तुमची मुलं तुमची मुलं नाहीत. ते जीवनाच्या अभिलाषेचे पुत्र आणि कन्या आहेत. ते तुमच्याद्वारे येतात परंतु तुमच्याकडून नाहीत आणि ते तुमच्यासोबत असले तरी ते तुमच्या मालकीचे नाहीत.
तुम्ही त्यांना तुमचे प्रेम देऊ शकता पण तुमचे विचार नाही कारण त्यांना त्यांचे स्वतःचे विचार आहेत. तुम्ही त्यांच्या शरीरास आश्रय देऊ शकता पण त्यांच्या आत्म्याला नाही, कारण त्यांचे आत्मे उद्याच्या घरात राहतात. ज्याला तुम्ही भेट देऊ शकत नाही, तुमच्या स्वप्नात देखील नाही. तुम्ही त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करू शकता परंतु त्यांना तुमच्यासारखे बनवू नका, कारण आयुष्य मागे जात नाही, किंवा कालच्या दिवसा प्रमाणे थांबत नाही.
तुम्ही धनुष्य आहात ज्यातून तुमची मुले जिवंत बाणांप्रमाणे बाहेर पाठवली जातात. धनुर्धारी अनंत मार्गावरील चिन्ह पाहतो आणि तो तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने वाकवतो, जेणेकरून त्याचे बाण वेगाने आणि दूर जाऊ शकतील. धनुर्धराच्या हातात तुमचे झुकणे आनंदासाठी असू द्या. कारण त्याला जसा उडणारा बाण आवडतो, तसाच तो स्थिर धनुष्यावरही प्रेम करतो.
[ पैगंबर. खलील जिब्रान, १९२३ ]