संधी निकेतन शिक्षण संस्था वडगाव द्वारा संचलित
जीवन विकास निवासी मतिमंद कर्मशाळा उदगीर जि. लातूर
"कौशल्य व उधोजक्ता विकास केंद्र"
"कौशल्य व उधोजक्ता विकास केंद्र"
संस्थे विषयी :
संधी निकेतन शिक्षण संस्था वडगाव द्वारा संचलित प्रौढ मतिमंद मुलांसाठी दैनंदिन जीवन कौशल्य सोबत अकुशल स्वरूपाचे व्यवसाय प्रशिक्षण घेऊन सर्वसामान्य सारखे स्वावलंबी जीवन जगता यावा या उद्देशाने श्री नि.म. वडगावकर यांनी उदगीर येथे जीवन विकास निवासी मतिमंद कर्मशाळा 1992 साली स्थापना केली
कर्मशाळेत प्रवेश घेण्यासाठी
मतिमंदत्व, बौद्धिक अक्षम, बौद्धिक दिव्यांग, गतिमंदत्व, Intellectual disability, Mental Retardation या अधिसूचित दिव्यांगत्व असलेले 40% व त्यापेक्षा जास्त प्रमाण दिलेले युडीआयडी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वय वर्ष 18 ते 45 वर्षापर्यंत च्या मुलांना प्रवेश दिला जातो.
सोई सुविधा :
कर्मशाळेत 60 मुलांना निवासी स्वरूपात ठेवण्याची सोय करण्यात आलेली. आहे या प्रवेशितांना राहणे, जेवणे, कपडे, सर्वसाधारण आजारावर उपचार, खेळ, योगासने, कवायत, मनोरंजन इत्यादी शिक्षण प्रशिक्षणाची सुविधा दिली जाते.
ही सेवा विनामूल्य असून पालकाकडून कसलीच फी आकारली जात नाही
शिक्षण प्रशिक्षण :
प्रवेशित मुलांना दैनंदिन जीवन जगण्याचे कौशल्य येथे शिकविले जाते. नीटनेटकेपणा, स्वच्छता, सामाजिक ज्ञान, व्यवहारिक ज्ञान, कुटुंब पद्धती, पैसा, प्रवास, संभाषण, सुरक्षात्मक कौशल्य, लैंगिक शिक्षण इत्यादी मूलभूत शिक्षण येथे दिले जाते.
सोबतच अकुशल स्वरूपाचे व्यवसाय प्रशिक्षण घेऊन अर्थपूर्ण जीवन जगता यावा यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण येथे दिले जातात.
मॉप पोचा, वाईपर तयार करणे
स्क्रीन व हिटमशीन प्रिंटिंग
कृषी व्यवसाय व कृत्रिम फुलांचा व्यवसाय
साफसफाई उत्पादने तयार करणे
सणानिमित्त लागणारे वस्तूंची निर्मिती
कागदी पाकीट पिशव्या तयार करणे
व्यवसायिक होण्याच्या दृष्टीने लागणारे कौशल्याचे प्रशिक्षण
संपर्क:
अधीक्षक,
जीवन विकास निवासी मतिमंद कर्मशाळा ("कौशल्य व उधोजक्ता विकास केंद्र"),
कौळखेड रोड, शिरोर-जानापुर रस्ता, उदगीर ता. उदगीर जि. लातूर - 413 517
मोबाईल नंबर: 9922211867, 9766268641
ई-मेल : jivanvmk@gmail.com
इतर सोई सुविधा :
कर्मशाळेतील प्रवेशितांना विविध खेळ, कवायत, योगासने, मनोरंजन कार्यक्रम घेण्यात येतात. दरवर्षी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला जातो, सांस्कृतिक कार्यक्रम, रोजगार मेळावे, सेल्फ एडवोकेसी मिळावे, तयार मालाची विक्री व प्रदर्शन, मतदान जनजागृती, व्यसनमुक्ती जनजागृती, जागतिक दिव्यांग दिन-सप्ताह साजरा करणे, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, स्पेशल ओलंपिक भारत, आदी कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतले जाते.
एकदा प्रवेश निश्चित झाल्यानंतर चार वर्षापर्यंत निरंतर शिक्षण प्रशिक्षण घेतल्यास लाभ होईल.
माहिती पत्रिका :