माझ्या गुरूंनी मला शिकवलेल्या पद्धतीनुसार मी रियाझच्या विस्तृत पद्धतींचे पालन करतो. सादरीकरणा पूर्वी, मी सकाळपासूनच काय गाणार याचा विचार करत असतो. मी माझ्या मनात सतत गात असतो. तरीही, मला माहित आहे की मी निराळा असणे आवश्यक आहे. माझे वैयक्तिक व्यक्तित्व असायला पाहिजे. माझे व्याकरण पूर्णपणे परिपूर्ण असावे, जसे गुरूंने दिले आहे,परंतु मी त्यांचे केवळ अनुकरण करू नये. मी नव्याने निर्माण केले पाहिजे.