शारीरिक शिक्षण आणि खेळ सुविधा अंतर्गत विद्यार्थांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे ज्यामुळे एक अष्टपैलु व्यक्तिमत्व तयार होणास मदत होईल व विद्यार्थी समाजाचे नेतृत्व करुन समाजामध्ये एक स्वत:चे स्थान निर्माण करु शकेल.
तसेच विद्यार्थांच्या सर्वांगीन विकासाचे महत्व समजून घेता विद्यार्थाना विविध देशी विदेशी खेळाच्या सुविधा निर्माण करुन देण्यात आल्या आहेत. विविध खेळाच्या सरावासाठी प्रशस्त मैदान व बंदीस्त प्रेक्षागृह महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत तसेच विविध खेळाची प्रमाणित मैदाने देखील तयार करण्यात आली आहेत, अत्याधुनिक व्यायामशाळा महाविद्यालयात उपलब्ध आहे. खेळाचा विकास व्हावा तसेच विद्यार्थांना उत्तम आरोग्य मिळावे विद्यार्थांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन शारीरिक शिक्षण आणि खेळ फॅसिलीटी मार्फत करण्यात येते. यामध्ये विविध खेळाच्या सराव शिबीरांचे आयोजन करणे, विद्यार्थामध्ये गट पाडून तयार करुन त्याच्यामध्ये मासिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करणे, महाविद्यालयाअंतर्गत वार्षीक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करणे, राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करणे, आंतरमहाविद्यालयीन व विभागीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करणे, आंतरमहाविद्यालयीन / विभागीय/ राज्य/ राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडास्पर्धा मध्ये विद्यार्थांना सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन व पोषक वातावरण तयार करणे इ.
शारीरिक शिक्षण आणि खेळ फॅसिलीटी अंतर्गत योग केद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केद्रामार्फत योग दिन तसेच विद्यार्थांनसाठी योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. तसेच सुर्यनमस्कार कोर्स देखील घेण्यात येतो.
सामाजिक जाण ठेवत महाविद्यालयाबरोबरच आजूबाजूच्या परीसरातील मुलांमध्ये खेळाबरोबरच विविध कला -कौशल्याची जोपासना करुन त्यांच्या सर्वांगीन विकासाठी महाविद्यालामध्ये शारीरिक शिक्षण आणि खेळ फॅसिलीटी मार्फत फन फीटनेस सेंन्टर हा वार्षीक उपक्रम व रायझींग स्टार हे उन्हाळी शीबीराचे आयोजन करण्यात येते.
महाविद्यालयातील विद्यार्थांचा आर्मि पोलीस या सारख्या क्षेत्रामध्ये जाणाच्या कल बघता महाविद्यालयामध्ये भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
तसेच विद्यार्थांनसाठी इको ट्रेक हा उपक्रम राबवला जातो.
शारीरिक शिक्षण आणि खेळ फॅसिलीटी अंतर्गत असे विविध उपक्रम राबवले जात असताना शारीरिक शिक्षण आणि खेळ फॅसिलीटी ही गुनवत्ता सुधारण्यासाठी नाविण्यता व अधुनिकता याकडे देखील जास्त भर देते.