डिजिटल पुस्तक
अंकुर जाधव
तुम्हाला आवडेल त्या पानावरून सुरुवात करा. इथे सर्व फोटो आहेत. ते आधी बघून सुद्धा तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता. इथे स्पर्श करून सोशल मीडियावर हे ऍप शेअर करावे. 😊
गूगल प्ले स्टोअर वर आपला अभिप्राय स्वागतार्ह आहे. आपली मतं आणि सूचना वाचायला मी फार उत्सुक आहे.
- अंकुर
- - -
माझ्या नातवाने माझा बायोडाटा लिहिला; तोपर्यंत मला नोकरीची गरज आहे असं कधी वाटलंच नव्हतं. खरं म्हणजे त्यानेच स्वतःसाठी काहीतरी काम-धंदा शोधावा असं मला वाटतंय. ;)
- आजी.
- - -
पुस्तकातील काही उतारे:
उठणे.
घरातून बाहेर पडणे. आंघोळ रात्री झोपण्यापूर्वीच होत असे. त्याशिवाय सकाळी इतक्या लवकर बाहेर पडणे कठीण होते.
माटुंगा रोड स्टेशनातून गाडी पकडायची
चर्चगेटला उतरून पंधरा मिनिटे चालत कॉलेजला पोहोचायचे.
कॉलेजमधील तासांना हजर राहायचे.
सर फिरोजशहा मेहता रोड पासून चालत जाऊन १०.३० वाजेपर्यंत बॅलार्डपिअरला ऑफिसमध्ये हजर राहायचे.
- - -
बऱ्याचदा मी सर्वांच्या आधीच ऑफिसमध्ये पोहोचायची. माझे सहकारी म्हणायचे की, मी इतरांमध्ये वक्तशीरपणा बिंबवत आहे. आमचे मुख्य अधिकारी श्री. गुप्ता यांना वाटायचे की, मी कॉलेजचे तास चुकवून लवकर ऑफिसला येऊन बसते. म्हणून ते मला म्हणत की, तू केव्हाही ऑफिसला ये, पण कॉलेजचे तास आणि अभ्यास चुकवू नकोस. पण इतके स्वैर मी कधीच वागले नाही. माझ्या सहकाऱ्यांनी मला कधीच हे जाणवू दिले नाही की मर्कंटाईल मरीन डिपार्टमेंट (एम् एम् डी) मध्ये मीच सर्वात पहिली स्त्री-कर्मचारी होते!
- - -
सकाळी साडेपाचला उठून चार जाडजूड पोळ्या चहाबरोबर खाल्ल्यानंतर दुपारी जेवणाच्या वेळेत मी बहुतेक जवळपासच्या खानावळीतून काहीतरी खायला आणायची. :)
ऑफिस सुटल्यावर बॅलार्ड पिअरहून चर्चगेट स्टेशनला चालत जाऊन गाडी पकडायची.
चर्चगेटहून गाडी पकडून दादर पश्चिम पर्यंत लोकल ट्रेनने प्रवास
लक्ष्मी टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये टायपिंग व शॉर्टहँड शिकायला जायची
तुळशी पाईप रोड वरून माहीम पर्यंत चालत घरी पोहोचायची. घरी एक कप चहा पिऊन लगेच शिवाजी पार्कला गुरू वसुंधरा श्रीखंडे यांच्याकडे संगीत शिकायला जायची. दिवसभराच्या धावपळीनंतर संगीत शिकणे हे मनाला फारच सुखकारक वाटायचं.
जेवण. आमच्या शेजारच्या पंजाबी बाई मला आग्रहाने जेवायला बोलवायच्या. शिवाय आग्रहाने ग्लासभर दूध प्यायला देऊन त्यांच्या घरीच अभ्यासाला बसवायच्या. कारण आमचं घर फारच लहान होतं.
कॉलेजचा अभ्यास.
शेवटी एकदाची मस्त झोप!
- - -
- - -
१९५५-५६ मध्ये मंगळवार पेठ पुणे येथे असताना माझे वडील अण्णा यांनी मला फिरत फिरत आजोबा (रामचंद्र) जिथे राहत होते तिथे त्यांना भेटायला नेलं. आजोबांच्या दोन पुतण्या नलू आणि बेबी यांना अण्णा चांगले ओळखत होते. त्या दोघी खूप हुशार आणि भरपूर शिकलेल्या आहेत हे अण्णांनी मला आधीच सांगितलं होतं; त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी... Read More
- - -
I recommend Mrs. Kavita Inamdar for any job which she will happily do at the desired salary of Rs. 12 Lakh per annum. Check out her LinkedIn profile.
(JUST DEMO. EXPAND THIS.)
- Ankur Jadhav
(The Great Author.)