर्माण व्हावा या हेतूने वर्षभरातून दोन वेळा शिबीर घेण्यात येते. या शिबिरात कीर्तनाची आवड असणारा कोणीही व्यक्ती सहभागी होऊ शकतो. त्या सर्वांना शिबीर सहभागाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाते.
शिबिरातील विषय
सत्र १: कीर्तन सादरीकरण पध्दत आणि पायऱ्या
सत्र २: कीर्तन आणि निरुपण आराखडा
सत्र ३: पाठांतर आणि मनन
सत्र ४: कीर्तन आणि अभिनय
सत्र ५: कीर्तन आणि संगीत
सत्र ६: कीर्तनकार पंचपदी व अभंगाच्या चाली
सत्र ७: कीर्तनाचे सप्रयोग सादरीकरण
शिबीर शुल्क
या शुल्कात दोन दिवस व दोन रात्र निवास, पाच चहा, तीन अल्पोपहार, तीन भोजन, प्रशिक्षण आणि व्यवस्थापन खर्च यांचा समावेश आहे.
प्रशिक्षण वर्ग सहभाग आणि कीर्तन सादरीकरण : रु. ५,०००/- मात्र
प्रशिक्षण वर्ग सहभाग : रु. ३,५००/- मात्र
प्रशिक्षण वर्गात सहभागी होणाऱ्या सर्व जणांना कीर्तन सादरीकरणाच्या वेळी पखवाज वादन, हार्मोनियम वादन आणि अभंगाच्या चालीचे गायन यात भाग घेता येतो आणि टाळकरी म्हणून कीर्तनात उभे राहता येते
श्रोता सहभाग : रु. २,५००/- मात्र
श्रोता म्हणून सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जात नाही आणि त्यांना प्रशिक्षण वर्गात सहभागी होता येत नाही. शिबिराच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सत्र ते दुपारी भोजन सुटीपर्यंत प्रशिक्षण वर्ग सुरु असतो.
ज्येष्ठ नागरिकांना विशेष शिबीर शुल्क सवलत
प्रशिक्षण वर्ग सहभाग आणि कीर्तन सादरीकरण : रु. २,५००/- मात्र