Welcome to MVP Samaj's Commerce, Management & Computer Science (C.M.C.S.) College central Library.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वाणिज्य, व्यवस्थापन आणि संगणक शास्त्र (सी.एम.सी.एस.) महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. विनायक गोवीलकर यांच्या हस्ते कै. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी त्यांच्यामध्ये पुस्तके वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालय विभागाच्या वतीने पुस्तकांवर चर्चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकावर चर्चा करण्यास प्रोत्साहीत करण्यात आले . यावेळी तीन दिवशीय ग्रंथप्रदर्शन आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवीद्रकुमार पाटील यांच्या हस्ते या उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी संगणक विभागप्रमुख प्रा. डि. ड्ब्ल्यू. आहेर, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. विभावरी पाटील. महाविद्यालयाचे ग्रंथपाल व कार्यक्रमाचे संयोजक श्री. आनंदा जाधव , प्रा. यु. व्ही. चौधरी, प्रा. रुपाली वाघ, प्रा. अमित मोगल, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वाचन हे अष्टावधानी असणे आवश्यक आहे. :- अर्थतज्ञ, प्राचार्य. डॉ. विनायक गोविलकर
आपला व्यवहार आणि आपण करत असलेला दैनंदिन अभ्यास यातून आपले विकसित होणारे अनुभवक्षेत्र तसे पाहता मर्यादित असते ते अधिक व्यापक करण्याचे काम ग्रंथ करीत असतात. वाचनाचे उद्दिष्ठ काय? वाचन कशासाठी? हा विचार करतांना `इच्छा आणि गरज’ ‘बुध्दची भूक व मनाची भूक’ यातील फरक समजणे आवश्यक आहे.बुध्दी कार्यप्रवण नसते तर भावना कार्यप्रवण असते. विचार, भावना, वर्तन जेव्हा एकत्रित येतात तेव्हा वाचनाने ज्ञानप्राप्ती होते . ज्ञानप्राप्ती हे मुलभूत उद्दिष्ठ असले तरी ते पुरेसे नाही असेही ते म्हणाले कारण वाचन केले जात असतांना वाचन हे मनापासून असणे आवश्यक आहे. मनामध्ये आनंदतरंग, भावतरंग येत असतील तर तर त्या वाचकाला ज्ञानप्राप्ती होऊन अनुभूती प्राप्त होते. ही अनुभुती म्हणजेच अष्टावधानी वाचन होय.यासाठी वाचन हे अष्टावधानी असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन अर्थतज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले.
मविप्र समाजाचे ऍड. नामदेवराव माधवराव ठाकरे वाणिज्य, व्यवस्थापन, आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात भारताचे माझी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती प्रंसगी वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कलाम यांच्या आयुष्यातील व्यक्तीगत आणि व्यावसायिक संघर्ष, अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशुल, नाग या क्षेपणास्त्रांची जडणघडण, स्वतंत्र भारताचे तंत्रज्ञान , जागतिक शस्त्रस्पर्धा आणि विज्ञान, आपल्या देशाचा विकास कशा पध्दतीने व्हावा या बाबतची संकल्पना, तिला दिलेले मूर्त स्वरुप याविषयी सविस्तर विवेचन केले.
अध्यक्षीय मनोगतात महविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवीद्रकुमार पाटील यांनी ज्ञानसंपन्न व माहिती समृध्द समाज घडविण्यासाठी विद्यार्थी हा महत्वाचा घटक आहे. त्यासाठी वाचनसंस्कृतीचा प्रचार , प्रसार व विकास हा विद्यार्थ्यामध्ये रुजविणे आवश्यक आहे. त्यांचा व्यक्तीमत्व विकास आणि एकूणच जीवनातील यशासाठी मजबूत आधार निर्माण करण्याचे कार्य वाचनाद्वारे होणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. विभावरी पाटील यांनी केले. त्यांनी डॅा.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत वाचनाचे महत्व विषद केले.
यावेळी ग्रंथालय विभागाच्यावतीने 3 दिवसीय ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक–ग्रंथपाल आनंद जाधव यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर उपप्रचार्य प्रा.ज्ञानेश आहेर उपस्थित होते. कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रुपाली वाघचौरे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. सरोज दिक्षा यांनी केले.
15 ऑक्टोबर 2022
‘लक्ष प्राप्तीसाठी वाचन आवश्यक’
(मविप्र सी.एम.सी.एस महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन )
‘डॉ.कलाम यांच्या जीवनावरील सर्व भाषेतील पुस्तकांच्या संग्रहाचे उद्घाटन’
ठरवलेले लक्ष्य कसे गाठायचे यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या साहित्याचे वाचन विद्यार्थ्यांनी करावे.स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे ते स्पदंन आहे. विज्ञानाची व देश स्वयंपुर्ण होण्यासाठी त्यांनी केलेलेल्या संघर्षाची कहाणी आहे. असे प्रतिपादन सकाळ मिडिया यिनचे विभागीय अधिकारी गणेश जगदाळे यांनी केले. मविप्र समाजाचे अॅड नामदेवराव माधवराव ठाकरे वाणिज्य, व्यवस्थापन, आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती प्रंसगी वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माहाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.मधुकर शेलार, आयक्युएसी समन्वयक प्रा.अमित मोगल, प्रा. हरिशचंद्र खांडबहाले, ग्रंथपाल आनंदा जाधव. प्रा.विभावरी पाटील, प्रा.संदिप रायते उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, डॉ.कलाम यांच्या व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्यातील संघर्ष, विज्ञान, देशाचा विकासाची संकल्पना, तिला दिलेले मूर्त स्वरुप यातून त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग. जीवनात कीतीही संकटे आली तरी त्या संकटांशी सामना करण्याचे सामर्थ्य. योग्य निर्णय घेऊन सर्व बंधने दुर करुन यश कसे प्राप्त करावयाचे ही प्रेरणा त्यांच्या पुस्तकांतून, वाचन साहित्यातून मिळणार आहे.
सुरवातीस मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ.अजित मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कलाम यांनी व्यक्तीगत लिहलेले ग्रंथ, त्यांच्या जीवानावरील आधारित, संपादित व अनुवादित झालेले सर्व भाषेतील ग्रंथसंग्रहाच्या प्रदर्शनाचे आयोजन यावेळी करण्यात आले. या पुस्तकांचा महाविद्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापनाही करण्यात आली.
प्राचार्य डॉ.मधुकर शेलार अध्यक्षीय मनोगतातून मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल एैवजी पुस्तक असणे आवश्यक आहे. मोबाईलमुळे अप्रत्यक्ष संपर्क साधता येतो. परंतु वाचनसंस्कृती पासून दुर गेलल्या मनांना एकत्र आणण्याचे काम ग्रंथालये, पुस्तके आणि त्यामार्फत होणा-या वाचनसंस्कारामार्फतच होणार आहे. वाचनसंस्कृतीचा प्रचार, प्रसार विकासासाठी व अभ्यासासाठी संदर्भग्रंथांचा उपयोग करून व्यक्तीमत्व विकास, यशासाठी मजबूत आधार निर्माण करा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल आनंद जाधव यांनी केले. त्यांनी डॉ.ए.पी जे. अब्दूल कलाम यांच्या आठवणींना उजाळा देऊन वाचनाचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी पाटील यांनी केले.आभार प्रा.संदिप रायते यांनी मानले.कार्यक्रमास सर्व विद्यार्थी,विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग उपस्थित होता.