निवासी नायब तहसीलदार
मा. श्री. एम. जी. शिंदे
तहसील कार्यालय, धाराशिव
नायब तहसीलदार (महसूल)
मा. कु. विशाखा अविनाश बलकवडे
तहसील कार्यालय, धाराशिव
नायब तहसीलदार (निवडणूक)
मा. श्री. घृष्णेश्वर शिवानंद स्वामी
नायब तहसीलदार कार्यालय, धाराशिव
नायब तहसीलदार (पुरवठा)
मा. श्री. अमोल बाहेकर
तहसील कार्यालय, धाराशिव
QR Code Digital Library जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर प्रकाशित झाली आहे!
Click and Join Follow the तहसिल कार्यालय धाराशिव channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vb5X9wfHFxP4XVGxx63r
धाराशिव तहसील कार्यालयात डिजिटल QR Code + AI लायब्ररीचे उद्घाटन
धाराशिव, २६ एप्रिल २०२५ – धाराशिव तहसील कार्यालयाने एक अभिनव पाऊल उचलत QR Code + AI तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल लायब्ररी स्थापन केली आहे.
सात कलमी कृती कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून ही लायब्ररी विकसित करण्यात आली.
लायब्ररीचे उद्घाटन मा. श्रीमती शोभा जाधव (निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव) आणि मा. डॉ. मृणाल जाधव (तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, धाराशिव) यांच्या हस्ते झाले.
या उपक्रमाचे मुख्य प्रेरणास्थान मा. श्री. कीर्ती किरण पुजार (जिल्हाधिकारी, धाराशिव) आहेत.
ही डिजिटल लायब्ररी MyGov Campus Ambassador व अभियंता श्री. डी. बी. सलगर यांच्या संकल्पनेतून साकारली असून, नागरिकांना डिजिटल वाचनाची सुविधा मोफत उपलब्ध झाली आहे.
लायब्ररीतील प्रमुख सुविधा:
✅ 46+ मराठी, हिंदी, इंग्रजी ई-वृत्तपत्रे वाचन
✅ सायबर सिक्युरिटी ब्लॉग व 'सायबर सिक्युर वॉल' (QR Code आधारित माहिती)
✅ महसूल विषयक ई-बुक्स व प्रसिद्ध लेखक श्री. मोहसिन शेख यांच्या लेखनसंग्रह
✅ 5000+ ई-बुक्स (कथा, कादंबऱ्या, इतिहास, धार्मिक, विनोद व प्रवासवर्णन साहित्य)
✅ MPSC/UPSC तयारीसाठी मोफत अभ्यास साहित्य, क्लासेस, टेस्ट सिरीज, चालू घडामोडी
✅ शासकीय नोकरीसंबंधी ई-सरकारी माहिती
कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. डॉ. मृणाल जाधव (तहसीलदार धाराशिव) यांनी अभिनंदन व्यक्त करत म्हटले, "ही डिजिटल लायब्ररी तहसील कार्यालयातील नागरिकांसाठी माहितीचा अमूल्य स्रोत ठरेल."