नमस्कार,
आय आय टी (मुंबई) पगारदार कामगारांची सहकारी पतपेढी च्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.
आयआयटी (मुंबई) कामगारांची सहकारी पतपेढी ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत पतसंस्था आहे.
१९७६ मध्ये तत्कालीन कामगार व प्राध्यापक यांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने आर्थिक प्रगती व उत्कर्ष साधण्याच्या हेतुने या सोसायटीची स्थापना केली.
सहकारातुन ऊत्कर्ष या बोधवाक्याला अनुसरुन, मागील ४८ वर्षात संस्थेने प्रगतीची अनेक शिखरे गाठली आहेत. आयआयटी आस्थापनातील सर्व कायम (Permanent) कर्मचारी/अधिकारी/ प्राध्यापक वर्ग या संस्थेचे नियमित सभासद बनु शकतात. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व तीन वर्षाच्या कालावधीसाठी ज्यांची स्केलवर नेमणुक झाली आहे अथवा परिविक्षा (Probation) कालावधी मध्ये असणारे कर्मचारी ब वर्ग सभासद बनु शकतात.
सध्या साधारण ९०० नियमित सभासद असुन १३० नाममात्र सभासद (ब वर्ग) आहेत.
संस्थेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम असुन मागील १४ वर्षापासुन सतत लेखा परिक्षणामध्ये ‘अ’ वर्ग मिळाला असुन सध्या संस्थेची उलाढाल सुमारे ३५ करोडपर्यंत आहे.
आपल्या आर्थिक गरजा पुर्ण करण्यासाठी व बचतीची सवय लावण्यासाठी आजच संस्थेचे सभासद व्हा.
आम्ही ठेवींवर अतिशय आकर्षक व्याज दर देत आहोत. तसेच कमी दरात सुलभ पध्दतीने कर्ज देखील देत आहोत.
सभासद बनण्यासाठी / कर्ज घेण्यासाठी/ ठेवी ठेवण्यासंदर्भात कोणतीही अधिक माहिती साठी आजच संपर्क करा.
Namaskar,
Welcome to IIT (Mumbai) Employees Co-Operative Credit Society Website.
IIT (Mumbai) Employees Co-operative Credit Society Limited is registered under Maharashtra Co-operative Society Act 1960.
It’s a 48-year-old credit society, incorporated by the then staff/faculty of our institute in 1976.
Currently, it has ~900 members (Permanent staff/faculty members) and ~130 nominal members (retired members).
Following our motto of progress through Co-operation, the organization has achieved many pinnacles of progress in the last 48 years.
All permanent employees/officers/faculty working in IIT Bombay can become regular members of this organization. Also, retired employees and employees who have been appointed on the scale for three years or on probation can become Class B members.
Currently We have ~900 regular members and ~130 ‘B Class’ members
We offer various attractive loans and also accept fixed deposits at the most attractive rates compared to other banks and societies.
The Director is the Ex-officio President of the Credit society, and its administration is handled by the Director board, elected as represented by its members.
For any query regarding fixed deposit/loan/ membership, please visit the contact section on this website, or please feel free to drop an email at creditsociety@iitb.ac.in.
We are happy to serve you!