सर्व महान कला केवळ तुमच्या मनालाच नव्हे तर तुमच्या हृदयाला स्पर्श करून तुम्हाला आनंद देतात. ह्या तुम्हाला अस्तित्वाच्या आणि कौतुकाच्या वेगळ्या स्तरावर नेतात. तसेच संगीता सोबतही आहे. ऑडिओ प्रेरणा आत खोलवर जाते आणि म्हणूनच एक कलाकार म्हणून माझ्यासाठी श्रोत्यांचा सतत सहभाग असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळेच मी मनापासून गाते.
एक असा राग विकसित केला पाहिजे की तो उमळलेल्या कळीप्रमाणे फुलून गुलाब होईल, प्रत्येक स्वर त्याच्या स्वतःच्या मनोरचनेनी, स्वतःच्या भावनांनी रंगलेला असतो. तुम्हाला मूलभूत भावना, रस किंवा अनुभूतीपर्यंत घेऊन जाणारे हे एक संगीतमय माध्यम आहे.