भीमाईच्या वासराचा
रामजीच्या लेकरांचा
पायगुण असा भारी
जागा केला जगजेठी गा
झाला उजेड हा थोर
त्याला टोकड अभाळं
दुबळ्याला आलं बळं
घूंगराची वाजे काठी गा
जलमला भीम बाळ
भीमाईच्या पोटी गा
भीमाईच्या पोटी गा
~ विठ्ठल उमप (डॉ. बाबासाहेब आंबेडकर २०००)
भिमा घे पुन्हा जन्म तु या दिनांन साठी
कधी होतील भिमा भेटीगाठी
भिमा घे पुन्हा जन्म तु या दिनां साठी
तुझ्या शब्दा वरती सारे हे मरणारे
तुला खांद्यावरती उचलुनी धरणारे
बघ जनता तुझी बा ही नऊ कोटी
भिमा घे पुन्हा जन्म तु या दिनां साठी
रजंले-गांजलेले त्रासले-थकलेले
भेटीसाठी तुझ्या हे आज आतुरलेले
बघ जनता तुझीया दर्शना केली दाटी
भिमा घे पुन्हा जन्म तु या दिनां साठी
कुणी जाई इकडे कुणी जाई तिकडे
तुझ्या संघटनेचे बाबा होती तुकडे
द्यावयासी तया नाही दमदाटी
भिमा घे पुन्हा जन्म तु या दिनां साठी
कधी होतील भिमा भेटीगाठी
भिमा घे पुन्हा जन्म तु या दिनां साठी
लय बाळ आलं माझ्या दुबळ्या पोरात
बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरात
गुरं ओढणारा पोरगा माझा साहेब झाला
तहसीलेतला आता मोठा नायब झाला
त्याचा दरारा असे सरकारी नौकारात
बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरात
राजवाड्यातला माणूस आता गावात आला
साऱ्या गावचा कारभारी आमुचा येडुबा झाला
झाला सरपंच बोलाया लागला जोरात
बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरात
एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंदाया
तिथं समतेचं मंदिर आता लागल्या बांधाया
नातं जुळू लागलं खालच्या वरच्या थरात
बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरात
गाव पंगतीत आता बसू लागला प्रकाश
परिवर्तनातला तो दिसू लागला विकास
भर चौकात आता निघाया लागली वरात
बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरात
लय बाळ आलं माझ्या दुबळ्या पोरात
बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरात
एका भयाण रातीला, ग्वाड सपान पडलं
ग्वाड सपान पडलं, मन त्यातच गढलं
तळागाळाच्या माणसा, तुला वरती काढलं
तुला वरती काढलं, तुझ वजन वाढलं
भीम शंबर नंबरी, सोनं महूच्या मातीच
माझ्या जातीचं थोर नशीब जातीचं
भीम शंबर नंबरी, सोनं महूच्या मातीच
भीम रस तो लवाचा, भीम कडाडकी वीज
सनातन्यानी भीमानं, केली हरामचं निज
मोठ्या मनानं राखाया, हिंदू धर्माची ती बूज
लिहिलं हिंदू कोड बिल, नाही झालं त्याच चीज
भीम बॉम्ब हायड्रोजन, धूम धडाड आवाज
धूम धडाड आवाज, गाज सभा गोलमेज
गाणं भीमाच्या कीर्तीचं, सारं जण हे गातील
सारं जण हे गातील, कोट धरून छातीच
भीम शंबर नंबरी, सोनं महूच्या मातीच
भीमसूर्य क्रांतीचा, पाहिला विधानात
बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात
पाडली अशी खाली, माजलेली विषमता
डाव होते समतेचे, भीम पहिलवानात
जात पोळली माझी, रुढीच्या निखाऱ्यावर
फूल आले क्रांतीचे, या वाळलेल्या रानात
गावकीचा जोहार, संपला आता माझा
दिल्ली आम्ही पाहिली, त्या भीम संविधानात
बाटली बैलगाडी, काल आमच्या स्पर्शाने
मी टाय कोट घालूनी, आता चाललो विमानात
बुद्धीच्या किनाऱ्यावर, विश्व तू चकित केले
हो...
“बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते
समतेच्या भावनातील चंदन भीमात होते
तालात जीवनाच्या विषमता नाचली ही
न्यायाची रागदारी, गुंजन भीमात होते
संकल्प या मनाचा, क्रांती करून गेला,
निधड्या मनाचा मोठा, होऊन सिंह गेला
दीपविले कैक ज्ञानी, माझ्या धुरंधराने
इतिहास घडविला, माझ्या युगंधराने
ही आस नाही केली, श्रीमंतीच्या धनाची
फुलविली बाग ऐसी, येथे परिश्रमाची,
दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा
गुणवंत पाहिला मी, अन्यायी झुंजणारा
विसरून गेला शेवटी, जातीयतेची ज्वाला
भीमराव माणसाला, माणूस करून गेला
काळाच्या डोळ्यावरती, बसलेली होती कात
तू दाविली पहाट, उज्ज्वल प्रखर ती ज्योत
न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता
या दीन बांधवांना आदर्श तुझा होता
बंधुत्व न्याय ज्याने ह्रदयात साठविले
दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले”
बुद्धीच्या किनाऱ्यावर, विश्व तू चकित केले
पाहिला महासागर, पुस्तकाच्या ज्ञानात
बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात!
भीमसूर्य क्रांतीचा, पाहिला विधानात
बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात!
बाटली बैलगाडी, काल आमच्या स्पर्शाने
मी टाय कोट घालूनी, आता चाललो विमानात
बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात!
क्रेडिट: आनंद शिंदे
दिनांसाठी कष्ट साहिले, माझ्या भीमाने
हक्क दिले मिळवुनी आम्हा, अति श्रमाने
सोडुनी ही गेली गाई, आपुल्या या वासरा
अरे सागरा
पाहून ऐट त्यांची, वैरी मनी लाजं
घटनेचा शिल्पकार, माझा भीमराज
दीप विझला, नाही आजला, आता चमकणारा
अरे सागरा
बौद्धमय करीन भारत, हीच मनी आस
आनंदाने ठेवीन मी, या समाजास
स्वप्न तुटले डोळे मिटले, आता ना सहारा
अरे सागरा
गेला सोडून अम्हा, पिता भीमराज
कल्याणकर्ता आमचा, राहिला ना आज
सोडुनी तो दुःखहर्ता,
आजला या लेकरा
अरे सागरा
~ गायन: मिलिंद शिंदे । गीतकार: कल्याण जाधव
जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं
जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं
झिजून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं
साऱ्या महारामधी मॅट्रिक नव्हतं कुणी
यश घेऊन आली भीमाची लेखणी
असं अमृताचं पान
माझ्या भीमानं केलं
एका गरीब घरी जन्माला येऊन
तरी शिकावयाची जिद्द उरी घेऊन
अमेरिकेला प्रयाण
माझ्या भीमानं केलं
आला कोलंबियाहून पी एच डी होऊन
दुजी विलायतेची बॅरिस्टरी घेऊन
त्याचंच देशाला दान माझ्या भीमानं केलं
आधी माणुसकीचा दिला आम्हाला धडा
मग प्रेत मनूचे पेटविले धडधडा
असं आम्हा बलवान, माझ्या भीमानं केलं
राजदरबारी अशी केली कारागिरी
लोकशाहीचा धुरा लेऊन आपल्या शिरी
कायद्याचं कार्य महान, माझ्या भीमानं केलं
जरी झाला बॅरिस्टर तरी पडला ना विसर
भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर
नको पुरणाची पोळी,आणि गोडधोड खाया
वाटू लसणाची चटणी, संग तोंडी लावाया
तो अति आनंदानं, बाई जेवंल पोटभर
भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर
चिकनं चोपडं खायाचा, नाही भीमाला शौक
या समाजसेवेची,त्याला लागलीया भूक
पंचपक्वान्न स्वादिष्ट, ना जेवला वेळेवर
भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर
त्या गोऱ्या सायबाचा,होता गुलामाला धाक
पण बाबासायबानी, कापलं गुलामीच नाक
त्यानं मारिली ठोकर
भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर
आडातलं भरलय, त्या गडी संजयानी
तांब्याभरून देऊ, त्याला माठातलं पानी
हे जेवण जिरवाया, टाकू दुधात साखर
भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर
~ गायन: मिलिंद शिंदे । गीतकार: संजय वाघचौरे
सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमा सारखा माणूस खरा
सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमा सारखा माणूस खरा जन्मा येईल का?
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का?
असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का?
मानापानाला कधीच नाही चुकून हपापणारा
धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा
वादळातली समाज नौका
वादळातली समाज नौका किनारी लावील का?
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का?
असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का?
करुणेचा सागर होऊन, करुणेने कळवळणारा
दीन-दलितांसाठी दिन-रात्री तळमळणारा
भीमासारखा कर्तृत्वाचा
भीमासारखा कर्तृत्वाचा पहाड होईल का?
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का?
असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का?
देश-विदेशी जनता ज्ञान बघून चकित होई
अशी भीमाची करणी, तिला जगात मोलच नाही
अशीच गोधन दीनदलितांची
अशीच गोधन दीनदलितांची ओझी वाहील का?
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का?
असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का?
सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमा सारखा माणूस खरा
सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमा सारखा माणूस खरा जन्मा येईल का?
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का?
असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का?
~ गायन: मिलिंद शिंदे । गीतकार: गोधन जाधव
तुम्ही किती बी लावा शक्ती,
अन किती पण लढवा युक्ती
तुम्ही कराल किती हि हल्ला,
लय मजबूत भिमाचा किल्ला
रक्त तिळ तिळ ते आटवून,
किल्ला बांधून ठेवलाय त्याने
किल्ल्यावरी ते निळ निशाण,
फडकवलंय माझ्या भिमाने
बाबासाहेबांचा विजय असो,
वाघ भित नाही मांजरीच्या पिल्ला
शूर भिमाचा खरा शिपाई,
आता दलित राहिला नाही
किल्ल्यावर जर केली चढाई,
घ्यावं समजून झालीच लाही
बाबासाहेबांचा विजय असो,
लय मजबूत भिमाचा किल्ला
करा गणिमी कावा तुम्ही,
स्वारी परतून लावू आम्ही
चिरवू आम्हीच रेखुम खुमी,
नाही आमच्यांत कसली कमी
करु मणकाच त्यांचा ढिल्ला,
लय मजबूत भिमाचा किल्ला
गायन: आनंद शिंदे