धनंजय महाराज मोरे' यांचा जन्म १८/०७/१९७४ ला मांगवाडी (मंगलवाडी) ता. रिसोड जिल्हा वाशिम (विदर्भ) येथे वारकरी घराण्यात विश्वासराव रामराव मोरे यांच्या पोटी एकूण ६ भावंडा पैकी ३ ऱ्या नंबर ला झाला. मांगवाडी हे गांव रामायणातील शबरीचे गुरु मातंग /मतंग ऋषी चे ठिकाण म्हणून मानण्यात येते. गावामध्ये हनुमंताचे मंदिर असून तेथे दररोज सकाळी ५ ते ६ काकडा ६:१५ ला आरती व सायंकाळी हरिपाठ म्हटला जातो. दर पंधरा दिवसाला एकादशीचा जागर व सकाळी अन्नदान व्दादशी चे पारणे होते.
अश्या मांगवाडी गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्म गांवी मांगवाडी ([[मंगलवाडी]]) येथे झाले.
अनुक्रमणिका [लपवा]
आणि १९८६ ला श्री वै. सोपानकाका टाले खुडज कर यांच्या गावी खुडज ता. सेनगाव जिल्हा हिंगोली येथे वारकरी शिबीर झाले त्यात १ एक महिना वारकरी संप्रदायाची दिशा समजण्यास वाव मिळाला.
पुढे १९८९ ला श्री वै. सोपानकाका टाले खुडज कर यांच्या सांगण्यावरून कार्तिक महिन्यात आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा यात्रेत वडील विश्वासराव रामराव मोरे यांनी गावचे लोक श्रीराम जाधव साहेब, लक्ष्मण पौळ इत्यादी सोबत आळंदी येथे वारकरी सांप्रदायिक शिक्षणासाठी पाठविले.
आळंदी येथे वै. गुरुवर्य विठ्ठल बाबा देशमुख यांच्या कडे विनामुल्य राहण्याची सोय श्री वै. सोपानकाका टाले खुडजकर यांनी करून दिली.अश्याप्रकारे १९८९ ला आळंदी येथे वारकरी सांप्रदायिक शिक्षण सुरु झाले.
गुरु जवळ असताना अनेक गुरुबंधूंचा सहवास प्राप्त झाला.
आळंदी येथे वै. गुरुवर्य विठ्ठल बाबा देशमुख यांच्या कडे राहत असताना गुरु गृही अनेक प्रकारची सेवा केली, जास्व, झाडांना पाणी देणे, धर्मशाळेची झाडझूड करणे, गुरूंचे कपडे धुणे, गुरूंचे अंग दाबने, गुरुसाठी भोजन बनविणे, आलेल्या अतिथींची अन्न पाण्याची व्यवस्था करणे, इत्यादी कामे गुरूगृही करत असताना मृदंगाच्या शिक्षणासाठी वै. गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्द यांच्याकडे रितशीर (वर्ग) क्लास लावून मृदंगाचे विधिवत शिक्षण १९९० ते १९९२ पर्यंत केले.
त्या नंतर वारकरी शिक्षण संस्था (जोग महाराज) यांच्या संस्थेत १९९२ प्रवेश परीक्षा १०० पैकी ९७ मार्क घेऊन पास झाले. आणि याप्रमाणे संस्थेचा अभ्यास सुरु झाला.१९९३ ला वारकरी शिक्षण संस्थेचा अमृत महोत्सव आळंदीला फार मोठ्या उत्साहात संपन्न झाला तेथे सुद्धा सक्रीय सेवा केली.
आळंदी येथे वै. गुरुवर्य विठ्ठल बाबा देशमुख यांच्या कडे राहत असताना १९९२ ला पहिल्यांदा तीर्थयात्रा करण्याचा योग आला.
धनंजय महाराज मोरे यांनी वारकरी संत साहित्य व प्राचीन हिंदू धार्मिक साहित्य इंटरनेट (महाजालावर) शुद्ध स्वरुपात देण्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे.
त्यासाठी त्यांनी काही अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार केले आहेत. त्याची यादी.
कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खालील रकान्यात येथून डाऊनलोड करा या शब्दावर क्लिक करा.
आणि बघण्यासाठी विस्तार शब्दावर क्लिक करा.
धनंजय महाराज मोरे यांनी सन २००६ च्या जेष्ठ महिन्यात आळंदी वारी (आळंदी ते पंढरपूर) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात नवीन दिंडी गावकरी मंडळी कहाकर (बु.) जिरे ता. सेनगांव जिल्हा हिंगोली येथील ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने दिंडी चालू केली.
मौजे कहाकर (बु.) जिरे येथील ग्रामदैवत कर्णेश्वर भगवंताच्या आशिर्वादाने दिंडीचे पहिले वर्ष फार छान पार पडले. दिंडी मध्ये अनेक लोकांनी भरपूर सहकार्य केले, अगदी कांदा, लसूण,मसाला, सरपण (इंधन/जळतण) भांडी, नवीन तंबू (पाल/राहुटी) टाळ, मृदंग इत्यादी साहित्य कहाकर (बु.) जिरे येथील गांवकरी मंडळी यांनी पुरविली.
या विशेष सहकार्या मध्ये दत्तराव भोणे, सीताराम वानखेडे, बाबुराव पोपळघट, दत्तात्रय आरसोडे, गजानन आरसोडे, लक्ष्मण मानदार, भगवान मानदार, विठ्ठल मानदार, हरिभाऊ पोपळघट, शिवाजी पोपळघट, उद्धव पायघन, उद्धव पोपळघट, दत्तराव नागुलकर, विनायकराव पाटील पोपळघट, विजय पाटील पोपळघट, अरुण पाटील, अशोक पाटील, विठ्ठल शावकार, नारायण शावकार, मधुकर हरीमकर, विठ्ठल मिस्त्री खोंडकर,
धनंजय_महाराज_मोरे.jpg
m सॉफ्टवेअर तपशील[विस्तार]