Founder & Volunteer
Mr. Swanand S.
( उद्योजक मंच प्लॅटफॉर्म चे संस्थापक )
Mr. Swanand S.
( उद्योजक मंच प्लॅटफॉर्म चे संस्थापक )
ध्येय समृद्ध महाराष्ट्राचे ⛳️
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
" उद्योजकता " या शब्दाच्या नादाला लागू नका.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
सध्या मार्केट मध्ये चालू असलेला ट्रेंड बघुन हसावे की रडावे समजत नाही. सगळीकडे उद्योजकता, स्टार्टअप्स या शाब्दिक गुंत्यात मराठी माणूस अडकलेला दिसत आहे. किंबहुना याच ट्रेंड ला धरून आम्हीसुद्धा " उद्योजक मंच " या नावाने awareness चालू केला. जेव्हा हे चॅनल चालू केले तेव्हा उद्योजकता म्हणजे नक्की काय याचा अर्थच आम्हाला माहीत नव्हता. पण कालांतराने आम्हाला समजल की आम्ही " उद्योजक " या शब्दाचा वापर करत असताना त्याचा नेमका अर्थ काय ? आम्ही स्वतः उद्योजक आहोत का ? याची जाणीव होत गेली.
उद्योजक या शब्दाचा अर्थ जेवढा मोठा आहे तेव्हढेच उद्योजक बनणे अवघड आहे. कारण ज्या शब्दाला समाज सहजतेने म्हणतो, " उद्योजकता म्हणजे बिझनेस ", त्या समाजातील लोकांना आपण स्वतः कोण आहोत हे सुद्धा माहित नसते. 📍
एव्हड्या मोठ्या galaxy मधील अनेक ग्रहांपैकी एक ग्रह असलेली पृथ्वी, त्यामधील असलेल्या एका विकसनशील देशात, एका छोट्याशा राज्यात, एका छोट्याशा जिल्ह्यात, एका छोट्याशा तालुक्यात, एका छोट्याशा गावात, एका छोट्याशा गल्लीत बसुन आपण स्वतःला उद्योजक म्हणतो. किती मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. 📌
दुर्दैव याचा अर्थ असा नाही की उद्योजक होणे चुकीचे आहे, पण स्वतःला उद्योजक म्हणवुन घेऊन आपणच आपली दुर्दशा समाजाला दाखवत आहोत हे खूप हास्यास्पद आहे. याविषयी awareness करण्याचा निश्चय आम्ही केला. जेणेकरून " उद्योजक " म्हणजे काय...? हा मार्केट ट्रेंड आपल्यापर्यन्त पोहोचवून नेमके काय करावे लागेल याची दिशा मिळेल. 🙌🏻 ✍️
आजपर्यंत आलेला संपूर्ण अनुभव पणाला लावून फक्त मराठी माणसासाठी व्यावसायिक विकास व्हावा ही अपेक्षा ठेऊन आम्ही उद्योजकते विषयी awareness करत आहोत. 💯✅
कारण उद्योजकता 5-10 वर्षात घडत नाही. त्यासाठी स्वतःमध्ये बरेच बदल करावे लागतात. आणि याच अनुषंगाने प्रवास उद्योजकतेचा ही संकल्पना राबवून 2023 च्या अखेरीस उद्योजक मंच ची स्थापना झाली. हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म महाराष्ट्रातील तरुणांना, विद्यार्थ्यांना,गृहिणींना, 10-12 वर्षावरील प्रत्येकामध्ये व्यक्तिगत विकास घडविण्यासाठी चालू केलेला आहे. ⛳️
या उद्योजकतेच्या प्रवासात, उद्योजकतेचे गैरसमज दूर करून एक उत्तम उद्योजकतेचा प्रवास घडावा, यासाठी हा एक मोठा प्रयत्न आहे. 🧑🏻🤝🧑🏻🇮🇳⛳️
Mr. Abhinandan S.
Mr. Abhinandan Sir has 17+ years of experience in the field of education, private schools and management. He is a organization's body member and a co-operative partner of Udyojak Manch.
Mr. Pratik K.
Mr. Pratik K. having 3 years of experience in Information Technology & IT Services.
Backbone Of We Inspire
15+ Years of experience in Counselling & Business, Communication Guidance, Advisor
Industry Expert having 20+ years of Manufacturing & Service Industry
(Owner Of Plastic Products Manufacturer)