श्री गुरुदेव
हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतिला अधिकाधिक महत्व युगाणयुगे दिल गेल आहे. हिंदू संस्कृति साधू संत व समाजातील अनेक लोकानी टिकून ठेवली आहे. विविध सण साजरे करून ही संस्कृति टिकून ठेवली आहे. धार्मिक संस्कार प्रत्येक व्यक्तीवर घडत आले आहे. तसेच घरामध्ये धार्मिक पुजा करून आपल्या पूर्वजानी आपल्या आई वडिलांनी घरामध्ये आध्यात्मिक वातावरण तयार करून ही हिंदू संस्कृति मनापासून जपून ठेवली आहे. सत्यनारायण पुजा ,वास्तु शांती ,गंगा पूजन ,उदकशांती ,गृहप्रवेश ,कुलदेवता अभिषेक अश्या विविध धार्मिक पूजेला हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. म्हणून ही संस्कृति आपणही अशीच जपून ठेवून पुढच्या पिढिला अध्यात्म ,विज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून कस जगायचे ह्या संस्कृति मधून प्रेरणा देवूया...
आपल्या हिंदू धर्मामध्ये सत्यनारायण पुजा अधिकतम घरोघरी केली जाते. सत्यनारायण म्हणजे साक्षात श्री महाविष्णु . घरामध्ये सुख,समाधान,शांती नांदत राहावी. या हेतूने सत्यनारायण पूजन केले जाते.अधिकतम श्रावण महिन्यामध्ये बहुतांश लोक सत्यनारायण पुजा आवर्जून करत असतात.
घर पूर्णपणे बांधून जाल्यावर घरामध्ये वास्तु पुजा करून घराची जबाबदारी वास्तु देवते कडे द्यावी. कारण घराचे पूर्णपणे रक्षण वास्तु देवता करत असते. घराच्या आग्नेय दिशेला वास्तु देवतेची पुजा करून स्थापना करावी. वास्तु पूजे मध्ये गणेश पुजा ,कलश पूजन, स्वस्ति पुण्याहवाचन ,गृहप्रवेश ,षोडशमातृका पूजन ,वास्तुमंडल पूजन ,वास्तु देवता पूजन ,नवग्रह पूजन ,रुद्र देवता पूजन आणि यज्ञ केला जातो. घरामध्ये सुख शांती राहावी, म्हणून वास्तु पुजा करावी. वास्तुशांती फक्त घराचीच केली जाते का ? नाही दुकान ,गोडाऊन ,ऑफिस ,घर सर्वांची वास्तु पुजा केली पाहिजे.
संपर्क -8411984335 /7888066607