ASSM COMPETITIVE EXAM CENTER

AMDAR SHASHIKANT SHINDE MAHAVIDYALAY, MEDHA

Competitive Exam Center,MEDHA

उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः या ध्येयाने प्रेरित जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय स्पर्धा परीक्षा केंद्र उत्तम प्रकारे कार्यरत आहे. महाविद्यालयाच्या ग्रंथालय व ज्ञान स्त्रोत केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व पुस्तके तसेच नियतकालिके घेतली जात आहेत तसेच विद्यार्थ्यांना नकाशे व ई-साहित्य उपलब्ध करून दिले जात आहेत. स्पर्धा परीक्षा केंद्रा कडून ऑनलाइन सुविधा दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना वेबसाईट, ब्लॉग , फेसबुक पेज, व्हाट्सअप तसेच टेलिग्राम च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेस आवश्यक असणारी अद्यावत माहिती पुरविण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षेची कुठून सुरुवात करायची? तयारी कशी करावी? वेळेचे नियोजन कसे करावे? मी करू शकतो का? आणि महत्त्वाचे म्हणजे, कोणती माहिती संसाधने वापरायची? असे अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात येतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रा कडून प्रयत्न केला जात आहे. "कठोर परिश्रम केल्यामुळेच कार्य सफल होते फक्त विचार करून चालत नाही त्यामुळे यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही विद्यार्थ्यानी फोकस ठेऊन अभ्यास करून त्यांचे उद्दिष्ट साध्य करू शकतात. विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सातत्याने प्रयत्न करत आहे. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि अभ्यासातील सातत्य असेल तर कोणतीही परीक्षा पात्र होणे सहज शक्य असते. KNOWLEDGE IS POWER या उक्ती प्रमाणे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करावे व यशस्वी व्हावे त्यांचा यशाच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

Competitive Exam Center Committee

SR.NO.

NAME

Designation


1, PRIN.MAJOR DR. GIRI ASHOK V. Chairman

2. DR. NAGARKAR SUDHIR R. Coordinator

3 DR. GHATAGE PRAMOD R. Member

4. SHRI. CHAVAN PRAMOD R. Member

5. DR. SHINDE SANGRAM Y. Member

6 SHRI. GEJAGE SHANKAR N. Member

7. SMT. JADHAV GAYATRI P. Member

8. SHRI.DESAI AMAY A. Member

9. DR.NALAWADE SANGRAMSING V. Member

10.DR. KALE DNYANDEO S. Member

11.SHRI. KEMDARNE SUNIL G. Member

12.DR PAWAR UDAY S. Member

13.SHRI. PATIL PANDURANG D. Member

14.DR.YADAV OMKAR V. Member

15. SMT. DESHMUKH DHANASHRI V. Member

Ø आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे वाचन प्रेरणा दिन निमित्त 'स्पर्धा परीक्षेचे महत्त्व आणि ग्रंथाला चा वापर' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

मेढा /दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रंथालयाकडून ग्रंथ प्रदर्शन तसेच भित्तिपत्रिकेचे उद्घाटन व वाचन कट्टा उपक्रम घेण्यात आले. तसेच 'स्पर्धा परीक्षेचे महत्त्व आणि ग्रंथाला चा वापर' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक डॉ. सुधीर नगरकर यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व त्याचा उद्देश सांगितला. प्रमुख पाहुणे प्रा. दिनेश ताठे युनिक अकॅडमी, पुणे यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना वाचन का केले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी ? का करावी? कधीपासून करावी? नेमके काय केले पाहिजे असे बहुमूल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी हे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात वाचाल तर वाचाल हा संदेश दिला. जावळी तालुका हा माताडीं च्या तालुका ऐवजी अधिकाऱ्यांचा तालुका कसा होईल यासाठी स्वतःपासून सुरुवात करा विद्यार्थी दशेत ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश हे नक्की मिळते असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी पाहुण्यांचा परिचय प्रा. Prakash Jawal यांनी केला तसेच आभार प्रदर्शन डॉ. Sarang Shinde यांनी केले. याप्रसंगी शिक्षकेतर कर्मचारी वसंत धनवडे आबासाहेब देशमुख व अविनाश मदने यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा लाभ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला.

https://youtu.be/otj4T4dGYh8

Ø आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात नॅशनल वेबिनार संपन्न

मेढा/ दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी जागतिक पुस्तक दिना निमित्त, द युनिक अकॅडमी पुणे व आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने "स्पर्धा परीक्षेतील अभ्यास तंत्रे आणि ग्रंथालयाचा वापर" या विषयावर नॅशनल वेबिनार संपन्न झाले. सूत्रसंचालन वेबीनार चे समन्वयक डॉ. सुधीर नगरकर यांनी केले तसेच प्रास्ताविकात विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना वापरली जाणारी अभ्यास तंत्रे कोणती, ग्रंथालयाच्या वापर या वेबीनारचा उद्देश सांगितला.

प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते प्रा. कैलास भालेकर, द युनिक अकॅडमी, पुणे यांनी आपल्या व्याख्यानात वाचनाचे महत्व, ग्रंथालयाचे महत्व, वाचनाचे स्पीड, वाचनाची आवड, संदर्भ ग्रंथांचा नेमका कसा वापर करावयाचा, वर्तमान पत्राचे वाचन करून प्रचलित घडामोडींचा अभ्यास कसा करायचा, असे स्पर्धा परीक्षांविषयी इतंभूत मार्गदर्शन केले. या वेबिनार च्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे हे होते, त्यांनी आपल्या मार्गदर्शनात 'वाचाल तर वाचाल' हा संदेश दिला. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल च्या युगामध्ये सुद्धा वाचन अभिरुची टिकून आहे . मात्र स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा योग्य वापर करून आपल्या अभ्यास तंत्रांमध्ये सुधारणा करुन आपले करिअर घडवावे असे मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक यांचा परिचय प्रा. प्रकाश जवळ यांनी केला तसेच प्रा. शंकर गेजगे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मा. श्री चंद्रकांत खराटे सर तसेच युनिक अकॅडमी तील टेक्निकल टीम यांची मदत झाली. तसेच डॉ. ओंकार यादव, प्रा. पी डी पाटिल व प्रा. आमेय देसाई यांची व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या वेबिनार चा लाभ महाराष्ट्रातील 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घेतला

YOUTUBE LINK : https://youtu.be/YF72WjcstxU

Figure 1 प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते प्रा. कैलास भालेकर, द युनिक अकॅडमी, पुणे यांचे व्याख्यान

Ø अपयशाला न घाबरता सतत प्रयत्नवादी रहा यश तुमचेच आहे! आमदार आमदार शशिकांत शिंदे साहेब

'द युनिक अकॅडमी'च्या सहकार्याने, जयवंत प्रतिष्ठान, हुमगांव संचालित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा आणि आमदार शशिकांत शिंदे स्पर्धा परीक्षा केंद्र, कोरेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ६ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजता STATE LEVEL WEBINAR ON MPSC-UPSC / PSI-STI-ASO व इतरही सर्व 'स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी' या विषयांवर ऑनलाईन माध्यमाद्वारे मोफत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. या वेबिनार साठी प्रमुख उपस्थिती : आदरणीय आमदार शशिकांत शिंदे साहेब होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अपयशाला खचून न जाता सतत प्रयत्नवादी राहून अभ्यास केला तर नक्कीच यश मिळेल.जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य असेल तर सातारा जिल्ह्यातील अनेक अधिकारी यांचा सत्कार करण्याचे भाग्य आम्हास मिळेल असे सांगितले तसेच आदरणीय सौ. वैशाली शिंदे (सचिव,जयवंत प्रतिष्ठान) यांनी कोरेगाव येथे स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका उपलब्ध करून दिलेली आहे.त्यामध्ये अनेक होतकरू गरीब विद्यार्थी अभ्यास करून नक्कीच यश मिळवतील अशा शुभेच्छा दिल्या.

सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. तेजस दादा शिंदे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी अनेक वेबिनार, व्याख्याने आयोजित करण्यासाठी सर्वोतपरी मदत करीन असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

'स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक हर्षल लवंगारे ( प्राद्यापक, 'द युनिक अकॅडमी, पुणे) हे होते. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, त्याचे स्वरूप, स्पर्धा परीक्षेविषयी इत्थंभूत माहिती सांगितली.

प्रस्ताविक मा. प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे सर यांनी केले त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला व विद्यार्थ्यांना पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. द युनिक अकॅडमी यांच्या वतीने प्रास्ताविक चंद्रकांत खराटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन महाविद्यालयाचे स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ. सुधीर नगरकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ. गणेश होळ यांनी केले . या स्टेट लेवल वेबिनार चा महाराष्ट्रातून एकूण 800 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

YOUTUBE LINK : https://youtu.be/Cz8J26gKbA0

Figure 2 स्टेट लेवल वेबिणार मध्ये मार्गदर्शन करताना आमदार आमदार शशिकांत शिंदे साहेब

Ø स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

दि.१४ ऑगस्ट 2018 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रथम ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते डॉ.एस.आर.रंगनाथन याच्या जयंती निमित्त ग्रंथपाल दिन साजरा केला जातो त्यावेळी प्रमुख पाहुणे - मार्गदर्शक DySP वाई येथील मा.श्री. अजित टिके साहेब यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले त्याच बरोबर वृक्षास पाणी घालून मान्यवराच्या हस्ते “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे” हा संदेश देण्यात आला. प्रास्ताविकात स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक ग्रंथपाल डॉ.सुधीर नगरकर यांनी स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षे शिवाय पर्याय नाही . जावळी तालुका हा माथाडींचा चा तालुका ऐवजी प्रशासकीय अधिकार्याचा तालुका बनविण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र प्रयत्न करीत आहे तसेच इन्टरनेट चा वापर करून वियार्थानी त्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे आणि पाहुण्याचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे - मार्गदर्शक वाई पोलीस स्टेशन चे डी.वाय.एस.पी. मा.श्री. अजित टिके साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही वेळेचा बाबतीत सर्वात श्रीमंत आहात त्या वेळेचा उपयोग योग्य प्रकारे करून अभ्यासाचे नियोजन केले तर तुम्ही नक्कीच यश मिळवाल, ज्या दिवशी तुमचा अभ्यास झालेला नसेल त्या दिवशी तुम्हाला हुरहूर लागली पाहिजे जो पर्यंत अभ्यासात आतून स्वयंप्रेरणेने पेटत नाही तो पर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही मुंबई पुण्यातील छोट्या नोकर्यांना बळी पडू नका कोणतेही काम हे चांगलेच असते मात्र तुमच्या बुद्धीचा क्षमतेनुसार अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी सज्ज व्हा, अभ्यास करताना एम.पी.एस.सी. चा सिल्याबस हा महत्वाचा असतो तुम्ही मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करताना प्रश्नामधील बारकाव्याचा अभ्यास करायला शिका असे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.एम. बी. वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ग्रंथालयातील क्रमिक आणि संदर्भ पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे प्रश्नपत्रिका काढणाऱ्या पेपर सेटर ची भूमिका कशी असते त्याबाबत मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे साठी सर्व प्रकारे मदत करण्याचे घोषित केले शुभेछ्या दिल्या .या प्रसंगी जिमखाना विभाग प्रमुख मा.प्रमोद चव्हाण हे उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रा.गेजगे एस.एन. यांनी केल आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ.गायत्री जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी ग्रंथालयामार्फत श्री. वसंत धनावडे आणि अविनाश मदने यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी विद्यार्थिनीनी सहभाग घेतला. त्यानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

DYSP मा.श्री. अजित टिके साहेब MPSC विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना

सर्व विद्यार्थ्यांनी खालील लिंक चा वापर करावा

करिअर कट्टा” उपक्रम :

करिअर कट्टा” या उपक्रमामध्ये भाग घेण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करावे,

१) तुमच्या मोबाईलमध्ये MITSC app डाउनलोड करा आणि तुमची माहिती रजिस्टर करा.

२) Carrier katta IAS किंवा Carrier katta Entrepreneur यापैकी तुम्हाला आवडेल तो उपक्रम निवडा.

३) ऑनलाईन ३६५ रुपये भरा आणि पूर्ण एक वर्ष आपल्या आवडीच्या उपक्रमाच्या ऍक्टिव्हिटी मिळवा.

खालील लिंकवर जाऊन MITSC अँप डाउनलोड करावे , ही विनंती.

https://play.google.com/store/apps/details?id=com.mitsc1

अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा,

Dr SUDHIR NAGARKAR . 9096572888

UPSC WEBISTE (Click Link) : https://upsc.gov.in/

UPSC Syllabus URL : https://www.careerindia.com/upsc/syllabus-c2.html

UPSC Current Affairs URL: https://www.fresherslive.com/current-affairs/index

UPSC Notes URL: https://byjus.com/free-ias-prep/upsc-notes-pdf/

UPSC Question Papers : https://www.careerindia.com/upsc/question-papers-c2.html

MPSC WEBSITE (Click Link) : https://mpsc.gov.in/

MPSC Question Paper URL : https://mahanmk.com/question-papers/

MPSC Notes URL : https://www.mpscacademy.com/

MPSC EXAM Information In Marathi:

https://www.marathihq.com/mpsc/

Inter Library Loan PSKD Library : https://sites.google.com/view/deurcollegelibrary/students-corner/competitive-exams

UNACADEMY YOUTUBE CHANNEL : https://youtube.com/c/UnacademyLiveMPSC

UNIQUE Academy Pune CHANNEL :

https://youtube.com/c/TheUniqueAcademyPune

UGC NET EXAM WEBSITE :

https://ugcnet.nta.nic.in/

UGC SET Exam WEBSITE :

http://setexam.unipune.ac.in/Home.aspx

SET EXAM SYLLABUS

https://setexam.unipune.ac.in/SyllabusOfPapers.aspx

IBPS EXAM URL:

https://www.ibps.in/

NEET Exam Website : https://neet.nta.nic.in/

TELEGRAM CHANNEL FOR UPSC

https://t.me/current_affairs_upsc_bpsc_quiz

TELEGRAM CHANNEL FOR MPSC English

https://t.me/MPSCEnglish

TELEGRAM CHANNEL of ASSM CEC MEDHA

https://t.me/joinchat/VdbhHOUDRMw2Mzdl

ASSM LIBARYARY & KRC WEBSITE :

https://sites.google.com/site/assmlibrarymedha/home?authuser=0

ASSM NET/SET Guidance :

https://sites.google.com/site/assmlibrarymedha/netset-guidance

********************************


Competitive Exam Download स्पर्धा परीक्षा विभाग

MPSC Syllabus

MPSC Old Question Paper

Carrier Cutta