जसं ० ते ९ आकडे वापरुन तयार झालेल्या संख्या प्रणालीला आपण दशमान संख्या प्रणाली म्हणतो; त्याच प्रमाणे 'क्ष'मान, ही संज्ञा ० ते 'क्ष' अंक वापरुन बनलेली संख्या प्रणाली सुचवते.
इथे आपण क्ष=० किंवा क्ष=१ नाही वापरू शकत; पण २ पासुन पुढच्या कोणतीही किंमत आपण क्ष म्हणून वापरू शकतो.
द्विमान १०१ = अष्टमान ५ = दशमान ५
द्विमान १०० = अष्टमान ४ = दशमान ४
द्विमान १००१ = अष्टमान ११ = दशमान ९
द्विमान १०००००० = अष्टमान १०० = दशमान ६४
वरील उदाहरणात दिसून येतं की, कोणतीही संख्या मांडण्यासाठी द्विमान संख्या प्रणाली मध्ये अष्टमान संख्या प्रणालीपेक्षा जास्त जागा लागते. त्याच पद्धतीने कोणतीही संख्या मांडण्यासाठी अष्टमान संख्या प्रणाली मध्ये दशमान संख्या प्रणालीपेक्षा जास्त जागा लागते.
यालाच पुढे असेही म्हणता येईल की दशमानपेक्षा जास्त अंक असणाऱ्या संख्या प्रणाली दशमानपेक्षा कमी जागा घेतात.
hexadecimal संख्या प्रणाली प्रमाणे, गणकयंत्रातील इतर संख्या प्रणाली ०, १, २...., ९, A, B, ..., Y, Z, a, b, ... y, z वापरत आहे.