श्रीगुरुचरित्र (Shri Guru Charitra) हा श्री नृसिंह सरस्वती (१३७८-१४५९) यांच्या जीवनकथेवर आधारित एक प्राचीन पवित्र ग्रंथ आहे, जो १५ व्या-१६ व्या शतकातील कवी श्री सरस्वती गंगाधर यांनी ओवी स्वरूपात (एक मराठी छंद) लिहिला होता. त्यांचे पूर्वज सय्यमदेव यांनी स्वतः गुरु नृसिंहसरस्वती बरोबर वास्तव्य आणि सेवा केली होती. नंतर या पुस्तकाचे संस्कृतमध्ये भाषांतर श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांनी केले, जे सुमारे शंभर वर्षांपूर्वी जगले होते आणि अनेकांनी त्यांना भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले होते. काही वर्षांपूर्वीपर्यंत, हे पुस्तक फक्त मराठी आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध होते. अलीकडे, तेलुगु भाषांतरे तसेच इंग्रजी आवृत्ती उपलब्ध झाली आहेत. इंग्रजी आवृत्ती ही मूळ गुरु चरित्राची नवीन अनुवादित आणि संक्षिप्त आवृत्ती आहे.
या आठवड्यासाठी व्हिडिओरूपी स्वामी संदेश- स्वामी समर्थ प्रकट दिन
By Raja Ravi Varma Indian painter from Kerala (1848–1906), Public Domain, Link
हा ग्रंथ लिहिण्यामागे श्रीनृसिंहसरस्वती स्वामींची प्रेरणा होती. म्हणून हा ग्रंथ 'वरदमंत्र' ठरला आहे. या ग्रंथाला 'भक्तकामकल्पतरू' असा वर देण्यात आला आहे. कित्येक वेळा श्रीगुरुचरित्राला 'श्रीगुरुचरित्र कामधेनू' असे म्हटले जाते.
दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ ‘श्री गुरुचरित्र (Shri Gurucharitra)’ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘श्री गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.
सांप्रदायिकामध्ये श्रीगुरुचरित्राचे महत्त्व मोठे आहे. मंत्रशास्त्र आणि योग या दृष्टींनीसुद्धा श्रीगुरुचरित्राची योग्यता मोठी असल्याने श्रीगुरुचरित्राची पारायणे घरोघर होतात. श्रीगुरुचरित्र (Shrigurucharitra) हा ग्रंथ भक्तिरसाने ओथंबलेला आहे. ज्ञानपूर्वक भक्तियुक्त असे स्वकर्म आचरण सांगितले आहे. ऐहिक जीवनाचा योग्य उपभोग घेऊन मुक्ती मिळविता येते असे हा ग्रंथ सांगतो.
#gurucharitra #guru-dattatreya #gurudevdatta #shri-guru-charitra #श्री-गुरुचरित्र-पारायण #गुरुचरित्र-मराठी #श्रीगुरुचरित्र-अध्याय-१-ते-५३ #gurucharitra-parayan
चला,अलौकिक आणि अविनाशी आनंदाचा खजिना मिळवू या.
ही सर्व श्रीगुरूंची प्रेरणा, मी फक्त निमित्त...
कृपया खालीलपैकी कोणत्याही मेनूला टच करा,आपल्याला संबंधित माहिती पाहण्यास मिळेल...
श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे आचरण कसे ठेवावे ह्याच्या संदर्भात बहुमुल्य मार्गदर्शन केलेले आहे.
औदुंबर, नरसोबावाडी, गाणगापूर, कारंजा, कुरवपूर, पीठापूर इ. दत्तक्षेत्रात, सत्पुरुषांच्या समाधी स्थानावर किंवा औदुंबराच्या वृक्षाच्या खाली श्रीगुरुचरित्राचे वाचन केल्यास अतींद्रिय अनुभव येतात.
व्याधींनी जर्जर झालेले लोक श्रीदत्तस्थानाला जातात. श्रीदत्ताचे दर्शन घेऊन आपल्या व्यथा दत्तचरणी व्यक्त करतात. सर्व अंगाला भस्म लावतात व संगमस्थानी श्रीगुरुदत्तचरित्राचे पारायण करतात. अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालतात. यामधून भक्ताला दृष्टांत होतात. संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो.
विशेषतः औदुंबरवृक्षाखाली बसून केलेले पारायण विशेष फळ देते.
हे शक्य नसेल तर घरातही पारायण करता येते. प्रत्यक्ष पारायण सुरू करताना घरामध्ये शांत आणि प्रसन्न वातावरण असावे. श्रीगुरुचरित्राचे पारायण ज्यांच्या घरी चालू असते, त्यांच्या घरी दत्तमहाराज फेरी मारून जातात. त्या वेळी दत्तभक्ताला वेगळा सुगंध जाणवतो.
प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात / घरात काही ना काही संकट, अडचणी, त्रास, आजारपण असतात ज्यांचे निराकरण होणे बर्याचदा कठीण असते अश्यावेळी आपल्या मनातले भाव व्यक्त करून त्याचे निराकरण व्हावे हा भाव ठेऊन प्रार्थना करणे, लहान मुलांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे आईला जसे समजते तसेच आपल्या भक्तासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे परमेश्वराला माहिती असते, आपण फक्त संकल्प स्वरुपात परमेश्वरासमोर मांडायचे आणि साप्ताहाचे नियम असतील त्या प्रमाणे आचरण करत आपले चित्त परमेश्वराकडे वळवणे म्हणजेच पारायण.
नियमीत पारायण केल्यास आपल्या अडचणी कमी होत जाऊन दूर होतात तसेच घरातले वातावरण देखील शुद्ध, आनंदमयी होते.
अंतःकरण पवित्र ठेवून गुरुचरित्राचे केव्हाही व कितीही वाचन केले, तरीसुद्धा गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात. ज्या लोकांना ७ दिवसांत पारायण करावयाचे असेल, त्यांनी शुभ दिन, शुभ नक्षत्र पाहून त्या दिवशी गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी.
वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. ग्रंथात वाचन / पारायण तीन प्रकारे करता येईल, असे सरस्वती गंगाधर यांनी नमूद केले आहे.
॥ श्री गुरुचरित्र ॥ हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. स्त्रियांनी श्रीगुरुचरित्र वाचावे की नाही ह्या बाबतीत अनेकांचे मतभेद आहेत.
पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते.