आम्ही मातीत खेळलो आणि आमचे खेळाडू आज रिंग वर खेळत आहेत, काळ बदलतो फक्त बदलवण्यासाठी जिद्द असावी.
शिरपूर शहरात अगदी शून्यापासून सुरूवात करत २००८ पासून - आज धुळे जिल्ह्यात बॉक्सिंग खेळाचं जणू एक रोपत मी (मयुर बोरसे) यांनी लावलं, पण आम्ही सर्वांनी मिळून त्या रोपट्याला एका वटवृक्षात परावर्तीत करण्याचा प्रयत्न केला, आणि तो या पुढेही असाच करत राहू. प्रत्येकाला आयुष्यात अनेक बरे-वाईट प्रसंग येतात पण परिस्थितीवर मात करण्याची ताकद असावी लागते, असंच काही आमच्या बाबतीत घडलं, घरची परिस्थिती अतिशय नाजूक धोबी व्यवसाय आणि हाचं व्यवसाय मी (मयुर बोरसे सर) करत आज जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य बॉक्सिंग खेळाडू घडवत आहे, जेंव्हा आम्ही बॉक्सिंग सुरू केली तेंव्हा चार भिंतीच्या आत बॉक्सिंग सुरू केली, ते गल्लीचे दोन-चार मुलं सोबत घेऊन. चला तर मग आपण पाहूया “धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचा” प्रवास.