Fruits is Medicine


फळांचे औषधी उपयोग Fruits as Medicine

आंबा : आंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा, असे आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे. हे फळ शक्तिवर्धक आहे. अन्नाबद्दल रूचि उत्पन्न करणे व भूक वाढविणे हे त्याचे प्रमुख गुण होत तसेच शरीराची आग होत असल्यास आंबा उपयुक्त ठरतो. यावरून उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे. हे दिसून येते. अतिसार म्हणजे वारंवार शौचास होणे. या व्याधीवर आंब्याची साल व कोय उपयुक्त आहे. साल ठेवून तिचा काढा तयार करून घेतात. तसेच कोय भाजून तिचे चूर्ण करून मधातून दिल्यास विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो.

अंजीर : अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.

अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.

अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.

आवळा :आवळा हे फळ हे फळ बहुगुणी आहे. हे मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात. आवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून तयार केलेली आवळकंठी वापरतात येते. याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे. रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाण्यामुळे, ही नेहमी दिसून येणारी तक्रार दूर होते. आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी उपयुक्त आहे.

ऊस : ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते. ऊस हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे कलिंगड हे एक थंड फळ आहे. त्याबद्दल एकच काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यात गाडीवर मिळणाऱ्या उघड्या फोडी खाल्यामुळे एखाद्या वेळी अपाय होण्याचा संभव असतो. कारण त्याच्यावर माशा बसून व रस्त्यातील धूळ उडून त्या दूषित झाल्या असण्याचा संभव असतो.

द्राक्षे : द्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेला मनुकाही एक चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. घसा जळजळणे, घशाशी येणे, पोटदुखी, आंबट ढेकरा, उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे खावी. मूठभर द्राक्षे व मूठभर बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत घालून ठेवावी व सकाली कुसकरून थोडी खडीसाखर घालून सेवन केल्याने वरील सर्व तक्रारी दूर होतात. मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका मनुका उपयुक्त आहेत. रोज सकाळी १०-१५ मनुका बिया काढुन खाव्या आणि त्यावर १-.५ कप दूध घ्यावे. त्यामुळे भूक वाढते. अन्न पचन होते व शक्ति येते. घसा बसणे, कावीळ व अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो. मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे थांबते. मनुका, जेष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा पित्तावर उपयुक्त ठरतो. क्षय इत्यादी छातीच्या विकारांत खोकल्याबरोबर रक्त पडते, त्या वेळी हा काढा घ्यावा क्षयरोगांमध्ये येणारी अशक्तता मनुक खाण्यामुळे कमी होते.

पपई े :

पपई हे फार मोठे औषध आहे. रोज नियमाने खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचते. पपईचा चीक गजकर्ण, खरूज, नायटा या त्वचारोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो. जंतावर हे एक चांगले औषध आहे. हा चीक व मध दोन दोन चमचे एकत्र घोटावा. त्यात दुपट्ट गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना अर्धा चमचाभर ओळीने तीन दिवस द्यावा. जंत पडून जाताट. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. त्यांना ती अपायकारक असते.

लिंबु :

लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.

जांभूळ :

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.

डाळींब :

डाळिंबात अनेक औषधी गुण आहेत. डाळिंबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते. अपचन दूर होते. आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार (संगहणी) बरा होतो. काविळीवरही हे एक चांगले औषध आहे. हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.

केळे :

केळे हे शक्तिवर्धक आहे. पण पचण्यास जड असते. हे लक्षात ठेवावे. तसेच ते थंड असल्यामुळे अंगाची आग कमी करते. वारंवार पित्त होण्याची तक्रार असल्यास केळे खाण्याने उपयोग होतो. तरूण वयात उद्भवणाऱ्या स्वप्नावस्थेच्या विकारावररोज जेवणानंतर १ ते २ केळी खाल्याने १५-२० दिवसांत उपाय होतो.

स्ट्रॉबेरी :

चवीस आंबट, किंचित गोड, जिभेची चुणचुण करणारी स्ट्रॉबेरी आंबट चवीमुळे पित्त वाढविणारी व रक्ताची निर्मिती करणारी आहे. त्यामुळे अजीर्ण, मळमळ, त्यामुळे अन्नपचन न होणे अशा वेळी स्ट्रॉ चावून खावी. वर पाणी पिऊ नये. रक्तवाढीसाठी अर्थात पंडुरोग किंवा ऍनिमियामध्ये लोहाच्या कल्पांबरोबर स्ट्रॉबेरीचा वापर केल्यास लोहाच्या औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात.

छातीत धडधड, भीती वाटणे, आत्मविश्वासाचा अभाव, थोड्या श्रमाने थकवा येणे असा वेळी स्ट्रॉबेरी रस व खडीसाखर हे मिश्रण थोडे थोडे सायंकाळी घ्यावे. एकदम पिऊ नये. उपयोग उत्तम होतो.

स्ट्रॉबेरीचे आईसक्रीम, मिल्कशेक हे प्रकार खाऊ नयेत. त्याने आम्लपित्त, त्वचा विकार, मूळव्याध होऊ शकते. सर्दी खोकला असतांना वापरू नये. पित्ताच्या उलट्या होत असल्यास स्ट्रॉबेरी वापरू नये.

बोरे :

आंबट-गोड बोरात व्हिटॅमिन ए, सी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट इत्यादी जीवनाश्यक सत्वे आढळतात. यांच्या नियमित सेवनाने मुत्रपिंडातील खडा, अतिसार, हगवण, वातविकार यावरती अतिशय लाभदायक होऊ शकते. मूठभर वाळलेली बोरे घ्या आणि ग्लासभर पाण्यामध्ये उकळत टाका. निम्या प्रमाणात पानी आटले की ते पाणी थंड करा. हा बोरांचा काढा अशाप्रकारे तयार करावा. त्यात चवीसाठी साखर किंवा मध टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन स्मरणशक्ती वाढते. हे सर्वात स्वस्तच प्रभावी ‘ब्रेनटॉनिक’ होऊ शकते. बी काढलेली बोरे जाळून त्याचे भस्म व लगदा यांच्या मिश्रणात थोडासा लिंबाचा रस टाकून मलग तयार करा. हे मलम चेहऱ्यावरच्या मुरमांवर लावल्यास मुरमे नाहीशी होतात.

दृष्टीदोष

डोळ्यांना दिसत नाही. लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. पाणी गळू लागते, खुपऱ्या होतात, दृष्टीस अंधूकपणा असतो. अशा वेळी डोळ्यात नुसता मध घालवा अगर सुखरी हिरडा मधात उगाळून घालावा. यामुळे सर्व दृष्टीदोष नाहीसे होतात. दृष्टी फार लवकर सुधारते.

 

त्वचारोग

सारखी अंगास खाज सुटते, गांधी उठतात, खरबरीत होते, त्वचेवर पांढरेपणा उत्पन्न होतो. त्वचेची आग होते. अशा वेळी मध रोज घेणे हितकारक आहे. रोज वयोमानाप्रमाणे १ ते २ तोळे मध व पाणी एकत्र करुन घ्यावे. अंगकाठी सतेज होते.

 

श्वास खोकला

श्वासामुळे सारखा लागणारा दम, कफामुळे सारखा येणारा खोकला, खोकुन खोकुन पोटात दुखु लागते. कंबर वाकते. एक प्रकारची तोंडावर सूज येते. सारखा कफ पडतो. अशावेळी मध अगर त्रिफळा पूर्ण व मध एकत्र करुन घावे.

 

अतिसार

काही खाल्ले तरी वांती होणे. अशी सवय अनेकांना असते. म्हणून अन्न पचत नाही. त्यामुळे भुक चांगली नसते. वांति होईल या भितीने अन्नद्वेष. त्यामुळे निरूत्साह उत्पन्न होती. यावेळी मधाचा वापर अन्नात अवश्य करावा. त्यामुळे वांती होण्याची प्रवृत्ती कमी होते.

 

कृमी

लहान बालके, मोठी माणसे कोणासही कृमी होण्याची प्रवृत्ती असते. त्यांच्या शरीरात कृमींमुळे अन्नद्वेष उत्पन्न झालेला असतो. यावेळी मध घेत जावा.

 

गॅस होणाऱ्यास मध व लिंबू रोज द्या

ज्या व्यक्तिंना गॅसेस होतात. अशी तक्रार असते. भूक लागत नाही, उत्साह नसतो. काम करण्याची इच्छा नसते. कोणत्याही कामास कंटाळा येतो. नेहमी निरुत्साही वाटे. अशांनी रोज लिंबू रस (एक लिंबाचा) व मध एकत्र करून ते मिश्रण रोज सकाळी काही खाण्यापूर्वी घेत जावे.

कफ विकार

खोकल्याचा, दम्याचा त्रास ज्या व्यक्तीना होत असतो, त्यांनी मधाचा वापर आपल्या आहारात सतत करावा. त्यामुळे कफाचा जोर कमी होतो व अंगात उत्साह येतो.

मध हा काही आजार असला, आपणास कोणत्यातरी गोष्टीपासून उपद्रव होत असला तरच घ्यावा, असे नाही.

चांगल्या व्यक्तींनी सुध्दा मधाचा वापर करावा. कारण मध हा आयुष्यवर्धक व वीर्यवर्धक आहे. त्यामुळे आरोग्यसंपन्न होण्यासठी तो शरीरास उपयोगी आहे.

 पोटाच्या विकारांवर मध

रोज सकाळी एक पेलाभर थंड पाणी व चहाचे दोन चमचे मध एकत्र घेऊन चांगले एकजीव करुन घेणे. त्यामुळे पोटाचे विकार बरे होतात . डोकेदुखी, हातापायास ठ्णका, संधिवात यावर मध चांगले औषध आहे. भूकपण चांगली लागते. (लहान मुलास एक चमचा मध देणे.)

 

 

 

 

 


बहुउपयोगी एरंडेल | Erandel

एरंडेल तेलाला अमृताची उपमा :

एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात. आरोग्यशास्त्रदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे. अशा वनस्पतीचा परिचय माहित असणे जरून आहे. एरंडेल तेलास अमृताची उपम दिली आहे. अंगास लावल्यास, पोटात घेण्यास डोके व तळ पायांना शांतता येण्याकरीता हे तेल अवश्य वापरतात. या तेलाच्या दिव्यानेसुद्धा डोळ्यांना थंडावा येतो. यामध्ये तांबडा अशा दोन जाती आहेत. दोन्हीहि जाती श्रेष्ठ आहेत.

गुणधर्म :

तिखट, तीक्ष्ण, उष्ण, गोड, कडू, वृष्य, जड, स्वादू, सारक आहे. वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, बस्ति, मस्तक यातील शूल दमा अनाह, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त, प्रमेह, उष्णता, वातरक्त, मेद, वृषण वृद्धी, रक्तदोष, अरुचि, कृमि, अर्श, मुत्रकूच्छ यांचा नाश करणारा आहे.

कमला ( कावीळ ) :

सर्व शरीर पिवळे झाले आहे. डोळे पिवळे आहेत, नखे पिवळी झाली. थोडाफार ताप येत असेल, यकृताची वाढ झाली आहे, अशा वेळी एरंडाच्या पानाचे कोवळे मोख व मेंदीचा पाला एकत्र वाटुन तो दुधात मिसळावा ते दूध रोज सकाळी व सायंकाळी घ्यावे अगर एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे. कसलीही कावीळ बरी होते.

शूल :

पोटात बारीक बारीक व राहून राहून दूखत असेल तर, भुक लागत नाही, अन्नाचे पचन होत नाही, अस्वस्थता वाटते. अपचन, करपट ढेकर, अन्नावर वासना नसते अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हींग, पादेलोण, व सुंठीची पूड घालून निदान चार सप्तके द्यावा.

संदिवात बरा होण्यास मदत :

- आमवात संधिवात

सांध्यांना विचंवाने दंश करावा अशा वेदना. हातापायाची हालचाल होत नाही. साध्यांना सूज, चालता येत नाही, उठता बसता येत नाही, थोडा ताप असतो, कष्ट सहन होत नाहीत, अशा वेळी रोज सकाळी रात्री अर्धा तोळा ते एक तोळा एरंड तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. एरंड तेल एरंडाच्या पानास लावून दुखाच्या सांध्यांना ही पाने बांधावी, हातपायाची हालचाल नियमित व्हावी. जितके फिरता येईल तितके फिरावे. संधिवात अगर आमवात दोन्हीहि बरे होण्यास फार मोठी मदत होते.

कंबरेचा व पाठीचा शूल :

कंबर वाकता येत नाही. पाठही दूखत असते, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कमी होत नाही. चालताना चमका मारतात. अशा वेली एरंडमुळ व सुंठ यांचा काढा करावा. या काढ्यामध्ये दोन ते तीन गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा शूल थांबतो.

गळवे :

अनेकांना गळवे होतात. लवकर फुटत नाहीत. गळवावर एरंडाची मुळी पाण्यात उगळावी व गरम करुन गळवावर लेप द्यावा. लेप सुकला म्हणजे एरंडाचे पान वर बांधावे. आराम वाटतो.

रक्तदोष :

अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे. एरंडाच्या सालीचा गंध अंगास लावावे.

झोप येत नाही, डोके गरम - विकार:

अनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. डोके गरम राहते. टाळुचा भाब गरम होतो, डोक्यावर घण मारल्यासारखे होते, सारखे डोके दुखत असते, चैन पडत नाही, विचार मालिका सुरु झाली म्हणजे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरावावे व तळपायांनाहि तेल लावावे व डोके, तळहात व तळपाय यांना एरंडाचे पान बांधवे. हि गोष्ट सातत्याने व्हावी. गुण खात्रीने येतो.

उदर :

हात, पाय, नाभी यांन सूज येते, सांधे ढिले पडतात. कंबरेपासून जड वाटते, पोट मोठे होते. अशावेळी ताजे गोमुत्र एक कप गाळुन घ्यावे व त्यात दोन तोळे एरंडेल तेल घालुन रोज घेत जावे म्हणजे जुलाब होऊन पोट साफ राहते व उदर बरा होण्यास मदत होते.

वृषण वृद्धि :

वृषणाची वृद्धि होते व हवेने भरलेल्या पिशवीसारखे वृषण लागते.या अवस्थेत सुरुवातीस एरंडेल तेलाचे सावकाश मसाज करावे व एरंडास पानतूप लावून वृषणास बांधून घट्ट पट्टा अगर लंगोट घालावा.

दमा :

सारखा श्वास लागतो. चावत नाही छाटी भरल्यासारखी वाटते. चढण चढवत नाही. अशावेळी एक पट एरंडेल तेल, दुप्पट मध एकत्र करून घेतले असता बरे वाटते. सर्वच दमेकऱ्यांना हे औषध उपयोगी पडते. त्यामुळे कोठा साफ होतो व मलाची सुद्धता झाली म्हणजे श्वास कमी होतो.

गंडमाळा :

गळ्याभोवती गाठी उठतात. त्या गाठी ओळीने येतात. क्वचित प्रसंगी त्या गाठी पिकतात. पिकण्यापूर्वी त्यास एरंडमूळ, शेवग्याचे मूळ, पळसाचे मूळ, गोमूत्र अगर तांदळाचे धुण्यात उगाळून लेप करावा व त्यावर एरंडाचे पान बांधावे. रोज नियमाने ही गोष्ट करत जावी.

ऋदयशूल :

पुष्कवेळा छातीत दुखण्याचा तक्रार असतात. सारखे बारीक छातीत दुखत असते. क्वचित बारीक कळा येतात. हे सर्व पोटातील वायुमुळे होण्याचा संभव बऱ्याच वेळा असतो. यावेळी एरंडाचा प्रथम जुलाब घ्यावा. नंतर एरंडमुळाचा काढा दोन गुंजा जवखार घालुन देत जावा. गर्भारशीबाईने नियमीतपणे एरंड तेल निदान चार दिवसांनी तरी घेत जावे. यामुळे सुलभ प्रसुती होते.

पोटासंबंधी कोणत्याही विकारावर एरंडेल तेल हे एक रामबाण औषध आहे. अगदी लहान मुलांना (जन्माला आलेल्या बालकालासुद्धा) मध आणि एरंडेल तेल देतात. हे अत्यंत चांगले रेचक आहे. इंजिनाला ज्याप्रमाणे तेल घालून साफसूफ करतात त्याप्रमाणे एरंडेल तेलाच्या विरेचनाने साध्य होते.

ओठ फुटणे :

अनेक वेळा थंडीने किंवा उष्णतेने सुद्धा ओठांना भेगा पडतात. भेगा तडतडतात, रक्त येते. अश वेळी रात्री एरंड्या बारीक वाटुन त्यात थोडे दुध घालावे व ते मिश्रण ओठांना लावावे. भेगा मऊ पडून आराम वाटतो.

पीनस :

नाक ओढल्यासारखे होते. नाकातून वारंवार पांढरा अगर धुम्रवर्ण कफ निघतो. श्वासाला दुर्गंधी येते. नाकातून रक्त पडते. वास येत नाही. अशा वेळी एरंडेल तेल व थोडे तूप एकत्र करुन नाकात वरचेवर घालीत जावे.

खुपऱ्या :

डोळ्यात खुपऱ्या असतात. डोळे लाल होतात. पाणी येते. चिकटतात. लाल एरंडाचा चीक डोळ्यात घालीत जावा.

शरीरामध्ये होणाऱ्या कोणत्याही शुलावर एरंडाचा युक्तीने उपयोग करावा.

जुन्या संधिवाताचा त्रास :

तोळाभर एरंडमुळ, थोडे कुटुन अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा करावा (मंदग्नीवर). तो गाळून त्यात अर्धा चमचा मध टाकुन ते प्यावे. त्याने सांध्याची सूज कमी होते. एरंडाचाई पाने वाटून गरम करऊन सुजेवर बांधावी किंवा आस्कंदाचे वस्त्रगाळ चूर्ण पावलीभार, सांजसकाळ ३ मासे तुपातून, चारच दिवस घ्या. संधिवातचे दुखणे आटोक्यात येईल.

कावीळीवर उपयुक्त : एरंड :

एरंडाचे झाडे हे बहुतेक जागी आढळणारे आहे. याच्या बियापासून तेल काढले जाते. कुंपणासाठी व बहुधा पडिक जागेवर आढळणारे हे झाड तसे औषधोपयोगी आहे. एरंडाचा कावीळीवर फार चांगला उपयोग होतो. गोड्या एरंडाची पाने बारीक वाटून त्याची साधारण बोराएवढी गोळी करुन दुधात कालवून घ्यावी. एका आठवड्यात कावीळ बरी होते. अथवा एरंडाच्या पालाचा रस अर्धा कप सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर घ्यावा.


 

 

 

 


गाजर

Nutritious Carrot

अल्पमोली आणि बहुगुणी ‘गाजर’

खरबरीत व सुक्या त्वचेसाठी गाजराचा रस काढून तो त्वचेवर चोळल्यास त्वचा सतेज नि गुळगुळीत बनते. जेवल्यानंतर तोंड धुण्यापुर्वी गाजर चावुन खाल्यास तोंडातील जंतू मरतात. दात स्वच्छ होतात. दातात अडकलेले अन्नकण निघून जातात. हिरड्यातून रक्त येण्याचे थांबते आणि दात किडत नाही कारण गाजरात क्लोरीन व आयोडिन आणि ऍसिडयुक्त तीन घटक विपुल प्रमाणात असतात. पोटात जंत झाल्यास अनशापोटी किसलेले गाजर खावे. आतड्यावरील सूज किंवा व्रण गाजराचा रस घेतल्यानेही नाहीसे होतात. गाजराचा रस क्षय रोगाला प्रतिबंध करतो गाजराच्या रसाने स्त्रियांना मासिक पाळीत होणारा त्रास कमी होतो. गाजर वंध्यत्व दूर करण्यास मदत करते. कॅन्सरलाही प्रतिबंध करते. गाजरातील टॉकोकिनीन हा घटक मधुमेह कमी करण्यास मदत करतो. गाजरात विपुल खनिजे व अ, , , सी जीवनसत्वे असल्यामुळे असंख्य व्याधींवर ते गुणकारी आहे.


  


फलाहार व निर्विषीकरण

Fruit Diet on Poison

खाण्या-पिण्यच्या चुकीच्या सवयी वेळ-अवेळ तळलेले मसालेदार पदार्थ, अतिगोड खाणे यामुळे शरीरात अनेक प्रकारचे विषारी पदार्थ तयार होतात. वैद्यकीय परिभाषेत टॉक्सिन म्हणून ओळखले जाणारे हे पदार्थ वर्षानुवर्ष शरीरात साठून राहतात. ते शरीरातून वेळीच बाहेर काढले नाहीतर अनेक रोगांना निमंत्रण मिळते. अशी विषारी द्रव्ये शरीरातून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला निर्विषीकरण असे म्हटले जाते. यामुळे शरीरातिल अप्चनसंस्था स्वच्छ शुद्ध होत असते.

पचन संस्था शुद्ध करण्याचा सर्वात चांगला मार्ग ‘फलाहार’ आहे म्हणजेच संपूर्ण दिवस फळांचे सेवन करणे. कोणतेही दोन दिवस सातत्याने हा उपचार करावा लागतो. या दोन दिवसात आवडीचे कोणतेही एक फळ ठरवा. केळी, सफरचंद, द्राक्ष, अननस, कलिंगड असे कोणतेही फळ ऋतुमानानुसार ठरवा. दोन दिवस हेच फळ व पाणी असा आहार ठेवा. दोन्ही दिवस एकच फळ खा. चहा-कॉफी यांचेही सेवन करू नक. चहाची अगदीच तल्लफ आली तर गवती चहात मध टाकून घ्या.

या दोन दिवसात खूप भुक लागली असे वाटेल. पण त्यावर नियंत्रण ठेवा. फळे लवकर पचतात, त्यामुळे असे होते.

या काळात हलका फुलका व्यायाम करा. अधिक परिश्रमाचे काम करु नका. भरपूर आराम करा. या प्रक्रियेनंतर खूप हलके वाटेल. वजनही कमी होईल. पण यासाठी दोन दिवस आराम करण्यासारखा वेळ हाताशी पाहिजे. तसेच प्रकृतीची कोणतीही तक्रार असणाऱ्यांनी हे करण्यापूर्वी वैद्यकीय सल्लाही घेतला पाहिजे.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने

Beauty Tips from Kitchen

- सौ. नूतन प्रकाश चंगेडिया.

चेहऱ्यावर काळे डाग :

ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी एक चमचा दही, १ चमचा मसूरदाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे.

पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे :

पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे.

निस्तेज चेहरा :

चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहऱ्यावर लावणे व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते.

पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते.

गव्हाचा कोंडा :

गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात () व्हिटॅमिन असते. तो साईसकट दुधात करुन जाडसर लेप चेहऱ्यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो.

तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घेणे.

ñ   एक चमचा मध.

ñ   एक चमचा काकडीचा रस

ñ   एक चमचा संत्र्याचा रस.

हे सर्व मिक्स करुन चेहऱ्याला लावणे. १५-२० मिनिट लावणे. याचा क्रिम म्हणून उपयोग होतो.

ñ   जायफळ पाण्यत उगळून पिंपल्स व डोळ्याभोवती काळी वर्तुळ असेल तर लावावे.

ñ   टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास काळे डग व वर्तुळे कमी होतात.

ñ   पिंपल्स जास्त असेल तर कोबी किसुन त्यात जायफळ पेस्ट मिसळुन जाडसर भार चेहऱ्यावर देणे.

ñ   टोमॅटोच्या आतील गर स्मॅश करुन चेहऱ्यावर लावणे. चेहऱ्यावर चमक येते व चेहरा निखरतो.

ñ   चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर सफरचंद किसून त्यात एक चमचा कच्चे दुध टाकुन व ही पेस्ट चेहऱ्यावर लावणे.

ñ   चेहऱ्यावर पिंपल्स व पिंपल्सचे डाग असेल तर तुळशीच्या पानाचा रस १ चमचा पुदीन्याचा रस व थोडे हळद पेस्ट करून हे मिश्रण पाण्यात करुन घेणे.

ñ   सर्दी खोकला असेल तर नेपाली अमृता काढा दिवसातून दोनदा, ३ दिवस घेणे.

ñ   उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून रक्षण करण्यासाठी काकडीचा रस चेहऱ्याला लावून बाहेर पडणे.

ñ   केस गळत असेल तर जास्वंद जेलने केसांची मसाज करणे.

ñ   कोरफड जेलने केसांची मसाज केल्यास केसातील कोंडा कमी होतो व केसांना चमक येतो.

ñ   पापी तेल याने चेहऱ्याची मसाज केल्यास रोम छिद्र भरुन येतात व चेहऱ्यावरील लव कमी होते. रोज लावले तरी चालते.

ñ   चेहऱ्याव्रील व अंगावरील लव कमी होण्यासाठी पपिता पावडर, नीमा पावडर, मंजिष्ठा समप्रमाणात घेऊन त्यात पाव चमचा आंबेहळद टाकणे व त्याच्या चार पट मसूर डाळीचे पीठ टाकणे. कच्चा दुधात पेस्ट करून केसांच्या उलट्या दिशेने लावावे. पीठी ज्याप्रमाणे काढतो त्याप्रमाणे चोळावे नंतर साय / लोणी लावणे. कोल्ड क्रीम लावणे.

) म्हसूर डाळ आर्धा किलो

) आंबे हळद तोळा

) गुलाब पावडर ५० ग्रॅम

) संत्र्याची साल ५० ग्रॅम

) चंदन पावडर ५० ग्रॅम

) कडूलिंबाच्या पानाची पावडर

) वाळा ५० ग्रॅम

) मुलतानी माती ५० ग्रॅम

) पपई पावडर ५० ग्रॅम

हे सर्व मिक्स करुन बरणीत भरुन ठेवावे. पाहिजे तेवढे उटणे घेऊन कच्चा दुधात पेस्ट करणे व ती सर्व अंगास लवुन आंघोळ करणे. ज्यांची कोरडी त्वचा असेल, हिवाळ्यात अंगाची फार खाज सुटत असेल तर त्यांनी हे मिश्रण लावुन आंघोळ करावी. फार चांगले असते.

ñ   चेहरा स्वच्छ व चमकदार होण्यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण, १० मिनिट पाण्यात भिजवून चेहऱ्यावर लेप देणे.

ñ   चेहऱ्यावर सुरुकुत्या असेल तर त्यावर केशर व बदामची कच्च्या दुधात पेस्ट करुन लावणे.

ñ   मेरी गोल्ड जेल :
चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर याने मसाज करावा.

ñ   केस गळत असेल तर एक मध्यम आकाराचे डाळींब सालीसकट मिक्सरमध्ये बारीक करणे. जास्वंद फुल, १०-२० ब्राम्हीपाने, १ चमचा आवळा पावडर, मेहंदी पाने अंदाजे हे सर्व बारीक करून २०० ग्रॅम तिळाच्या तेलात लोखंडीच्या कढईत मंद गॅसवर तडतड येईपर्यंत गरम करून कोमट असतानांच एका बाटलीत भरुन ठेवावे व ते केसांना लावावे.

ñ   जांभळीची बी पिंपल्सवर लावणे.

ñ   डोक्यात उवा झाल्यास सीताफळ बीची पावडर तेलात मिक्स करुन केसांच्या मुळांन लावणे. तेल लावतांना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घेणे.

ñ   आवळा, हिरडा, बेरडा समप्रमाणात घेऊन याची पावडर करणे, यालाच ‘त्रिफळा चूर्ण’ म्हणतात.

ñ   केस गळत असेल तर :
त्रिफळा चूर्ण (दर महिन्यात २ चमचे वाढवत जाणे) रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यावे. जंत कृमी असेल तर ३ चमचे त्रिफळा चूर्ण, एक चमचा वावडींग पावडर मिक्स करुन ३ दिवस रात्री झोपतांना कोमट पाण्याबरोबर घेणे.

ñ   रोज मुठ मुठ फुटाणे खाण्याने हार्ट ऍटकचा त्रास होत नाही.

ñ   रोजच्या आहारामध्ये पुदिन्याचा वापर करावा म्हणजे पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत. सीतोपलादी चूर्ण व मध याची पेस्ट करुन चाटण घ्यावे व कोबींच्या पाण्याची वाफ घ्यावी.

ñ   चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर चेहऱ्यावर बाजरीच्या पिठाचा लेप देणे. चेहरा निखरतो.


 

 


काकडी

Cucumber

काकडीचे दोन प्रकार असतात. लहान आणि मोठी. दोन्हीचा रस उपयुक्त असतो. काकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पुष्कळ दिवस एकसारखा येणारा ताप काकडीच्या बियांच्या काट्याने निघतो.

गुणधर्म :

काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते. शरीरातील आग व चक्कर येणे नाहीसे करते.

उपयोग :

काकडीचा रस बियांसह गुणकारी आहे. रिकाम्या पोटी एक ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोगी होतो. काकडीचा उष्मांक (कॅलरीज) कमी असतात. त्यामुळे स्थुलतेवर उपयोग होतो.

फायदे :

काकडीचा संधीवात, मुत्रविकार, मधुमेह ह्यांसाठी काकडी चांगली अंगातील आग कमी व्हावी, म्हणून काकडी घेत असल्यास आंबट-गोड फळे व तेलयुक्त पदार्थ त्या प्रयोगात खाऊ नये. प्रयोग दोन महिने करावा. त्याने शरीरावरील गळवे, पुळ्य कमी होतात.

जीवनसत्वे :

बी’ ९०%


 

 

 


डोळ्यांची काळजी

Healthy Eyes

डोळे येणे :

डोळे येणे हा संसर्गजन्य आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु याचा संसर्ग कसा होतो, याबद्दल अनेक गैरसमज आहे. डोळे आलेल्या व्यक्तीकडी पाहिल्याने डोळे येतात. हा एक गैरसमज आहे. जर अशा प्रकारचा संसर्ग असता तर सर्वांचे डोळे आले असते. ज्यांचे डोळे आले आहेत त्या रुग्णाच्या डोळ्यातून येणारे पाणी यामध्ये जीवाणू असतात. असा संसर्ग होऊ नये म्हणून पुढील खरबरदारी घ्यावी.

ñ   रुग्णाने सारखा डोळ्यांना हात लावू नये, डोळे चोळू नये, यामुळे कुटुंबातील इतरांना संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

ñ   रुग्णाचे डोळे स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीनेसुद्धा डोळे स्वच्छ केल्यानंतर हात साबण लावून स्वच्छ धुवावेत.

ñ   दिवसातून ३ ते ४ वेळा स्वच्छ पाण्याने पुढील प्रमाणे डोळे स्वच्छ करावे. ग्लासभर पानी चांगले उकळुन त्यात थोडे मीठ टाकून त्यात स्वच्छ कापडाचे छोटे छोटे तुकडे टाकावेत. त्यामुळे ते कापडाचे तुकडे निर्जंतुक होतील.

ñ   डोळे आलेल्या व्यक्तीला हस्तांदोलन करू नये. तसेच त्यांच्या अधिक संपर्कात राहू नये.

ñ   डोळे आलेल्या व्यक्तीला एका कुशीवर अशा प्रकारे झोपवायचे की त्याचा निरोगी डोळा खालच्या बाजुस येईल.

ñ   स्वतःचा रुमाल, टॉवेल व अंथरुण नेहमी वेगळे ठेवावे. डोळ्यांना खाज सुटली तरी हाताचा उपयोग न करता स्वच्छ रुमालाने डोळे चोळावेत.

ñ   डोळे आलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळून घरीच आराम करावा. तसेच डोळे आलेल्या आलेल्या मुलालासुद्धा शाळेत पाठवू नये. यामुळे डोळे येण्याच्या संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होते.

आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.

 

) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. -२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.

 

) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.

 

) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यसाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवा सारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.

 

) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.

 

) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.

 

) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.

 

) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.

 

) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.

 

) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.

 

१०) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.

 

११) जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून ‘बस्स’ करा.

 

१२) जस्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.

 

१३) ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.

 

१४) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.

 

१५) मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपाना मुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.

 

१६) कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.

 

१७) व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातू च्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी पिळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.


 

 

 

 

 

 

 

 

 

 


मुलगी वयात येत आहे

कळी उमलतानाचे बदल काय असतील ?

Mulagi Vayat yet aahe

डॉ. (सौ) पद्मा राव

M.D. DGO

मुलांच्या पेक्षा मुली वयात लवकर येत असतात हा निसर्गाचा नियमच आहे. या काळात मुलीच्यात खूप बदल घडून येत असतो. पाळी येणे हा त्यांच्या शरीरात

होणारा महत्त्वाचा बदल होय. पन्नास वर्षांपूर्वी पाळी सुरू होण्याचं वय साधारणतः १५ ते १६ वर्षांच्या दरम्यानं असायचं. आता १२ वर्षांची मुलगी असताना पाळी येते असं पाहाणीत आढळून आलं आहे. पाळीचं वय इथं आधी का यावं याचं कारण समजणं तसं अवघडच आहे. पन सर्वसाधारण असं म्हणता येईल, की मेंदूच्या वाढीमुळे हा फरक होणं शक्य आहे. सभोवतालचं वातावरण आणि सात्त्विक पोषक आहारामुळे मुलींची एकुन वाढ लौकर होते आणि त्यामुळे मेंदूचीही वाढ लौकर होते. त्यामुळे शरीरातही बदल लौकर होणे साहजिकच असतं. जर १५ ते १६ वर्षांपर्यंत पाळू सुरू झाली नाही, तर मुलीच्या पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असतां

पहिली पाळी येण्यापूर्वी

पहिली पाळी येण्यापूर्वीचा जो काळ असतो त्या दिवसांत मुलींच्यात शारीरिक आणि मानसिक बदल घडून येत असतात त्याविषयी माहिती करून घेणं उद्बोधक ठरेल.

मनोव्यापारातील बदल

मुलीचं मुलासारखं बंधमुक्त वागणं कमी होत जातं आणि तिचं एका मुग्ध कलिकेत रूपांतर होऊ लागतं अल्लडपणा जातो. तिचं वागणं, बोलणं काहीसं लाजाळू होतं. आपण आता लहान राह्यलोअ नाही याची तिला पुसटशी जाणीव होऊ लागते. लहान मुलासारखं वागविलं गेलं, तर तिला राग येऊ लाग्तो. तिला आता अधिकाधिक स्वतंत्रपणे वागण्याची इच्छा होऊ लागते. कुटुंबातील मोठ्या व्यक्तिंची प्रत्येक गोष्ट मुकाट्यानं ऐकण्याचं आणि सांगितलेलं पाळण्याचं तिला नको वाटतं. एवढंच नाही, तर आपल्या घरातल्यांशी उगीचच गप्पाटप्पा करण्याचही ती टाळायला पाहाते. एकांतात राहणंच ती पसंत करू लागते. चित्रं बघत बसणं किंवा वाचीत बसणं तिला आवडू लागतं.

शारिरीक बदल

पहिला पाळीच्या सुमाराला शरीरात होणारा मुख्य बदल म्हणजे छातीची वाढ होणं आणि गुप्तेंद्रियावर लव येणं. स्तन मोठे होणं हा नैसर्गिक बदल असतो. त्याचप्रमाणे लव येणं हाही बदल नैसर्गिकच असल्यानं त्याबद्दल कोणतीही लाज मुलीनं बाळगता कामा नये. या काळात काही मुली खांदे उंचावून आणि कुबड काढून चालतात. वाढणारे स्तन लपविण्यासाठी त्या पोक काढतात. पन असं करण्यानं त्या त्यांच्या शरीराची ऐटच घालवून बसतात. काही मुली छातीचे फुगवटे लपविण्यासाठी घट्ट बॉडीज वापरतात. अर्थात त्यामुळे त्या ते लपवू शकत नाहीतच पण रक्ताभिसरण सुद्धा व्यवस्थित होत नाही. मुलींच्या स्तनाची वाढ होणे यात त्यांना लाज संकोच वाटण्याचे काहीच कारण नाही. उलट त्यांना आपल्या स्त्रीत्वाचा अभिमानच वाटायला हवा. कायमच अज्ञानी, अबोध मुलगी म्हणून राहाण्यापेक्षा प्रत्येक मुलीनं आपल्यात होणारे बदल आणि त्यांची कारणं जाणून घेण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे.

इतर आणखी बदल

पहिली पाळी येण्यापूवी काही आठवडे मुलीला पांढऱ्या रंगाचा स्त्राव जाऊ लागतो. तो पाहताच काहीजणी घाबरूण जातात. आपल्याला काहीतरी रोग झाला आहे. अशी त्यांना भिती वाटू लागते, पण हा पांढरा स्त्राव होणं अनैसर्गिक नसून या काळात तो होणारच असतो.

पाळी यावयाच्या आधी काही आठवडि ओटीपोटात दुखू लागतं, तेव्हाही काही मुली घाबरून जातात. हे दुखणं गर्भाशयाच्या आकुंचन होण्याच्या क्रियेमुळे असतं आणि ते कालक्रमानं थांबतं. काही मुलींच्या गळ्यातील थॉयराडा ग्रंथीची वाढ होते. त्यामुळं गळा फुगल्यासारखा होतो त्याला गोलाई येते. पन हे तात्कालिक असते. त्यात घाबरून जाण्यासारखे काहीही नसते हे लक्षात ठेवावे.

याच काळात होणारा आणि त्रासदायक वाटणारा एक प्रकार म्हणजे तारुण्यपिटिका पाळीपूर्वी चेहऱ्यावर या पुटकुळ्या येऊ लागतात आणि साहजिकच मुलींना याचा मनास्ताप होऊ लागतो. आपल्या दिसण्याबद्दल विशेष दक्षता या काळात मुलींना असल्यानं या पिटिका त्यांच्या सौंदर्यात बाधच आणतात. पण या पिटिका म्हणजे शरीरात होणाऱ्या बदलाचाच एक भाग असतो. एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. काही मुली या काळात लठ्ठ होऊ लागतात. अशा मुलींच्या आहारावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. पण कटाक्षानं अगदी कमी खाणं किंवा उपास करणं अशी उपाययोजना या लठ्ठपणावर कोणी करू नये. या वयात मुलीला सकस पोषक आहाराची आवश्यकता असते. फक्त खूप आहाराच्याबाहेर खाणं टाळलं म्हणजे झालं.

वयात येणाऱ्या मुलीच्या आईची जबाबदारी

मुलगी वयात येत असल्यामुळं तिच्यात होणारे मानसिक बदल प्रामुख्यानं तिच्या आईनं समजून घेतले पाहिजेत आणि तिच्याशी समजून वागलं पाहिजे. तिच्या स्वभावात बदल झाल्यामुळे तिच्यावर कोणत्याही परिस्थितीत रागवता कामा नये. तिच्या वागणुकीतील बदल आईनं स्वीकारायला हवेत. आता आपली मुलगी विकसित होत आहे. आणि ती स्त्रीत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठीच या बदलाला सामोरी जाते आहे. हे लक्षात घेऊन आईनं मुलीला आता आदराची बरोबरीची वागणूक द्यायला हवी.

प्रत्येक मुलीला, पाळी म्हणजे काय, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पाळी येणे ही अनिष्ट गोष्ट नसून ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि पाळी येणे ही एक आनंदाचीच घटना आहे. हे तिला समजावूनं दिलं पाहिजे. काही आया आपल्या मुलीला पाळी आली ही गोष्ट इतर कुटुंबियांपासून लपवून ठेवू पाहतात. साहजिक मुलींलाही ही एक शरमेचीच गोष्ट वाटू लागते. पाळी येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. उलट पाळी न येणं हीच अनैसर्गिक गोष्ट आहे. ३ ते ५ दिवस रक्तस्त्राव होणं ही एक नैसर्गिक बाब असते. आणि त्यापेक्षा जास्त दिवस रक्तस्त्राव होऊ लागला तर मात्र ते अयोग्य असतं. हे मुलींना सांगितलं पाहिजे. पाळीच्या दिवसात शरीराची स्वच्छता कशी ठेवावी हेही आईनं मुलीला शिकवायला हवं. काही मुलींच्या पोटात पाळी चालू असतांना खूपच दुखतं, काहींना फार दुखत नाही. हे दुःख तसं इतकं तीव्र नसतं. लाडावलेल्या मुली मात्र त्याचा बाऊ करतात.

पहिली एक-दोन वर्षे पाळी नियमितपणे दर महिन्याला येईलच असं नसतं. दोन किंवा तीन महिन्यांनीसुद्धा पाळी येऊ शकते. यात अनैसर्गिक असं काही नसतं. पण ही वस्तुस्थिती आईनं मुलीला सांगायला हवी. कारण पाळी दर महिना आली नाही तर मुलगी घाबरून जाते. तिच्या मनात भलते विचार येऊ लागतात. पाळी येऊन गेल्यावरसुद्धा गर्भधारणा होऊ शकते. खरं म्हणजे पाळी कधीच आली नसतानाही गर्भधारणा होवू शकते. अर्थात अशी उदाहरणं फारच कमी असतात.
माझ्याकडे, अकरा वर्षांची एक मुलगी आली. तिचं पोट वाढलेलं होतं. पण आईच्या म्हणण्याप्रमाणं तिला एकदाही पाळी आली नव्हती. तपासल्यावर ती गर्भार असल्याचं आढळून आलं. ते ऐकून आईला आश्चर्यच वाटलं. एकदाही पाळी न आल्यामुळं, मुलीचं पोट वाढलं आहे त्याचे कारण कदाचित ट्यूमर असू शकेल असं तिला वाटत होतं. त्या मुलीला एक गुटगुटीत मुलगा झाला. अर्थात अशी उदाहरणं अगदी दुर्मिळ असतात.

मुलींच्यात होणारे शारिरीक आणि मानसिक बदल जाणून घेऊन, तिच्या येऊ घातलेल्या पहिल्या पाळीच्या संदर्भात तिचं मन तयार करणं, पाळी म्हणजे काय याची माहिती करून देणं हे प्रत्येक मुलींच्या आईचं कर्तव्य आहे. पूर्वीच्या पिढीतील मुलीच्यावेळची सभोवतालची परिस्थिती वेगळी होती. एकच कुटुंबपद्धती होती. घरात खूप माणसं असायची. बायकांची एकमेकीत पाळी, लग्न, गर्भारपण, बाळंतपण या विषयांवरच्या गोष्टींची चर्चा चालू असायची, वयात येणाऱ्या मुली आपल्या बहिणींकडून ते सारं शिकत असतं. पण आता कुटुंबव्यवस्थाच बदलत गेली आहे. बहुसंख्य कुटुंब आता लहन असतात. एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येत चालली आहे. आता मुलांना आपले आई वडील एवढंच आपलं कुटुंब हे माहीत असते. आपल्या चुलत, मावस भावंडांबद्दल, काका, मामा, आत्या यांच्याबद्दल फारशी माहिती नसते अशा परिस्थितीत कुटुंबातील सगळ्या मुलांची जबाबदारी प्रामुख्यानं आईवरच येऊन पडते. साहजिकच शरीरातील बदल आणि पाळीबद्दलची भीती मुलींच्या मनातून काढून टाकण्यासाठी आईनंच संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारणं आणि योग्य रीतीनं पार पाडणं आवश्यक असतं मुलींच्या त्या संक्रमणावस्थेच्या कालात आईनं तिच्याशी हळुवारपणे, मैत्रीच्या नात्यानं वागून, विश्वासात घेऊन मुलीचं मनोधैर्य वाढविण्यासाठी झटल पाहिजे. आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आणि सर्वार्थांन परिपूर्ण अशी उद्याची स्त्री, म्हणून मुलीचं व्यक्तिमत्त्व विकसित करायला पुढं सरसावलं पाहिजे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यौवनप्रांतातलं पहिलं पाऊल !

शरीराच्या आधी मुलीच्या मनाची तयारी व्हायला हवी

youwanatala pahila paul

सौ शकुंतला गोगटे

शेती करण्याआधी शेतकरी जमीननीट नांगरून तिची सगळी मशागत करून ठेवतो. मुलगी वयात येण्यापूर्वी, स्त्री म्हणून तिचं जीवन निसर्गनियमाप्रमाणे सुरू होण्यापूर्वीच तिच्या मनाची त्यासाठी तयारी करणं, तिच्या मनाची एक मशागत करून ठेवणं हे मुख्यतः मुलीच्या आईचं, किवां आई नसल्यास मोठ्या बहिणीचं आणि शाळेतल्या तिच्या शिक्षिकेचंही काम असतं.

मुलाची पौगंडावस्था नि मुलीचं यौवन प्रांतातलं पहिलं पाऊल हे त्यांच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात. मुलांना ‘फॅक्ट्स ऑफ द लाइफ ’ बद्दल सांगणारे पुष्कळजन असतात. भाऊ असतात, मित्र असतात असल्या विषयांवर ते अगदी खुल्लमखुल्ला बोलू शकतात पण मुलीची आई जर समजा फारच सोवळ्या विचाराची असेल, तिच्या घरच्या वातावरणात मोकळेपणाचा अभाव असेल, आईच्या धाकानं तिला मैत्रिणींच्यातही फारसं मिसळता येत नसेल नी शाळेतही सेक्स एज्युकेशन मिळलेलं नसेल, तर अशी मुलगी वयात येताना अतिश्य कावरीबावरी होते, हवालदील होते, भिऊन जाते.

शंभर वर्षांपूर्वीच्या काळी, म्हणजे जेव्हा मुलगी वयात येण्यापूर्वी तिचं लग्न होत असे, बालविवाहाची प्रथ जेव्हा रूढ होती त्या काळात पहिल्यांदा नहाण आलेल्या छोट्याशा सौभाग्यवतीचं खूप कोडकौतुक केलं जात असे, त्या काळातल्या ‘न्हाणुली’ ला मखरात बसवत असत. तिच्या सासर माहेरचे किंवा अन्य जवळचे नातलग तिच्यासाठी चार दिवस चांगली चांगली स्वादिष्ट पक्वानं घेऊन येत असत. चार दिवस ती ‘अस्पृश्य’ असली तरी या कोडकौतुकाच्या बरसातीनं ती सुखावत असे. मग पाचव्या दिवशी ती स्वच्छ झाल्यानंतर मुहूर्त वगैरे पाहून तिचा गर्भाधान विधी केला जात असे. त्याकाळी न्हाणुलीचं असं कौतुक होत असे कारण पहिल्यांदा नहाण आलं म्हणजे तिच्या पतीच्या शेजेसाठी सिद्ध होत असे. या पहिल्यांदा नहाण आलेल्य न्हाणुलीचं दृश्य २२ जून १८९७ या नुकत्याच येऊन गेलेल्या चित्रपटात ‘सीताबाई चाफेकळीला नहाण आलं’ या गाण्याच्या दृश्यात आपल्या पैकी पुष्कळांनी पाहिलं असेल.

पण पुढं बालविवाहाची प्रथा बंद पडून मुलींची लग्नं उशिरा व्हायला लागली म्हणजे लग्नाच्या आधीच मुलगी वयात येऊ लागली. पण तेव्हापासून न्हाणुलीचं कौतुक पडून मुलगी वयात आलेली पाहिली की तिची आई मोठ्या काळजीत पडलेली दिसू लागे. मुलगी न्हातीधुती झाली आता एकदा वेळेवर तिचं लग्न झालं तर बरं, नाहीतर मग चुकून वाटणाऱ्या या काळजीतूनच ‘पहिली पाळी’ या घटनेकडे पाहायची स्त्रीची नजर बदलली.

माझ्या लहानपणी तर बहुतेक मुलींना पाळीबद्दल काहीच नीटशी माहिती नसे. विचित्र, अर्धवट कुतुहल मात्र खूप असे. दर महिन्याला घरातल्या पांघरूण वेगळं, कुणी त्यांना शिवयाचं नाही. त्यांची आंघोळीची मोरी पण वेगळीचं. असं दृश्य सर्रास प्रत्येक घरात दिसून असे. अशा बाईला किंवा मुलीला विटाळशी म्हटलं जाई. तो शब्दच इतका घाणेरडा होता की विटाळशी म्हणजे कुणीतरी घाणेरडी बाई असं वाटे. बायकांना आणि मोठ्या मुलींना दर महिन्याला नेमका कावळा कसा आणि का शिवतो याचं घरातल्या लहान मुलींना नेहमीच मोठं नवल वाटे. कधीतरी मोठ्या बहिणीचे रक्तानं भरलेले कपडेही नजरेला पडत. मनातून अतिशय भीती वाटे. पन कुणी नीट समजावून सांगेल तर शपथ. मग अचानक एखादे दिवशी शाळेत किंवा ‘घराबाहेर असताना परकरावर डाग पडला की बिचाऱ्या मुलीच्या फटफजितीला पारावार उरत नसे. तिल अगदी मेल्याहून मेल्यासारखे होत असे.

आपल्याला पाळी आली आहे म्हणजे काहीतरी वाईट घडलंय, आपल्या हातून काहीतरी चूक घडलीच अशा विचारानं मुलगी कानकोंडी होऊन जात असे. एकदम रक्त पाहून ती भिऊन जात असे. ‘विटाळ’ हा शब्द ऐकला की कोणती कोवळी मुलगी शहारणार नाही ?

आता अर्थातच समाज बदललाय, मुलींच्या वागण्यात खूप आत्मविश्वास आला आहे. घरातल्या वातावरणातसुद्धा प्रसन्न मोकळेपणा आला आहे. निरोध आणि लूप असले शब्द आता लहान मुलामुलींना ठाऊक असतात. सॅनिटरी टॉवेल्सच्या जाहिराती सिनेमागृहातून आणि टी. व्ही. वर सुद्धा दाखवल्या जातात. ह्या बाबतीतला इतका उघडेवाघडेपणा आणि सवंगपणा पण मनाला तितकासा सुचत नाह. हे चित्र अजून थोडं बदलायला हवं असं वाटतं. त्यासाठी काही विचार खाली मांडले आहेत.

बहुतेक शाळांतून आता शरीरशास्त्र हा विषय शिकवताना स्त्री शरीराची आणि शरीरधर्माची ओळख मुलींना करून दिली जाते. पण पुष्कळदा पाळी येऊन गेल्यावर हे शिक्षण शाळेत दिलं जातं. थोड्या मोठ्या आणि जबाबदार मुलींना हे शिक्षण देण्यापेक्षा मुलींच्या दहाव्या अकराव्या वर्षीच तिच्या शरीरधर्माची ओळख तिला करून दिली पाहिजे. सरळ आणि सोप्या पण शास्त्रीय भाषेत अशी सगली पूर्व कल्पना दिली गेली तर ती केव्हांही जास्त चांगली.

पण शाळेपेक्षाही मुलीचं मन तयार करण्याची मुख्य जबाबदारी मुलीच्या आईची आहे. “मेला बायकांचा जन्मच वाईट” म्हणूनच देवानं तिच्यामागं पाळीचा हा त्रास लावला आहे. पूर्वीचे लोक तर अशा बाईला चार दिवस अगदी अस्पर्श मानत. पण हल्ली मेला सगळाच अनाचार माजलाय असं आईच जर बोलू लागली तर मुलीलाही पाळी हे संकट वाटणारच. यापेक्षा आईनंच तिला चांगल्या शब्दात ऋतुमती होणं हे निसर्गाचं वरदान आहे असं सांगून मुलीला आपल्या पहिल्या पाळीचं स्वागत करायला शिकवलं पाहिजे.

कळीचं जसं पूर्ण विकसित फूल होतं तशीच रजोदर्शनानंतर मुलीची बाई होते. मुलगी वयात येते. निसर्गानं तिला अपत्यधारणेची जी महान देणगी दिली आहे ती स्वीकारायला ती लायक बनते. निसर्गक्रमानुसार जे घडतं ते अमंगल असेलच कसं ? म्हणून आईनंच मुलीला त्यातलं मांगल्य समजावून सांगायला हवं.

महिन्यातल्या या चार दिवसांत कोणती काळजी घ्यायला हवी, स्वच्छता कशी राखायला हवी हेही पहिल्या पाळीच्या वेळी आईनंच मुलीला सांगायला हवं. एखाद्या आईला जर हे जमत नसेल तर तिनं निदान आपल्या मुलीला विश्वासातल्या एखाद्या लेडी डॉक्टरकडे तरी जरूर पाठवायला हवं. सॅनिटरी टॉवेल्स कसे वापरले, त्यांची विल्हेवाट कशी लावावी, पाळीच्या वेळी जर विशेष त्रास होत असेल तर लाजून ती लपवून ठेवण्यापेक्षा आपल्या डॉक्टरांपाशी मोकळेपणानं बोलून उपचार घेणं किती अगत्याचं आहे हे सगळ मुलीला आपोआप कसं समजणार ? यात लाजण्यासारखे काहीही नाही. म्हणजे लाजिरवानं काहीही नाही असं मुलीला वाटायला हवं. अशी खोटी लज्जा कधी कधी किती घातक ठरते हेही आईनंच मुलीला नीट समजवायला हवं.

वयात आल्यानंतर अनिर्बंध पुरुष सहवास घडल्यास त्याचे काही परिणाम होऊ शकतील याची पण मुलीला पूर्ण कल्पना दिली गेली पाहिजे.

यौवन प्रांतात पडे पहिले पाऊल गडे !

मोहरली जिवीची अंबराई ग !

जरा हळू जपून चल बाई ग ’

अशी सूचना पण आईनं मुलीला जरूर द्यायला हवी.

पहिली पाळी येण्याआधीच ही सगळी पूर्वतयारी मनाची ही मशागत व्हायला हवी.

 

गर्भारपण

Pregnancy | सुदृढ आणि सुजाण बाळाची चाहूल

डॉ. रमण नाडकर्णी

M.D.,F.C.P.C.

स्त्री रोग तज्ज्ञ

प्रेसिडेंट, फेडरेशन ऑफ ऑबस्ट्रॅ. अँड गायनिक

सोसायटीज ऑफ इंडिया. दिल्ली

सुदृढ, सशक्त व हुशार मुले ही ज्याप्रमाणे आई वडिलांचा तसेच समाजाला आधार असतात, त्याचप्रमाणे देशाची खरी संपत्ती असतात अशी मुले ही घडवावी लागतात. त्यांची योग्य ती शारिरीकव मानसिक घडण घडविण्यासाठी आई-वडिलांच्या प्रेमाचे व आधाराचे छत्र अत्यंत जरुरी असते त्याचबरोबर प्राथमिक वैद्यकीय ज्ञानसुद्धा अत्यंत उपयोगी पडते. मुलाला जन्म देण्याच्या पद्धतीत स्त्री ही चार अवस्थेतून जाते.

पूर्वगर्भावस्था. गर्भावस्था. प्रसूती अवस्था. सुतिकावस्था.

पूर्वगर्भावस्था

लग्नानंतरचा परंतु गर्भावस्थेच्या आधीचा काळ म्हणजे पूर्वगर्भावस्था ही एक महत्त्वाची स्थिती आहे. ह्या स्थितीकडे स्त्रीची शारीरिक व मानसिक तयारी केली जाते. काही शारीरिक रोग ( हृदयरोग, मधुमेह, क्षय, रक्तक्षय ) तसेच मानसिक रोगांसाठी स्त्रीची तपासणी केली जाते. अशापैकी कुठलाही रोग आढळून आल्यास त्याचा शक्यतोवर इलाज केला जातो काही शारीरिक रोगात किंवा मानसिक रोगामध्ये जर रोग पराकाष्ठेला पोहचला असता तर अशा स्थितीत गर्भवतीला शारिरीक व मानसिक विकारांचा धोका असतो.

गर्भावस्था

गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंतचा काळ असतो, त्याला गर्भावस्था म्हणतात. सामान्यपणे गर्भावस्थेची मुदत ९ महिने व ७ दिवस एवढी असते. किंवा साधारण २८० दिवस एवढी असते. गर्भावस्था ही स्थिती डॉक्टर आणि गर्भारीण या दोघांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची स्थिती आहे. प्रसुतीमध्ये उद्‌भवणाऱ्या बऱ्याच अडचणींचा आढावा गर्भावस्थेत घेता येतो व त्याचा योग्य तो इलाज करूनशक्य तो अडचणी टाळता येतात किंवा त्यासाठी योग्य ती पूर्व तयारी करता येते.

प्रसूतीपूर्व तपासणी

स्त्रीस जेव्हा प्रथम गर्भार होणाची जाणीव होते. त्यावेळेस लगेच डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे योग्य असते. कारण गर्भावस्थेमध्ये ठारावि काळाच्या अंतराने स्त्रिची तपासनी होते . तिच्या गर्भाची वादतसेच गर्भास्थेमध्ये आढळू येणारे रोग यांचा बारकाईने अभ्यास केला जातो. अर्भकाची वाढ, गर्भाशयाची चाढ, प्रसूती मार्गाचा तपास व रक्तगट, रक्तदाब, मधुमेह तसंच प्रसूती मार्गात असणारे अडथळे वगेरे गोष्टींचा अंदाज डॉक्टरांना येतो.

गर्भवतीच्या जबाबदाऱ्या :

आहार

गर्भावस्थेत आहाराचे महत्त्व अधिक आहे. काही तज्ञांनी गर्भवती स्त्री व मूल ह्यांच्या आहाराविषयी परस्परांशी संबंध पारखताना मुलाला आईचं बांडगुळ म्हणून संबोधले आहे ही कल्पना जरी बऱ्या आयांना अजिबात रुचणारी नसती तरीसुद्धा याचा अर्थ एवढाच आहे की, मूल हे आईवर सगळ्याच दृष्टीने निर्भरित असते व त्यामुळे आई व मूल ह्या दोघांच्या आरोग्यासाठी आवश्यक तो आहार घेण्यात जबाबदारी आईवर असते.

साधारणरित्या गर्भवस्थेत स्त्रीच्या आहाराची गरज वीस टक्क्यांनी वाढते. आहार हा एकावेळी थोड असावा, परंतु थोड्या थोड्या अंतराने घ्यावा. आहार हा पौष्टिक व पचण्यास हलका असावा. खूप तिखट, तळलेले पदार्थ, उघड्यावरील पदार्थ शक्यतोवर टाळावेत रोज साधारण १ लीटर दूध अवश्य प्यावे. त्यामुळे रोजचे आवश्यक तेवढे प्रोटीन्स आणि कॅल्शियम मिळण्यास मदत होते. जर दूध आवडत नसल्यास दूधाचा कोठलाही पदार्थ घेण्यास हरकत नाही. पण रोजचे कमीत कमी १ लीटर दूध किंवा दूधाचा कोणताही पदार्थ घेणे आवश्यक आहे.

जर गर्भवती स्त्री अंडी व मांसाहार घेत असेल तर चांगला शिजवलेला व कमी तिखट असा आहार उच्चप्रतीचे प्रोटीन्स देण्यास फार उपयुक्त होतो. ह्याबरोबरच ६० ते ६५ ग्रॅम चरबी ( Fats )आणि ३०० ते ३५० ग्रॅम पिष्टमयपदार्थ ( कार्बोहायड्रेटस ) हे आवश्यक आहेत. मुबलक प्रमाणांत फळांचा रस, हिरव्या पालेभाज्या घेतल्यास यातून व्हिटॅमिन व खनीजे मिळतात. मुबलक प्रमाणात प्रवाही पदार्थ, पाणी अत्यावश्यक असते. साधारण २ लीटर पाणी व थोडेसे मीठ हे दिवसभरात घेणे आवश्यक आहे. गर्भवती स्त्रीने उपास-तापास, डाएटींग वगैरे कधीही करू नये. कारण त्याचे अनिष्ठ परिणाम होतात ते नंतर आई व मुलाला भोगावे लागतात.

दातांची निगा

दातांची योग्य ती काळजी घेणे अगत्याचे असते. दिवसातूनच कमीत कमी दोनदा रात्री झोपताना व सकाळी दात घासावे. दातांना कीड लागली असल्यास लगेच त्यासाठी योग्य ते उपचार करावेत. हिरड्यांना रोज सकाळी व रात्री मालीश करणे व खाल्ल्यानंतर गुळण्या करण्याची सवय लावून घेणे हे उत्तम.

मलित्सर्ग

रोज मलोत्सर्ग ठराविक वेळी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुबलक प्रमाणात भाज्या, फळे आणि पाणी आवश्यक आहे. जर मलोत्सर्ग नियमीत होत नसेल किंवा मलबद्धाचा त्रास असेल तर त्यासाठी मुबलक पाणी, फळे, पालेभाज्या यांचा जेवणात उपयोग करावा. जर त्यांनीसुद्धा फरक वाटला नाही तर इसबगोल, ऍग्रोलचा उपयोग करावा. भरपूर खजूर खावा. अंजीराचे सरबत उत्तम. जुलाबाचे ओषध शक्यतो टाळावे. मलोत्सर्गासाठी भारतीय पद्धतीचे संडास अधिक बरे असे प्रस्तूत तज्ञांचे मत आहे.

व्यायाम

व्यायाम हा हलका असावा. साधारपणे चालण्याचा व्यायाम असावा. वजने उचलणे तसेच पळापळीचे व्यायाम टाळावेत. घरातील हलकी कामे ९ व्या महिन्याच्या शेवटपर्यंत करण्यास हरकत नाही. गर्भार स्त्रीस प्रसववेदनाच्या वेळी ज्याप्रमाणे जोर करून मुलाला प्रसूतीमार्गाच्या बाहेर पडण्यास मदत करते त्या प्रकारच्या व्यायामची सवय गर्भवती स्त्रीस करणे ही प्रसूती लवकर होण्यास लाभदायी ठरते.

वैयक्तिक आरोग्य

रोज आंघोळ करणे, हलके, सैल व स्वच्छ कपडे घालणे आवश्यक असते. बाह्य जननेन्द्रीय पाण्याने धूवून पुसून कोरडी ठेवावीत.

स्तनांची निगा

रोज सकाळी आंघोळीच्या वेळेस स्तन व स्तनाग्रे स्वच्छ धुवावीत. काही स्त्रियांचे स्तनाग्र आत दबलेले असतात अशा परिस्थितीमध्ये प्रसूतीनंतर मुलाला स्तनपान करणे कठीण जाते म्हणून रोज आंघोळीच्या वेळेस आत दबलेले स्तनाग्र असल्यास त्यांना मसाज करून बाहेर प्रक्षेपित करावी. अंगठा व तर्जनी यामध्ये धरून कमीत कमी ७-८ वेळा फिरवावी. जर स्तनाग्रावर जखमा, खाचा असल्यास त्यात मलम लावावे. ब्रेसीयर्स ह्या साधारणपणे कापडाच्या असाव्यात. तसेच फार घट्ट न बसणाऱ्या पण स्तनांना आधार देण्यास योग्य असाव्यात.

संभोग

पहिले ५ महिने संभोग टाळावा कारण या काळात संभोग केल्याने गर्भपाताची शक्यता वाढते. तसेच शेवटचे २ महिने संबंध टाळावा. कारण योनीमार्गातील जंतू गर्भाशयापर्यंत जाण्याचा धोका असतो. मधील काळात संबंध ठेवण्याचा झाल्यास दर १५ दिवसात एखाद्यावेळीच ठेवणे योग्य आहे.

गर्भावस्थेचे किरकोळ आजार

गर्भवती स्त्रीस ही जाणीव करून द्यावयास हवी की, गर्भावस्था ही आरोग्याची एक निशाणी आहे तो रोग नव्हे.

मळमळणे व ओकाऱ्या

साधारण पन्नास टक्के गर्भवती स्त्रियामध्ये मळमळणे व ओकाऱ्या आढळून येतात. अशा ओकाऱ्याचे कारण जास्त करून मानसिक असते.

ओकाऱ्या सर्व गर्भवती स्त्रियांना होतातच असे नाही, पण जर जास्त त्रास होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट. ओकाऱ्या चालू असेपर्यंत गर्भवती
स्त्रियांनी स्वयंपाक न केलेला बरा. गोडपदार्थ, आईस्क्रिम वगैरे जास्त खावे.

छातीत जळजळणे

बऱ्याच गर्भार स्त्रियात छातीत जळजळणे आढळते. सर्वसाधारणपणे न जळजळण्यासाठी तिखट पदार्थ वर्ज्य करावेत. थंड दूध दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे. जळजळणे थांबले नाहीच तर ऍटांसीड घ्याव्यात.

मलबद्धाचा त्रास असेल तर त्यासाठी आधी नमूद केल्याप्रमाणे उपाय करावेत.

डोकेदुखी, चक्कर येणे

हे सर्वसाधारणपणे रक्तातील साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण कमी झाल्याने होते. याचा इलाज म्हणून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने काही ना काही गोड पदार्थ तोंडात टाकावा.

झोप न येणे

हा एक त्रासदायक अनुभव आहे. दुपारचे कमी झोपावे. रात्री झोपताना एक ग्लास दूध प्यावे. हलकी फुलकी पुस्तके वाचावी. कधी कधी नातेवाईक व पतीची सहानुभूतीच पुरेशी असते. जरूर पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे झोपेची औषधे घेण्यास हरकत नाही.

पायात गोळे येणे

हासुद्धा त्रासदायक अनुभव आहे. पायात गोळा येणे सर्वसाधारणपणे रात्री जास्त होते. जास्त त्रास होत असल्यास कॅल्शियम व व्हिटॅमिन बी आणि बी ६ इंजेक्शन उपयोगी पडतात.

पाठ दुखणे

साधारणपणे हॉरमोन्समधल्या फरकामुळे बऱ्याच गर्भवती स्त्रियांची पाठ दुखते. विश्रांती, पाठीचा मसाज कमरपट्टा व औषधे यामुळे बराच फरक पडतो.

गर्भावस्थेदरम्यान गर्भाशय व प्रसूतीमार्गाचा रक्तपुरवठा वाढतो व त्यामुळे प्रसूतीमार्गातील स्त्रावामध्ये वाढ होते. हा स्त्राव जर साधारण असेल तर ह्यासाठी इलाजाची गरज नाही. पण जर स्त्राव खूप होत असेल तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट आहे.

वरील गोष्टींचा एकंदरीत विचार करता असे आढळून येईल, की नियमीत प्रसूतीपूर्व जतनामुळे गर्भवतीला स्वतःमध्ये आत्मविश्वास वाटू लागतो. असा आत्मविश्वास स्त्रीचे मन व आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो. गर्भावस्थेत उद्भवणाऱ्या अडचणींची आधी चाहूल घेऊन त्याप्रमाणे इलाज केल्यास प्रसूतीसुद्धा चांगली व सुरळीत होऊ शकते. अशा प्रसूतीपूर्व जतनाची व्यवस्था साधारणपणे सर्वच मोठ्या हॉस्पिटलात असते. तिचा सदुपयोग करून घेणे हे आपल्याच हातात आहे व आपल्याला अत्यंत हिताचेही आहे.


 

 

 

 

 

 

 


शरीर स्वस्थ ठेवण्याचा मूलमंत्र

ñ   सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे व नंतर शौचास जावे.

ñ   मलमूत्र, शिंकम अश्रू, जांभई, झोप, उलटी, ढेकर, भूक, तहान, अपान वायु व श्रमाने झालेला श्वास वेग ही स्वाभाविक वेग आहेत. या वेगांना रोकु नये.

ñ   कमी खाणे हे नेहमी स्वास्थ्या करिता चांगले. भूकेपेक्षा एक पोळी कमी खाल्याने पोट ठिक राहते.

ñ   धैर्याने काम केल्यास बुद्धि ठिक राहते. पोट व बुद्धी ठीक राहिल्यास माणूस स्वस्थ राहतो.

ñ   अन्न ग्रहण केल्यावर लगेच झोपणे किंवा श्रम करणे, जेवतांना काळजी करणे, जेवतांना बोलणे व जेवल्यावर लगेच पाणी पाल्याने अपचन व अजीर्ण होते.

ñ   भूक असल्यावर न जेवणे, भूक नसल्यावर भोजन करणे, न चावता गिळणे, जेवल्यावर तीन तासाच्या आत परत जेवणे व भुके पेक्षा अधिक जेवणे प्रकृतिला चांगलेनसते. बघितल्या शिवाय पाणी पिऊ नये. जाणल्या शिवाय मित्रता करू नये, हात धुतल्या शिवाय जाऊ नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्याचा तिरस्कार करू नये. बलवानाशी शुत्रता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्वास करू नये. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधि आणि विपत्ति पासून बचाव होऊ शकतो.

ñ   अतिव्यायाम, आति थट्टा विनोद, आति बोलणे, आति परिश्रम, आति जागरण, आति मैथुन, ह्या गोष्टींचा अभ्यास असला तरी आति कारणे योग्य नाही, कारण अति करणे आज ना उद्या कष्ट कारकच ठरते.

ñ   या जगात असा कुठलाही पदार्थ नाही जो योग्य प्रमाणात व रितीने प्रयोग केल्यास औषधाचे काम करणार नाही. योग्य रितीने व योग्य प्रमाणात जेवण न केल्यास त्याचे ही विष होऊ शकते. हिवाळ्यात सकाळी उन घेणे व रात्री थंदी पासून बचाव करणे हितकारी असते. परंतू उपाशी राहणे व उशीरा पर्यंत जागणे नुकसानकारक असते.

ñ   झोपवयास जाण्या अगोदर लघवी करणे, गोड दुध पिणे, दात घासून चुळ भारणे, हात पाय धुणे, दिवसाभर केलेल्या कामावर मनन करून ईश्वराचे ध्यान करत झोपणे. मानसिक आणि शारिरिक स्वास्थासाठी हितकार असते. जेवताना आणि झोपतना मन एकाग्र असते. जेवताना सॅलेड म्हणून गाजर, मुळा, काकडी, कांदा, कोबी, कोथिंबीर, मुळ्याची पाने, पालक इत्यादी जे काही उपलब्ध असेल ते बारीक सॅलेड करून


 

 

 

 

 


बध्दकोष्ठ | Budha Koshtha

ñ   सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे नंतर शौचास जावे.

ñ   झोपतांना थंड पाणी किंवा दूध बरोबर सत इसबगोल १-२ चमचे टाकून घ्यावे.

ñ   सकाळचे जेवण झाल्यावर एक छोटी हरड घेऊन तीचे बारीक तुकडे तोंडात ठेवावे व तासभर चघळत राहावे नंतर चावून गिळून टाकवे. जेव्हा शरीर अत्यंत थकलेले असेल किंवा अशक्त, भुकलेले तहानेले असेल, पित्त वाढलेले असले अशा वेळेस हरडीचे सेवन करू नये.

ñ   रात्री झोपतांना एक कप दुधांत उकळलेले एक अंजीर व बिया काढलेले दोन मनुके चांगले चावून खावे. नंतर ते दुध सुद्धा प्यावे.अतिसार (हगवण) | Loose Motions

ñ   डाळिंबाच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात साखर टाकून हगवण थांबते.

ñ   एक पेला नारळाच्या पाण्यात एक चमचा वाटलेले जिरे टाकून प्याल्याने अतिसारात आराम येतो.

ñ   पाण्यात उकडलेली कच्ची पपई दोन-तीन दिवस खावी.

ñ   जायफळ लिंबूच्या रसात उकळून चाटावे याने शौचास साफ होते व पोटातले वायु नष्ट होतात.

ñ   एक चमचा लिंबाच्या रसात चार चमचे दुध मिसळून घेतल्यास अर्ध्या तासात आराम येतो.

 

शरीर स्वस्थ ठेवण्याचा मूलमंत्र

ñ   सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे व नंतर शौचास जावे.

ñ   मलमूत्र, शिंकम अश्रू, जांभई, झोप, उलटी, ढेकर, भूक, तहान, अपान वायु व श्रमाने झालेला श्वास वेग ही स्वाभाविक वेग आहेत. या वेगांना रोकु नये.

ñ   कमी खाणे हे नेहमी स्वास्थ्या करिता चांगले. भूकेपेक्षा एक पोळी कमी खाल्याने पोट ठिक राहते.

ñ   धैर्याने काम केल्यास बुद्धि ठिक राहते. पोट व बुद्धी ठीक राहिल्यास माणूस स्वस्थ राहतो.

ñ   अन्न ग्रहण केल्यावर लगेच झोपणे किंवा श्रम करणे, जेवतांना काळजी करणे, जेवतांना बोलणे व जेवल्यावर लगेच पाणी पाल्याने अपचन व अजीर्ण होते.

ñ   भूक असल्यावर न जेवणे, भूक नसल्यावर भोजन करणे, न चावता गिळणे, जेवल्यावर तीन तासाच्या आत परत जेवणे व भुके पेक्षा अधिक जेवणे प्रकृतिला चांगलेनसते. बघितल्या शिवाय पाणी पिऊ नये. जाणल्या शिवाय मित्रता करू नये, हात धुतल्या शिवाय जाऊ नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्याचा तिरस्कार करू नये. बलवानाशी शुत्रता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्वास करू नये. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधि आणि विपत्ति पासून बचाव होऊ शकतो.

ñ   अतिव्यायाम, आति थट्टा विनोद, आति बोलणे, आति परिश्रम, आति जागरण, आति मैथुन, ह्या गोष्टींचा अभ्यास असला तरी आति कारणे योग्य नाही, कारण अति करणे आज ना उद्या कष्ट कारकच ठरते.

ñ   या जगात असा कुठलाही पदार्थ नाही जो योग्य प्रमाणात व रितीने प्रयोग केल्यास औषधाचे काम करणार नाही. योग्य रितीने व योग्य प्रमाणात जेवण न केल्यास त्याचे ही विष होऊ शकते. हिवाळ्यात सकाळी उन घेणे व रात्री थंदी पासून बचाव करणे हितकारी असते. परंतू उपाशी राहणे व उशीरा पर्यंत जागणे नुकसानकारक असते.

ñ   झोपवयास जाण्या अगोदर लघवी करणे, गोड दुध पिणे, दात घासून चुळ भारणे, हात पाय धुणे, दिवसाभर केलेल्या कामावर मनन करून ईश्वराचे ध्यान करत झोपणे. मानसिक आणि शारिरिक स्वास्थासाठी हितकार असते. जेवताना आणि झोपतना मन एकाग्र असते. जेवताना सॅलेड म्हणून गाजर, मुळा, काकडी, कांदा, कोबी, कोथिंबीर, मुळ्याची पाने, पालक इत्यादी जे काही उपलब्ध असेल ते बारीक सॅलेड करून


 

 

 

 

 


भोजनातील हानिकारक संयोग

दुधा सोबत

दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु, हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधा सोबत हानिकारक आहेत.

 

दह्या सोबत

खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.

 

तुपा सोबत

थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते.

 

मधा सोबत

मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.

 

फणसा नंतर

पान खाणे हानिकारक असते.

 

मुळ्या सोबत

गुळ खाणे नुकसान दायक असते.

 

खीरी सोबत

खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.

 

गरम पाण्याबरोबर

मध घेऊ नये

 

थंड पाण्याबरोबर

शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गर्म भोजन घेऊ नये.

 

कलिंगडा बरोबर

पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.

 

चहा सोबत

काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.

 

माशा सोबत

दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.

 

मांसा बरोबर

मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.

 

गरम जेवणा बरोबर

थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.

 

खरबुजा बरोबर

लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दहि नुकसान कारक असते.

 

तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नयेत. ऍल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पाताळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लठ्ठपणा घालविण्याचे सोपे उपाय

Tips for Reducing Fat

- डॉ. संजीव कांबळे

तुमचा आत्मनिर्धार पक्का व मनोबल दृढ असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे. तुमची इच्छाशक्तीच प्रबल असली तर तुमचे काम फत्ते झालेच समजा. वजन कमी. करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. यात नियमितपणा तेवढा महत्त्वाचा आहे. नाहीतर सगळेच मुसळ केरात, असा प्रकार होईल. त्यामुळे प्रयत्नात सातत्य असणे आवश्यक ठरते. वजन कमी करण्यासाठी आपले वजन नेहमी मोजले पाहिजे. दरदिवशी किंवा आठवड्यातून एकदा वजन मोजले पाहिजे.

तसेच त्याची नोंदही ठेवले पाहिजे. डाएटिंग सुरु केल्यानंतर वजन कमी होण्याची गती अपेक्षाकृत जलद असते. नंतर मात्र ही गती मंदावते. त्यामुळे निराश होऊ नये. त्यानंतर मात्र वजन कमी होऊ लागते.

काय खायचे आणि किती खायचे या बाबतीतही जागरुक असले पाहिजे. परंतु पाणी जास्त पिले पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी रोज किमान ८-१० ग्लास पाणी पिले पाहिजे. पाण्यामध्ये काहीच कॅलरी नसतात. पाणी जास्त प्यायल्याने भुकही कमी लागते. पाण्यामुळे पोटही साफ राहते. सकाळी एक चमचा मधाबरोबर लिंबाचा रस आणि एक ग्लास कोमट पाणी घ्यावे. रोजच्या आहारात सॅलड, ज्यूस, कांदा, टमाटे, मूळा, गाजर, काकडी. पत्ता कोबी असावे. यात कमी कॅलरी तर असतात. तद्वतच आवश्यक जीवनसत्वेही असतात.

एकटी राहणारी व्यक्ती फ्रीजमध्ये कमी कॅलरी असलेली पदार्थ साठवू शकतात. परंतु कुटुंबासमावेत राहण्यासाठी हे शक्य होत नाही. तेव्हा डायटींग करणे कठीण होते. तेव्हा मनोनिर्धार कामी येतो. काही झाले तरी कमी खायचे हा परिपाठ पाळायचाच. आहारात तळलेले चटकार आणि गोड पदार्थ टाळावेत. जेवण करतांना आपले पूर्ण लक्ष जेवणावरच केंद्रीत करावे. वजन कमी करतांना आपल्या मित्रांशी स्पर्धा करा. रात्री हलका आहार घ्या. जेवल्यानंतर लागलीच झोपी जाऊ नका. लगेच झोपल्यास कॅलरीच खर्च होत नाहीत. डायटिंग बरोबर व्यायाम केल्यास अपेक्षाकृत वजन कमी झाल्याचे लक्षात होईल. व्यायाम करण्यापूर्वी याबाबत आपल्या डॉक्टरांकडून तुम्ही निवडलेला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, याची खात्री करु घ्या.


 

 

 

 

 

 

 


वाढती सांधेदुखी : पथ्याने व्हा सुखी

Knee Pain

- डॉ. उदय के. नेरलकर

संधीवाताच्या रोगावर पथ्यापथ्य, चिकित्सेने होणार परिणाम हा रोग्यांची सांधेदुखी कमी होण्यास अधिकच मदत होईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत.

काही सांधेदुखीचे रोगी हेज्यांनी आहारात अवेळी जेवण करणे. अल्प जेवण करणे, शिळे, रूक्ष अन्न खाणे, अवेली भोजनात जड अन्न खाणे, अत्याधिक मैथुन करणे तसेच आहारात तेल, तुपाचे प्रमान कमी असणे, विशेषतः गरीब वर्गात तेल, तुप इत्यादी प्रमाण कमी असून अत्याधिक कष्टाची, मेहनतीची कामे करावी लागतात. तसेच वाढते वय, त्यामुळे शरीरात होणारी धातूंची झीज, बलहानी, पोषणाचा, पोषकतत्त्वाचा अभाव हा गरीब वर्गात आढळतो. तसेच काही लोकांचे अत्याधिक फिरणे, धार्मिक भावात अतिउपवास करणे, मानसिक चिंता, शोक तसेच एखाद्या आजाराच्या परिणामी येणारी दुर्बलता इत्यादी कारणांमुळे सांधेदुखीही आढळते. अशा रोग्यास त्याचे पथ्य म्हणजे आहार आणि विहारातील बदल हाच होय. जसे त्यांच्या आहारात तेल, तूप इत्यादी स्निग्ध पदार्थ घेणे, धातूंना पोषक व बृहन करणारा असा मांसरस, दूध, तूप, तेल इत्यादी आहारात घेणे. तसेच विहारात कष्टाची कामे कमी करणे, योग्य असा आराम घेऊन ती करणे. इत्यादीमुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होईल. सध्या मध्यम व उच्च वर्गातील रूग्णांमध्ये वाढती सांधेदुखी घेऊन येणारे रूग्ण अतिप्रमाणात येत आहेत. त्यावरून त्यांचे निदान आम्ही करत असतांना ते बहुधा संधिवाताच्या आमवात, वातरक्त इत्यादी गंभीर प्रकारातील आढळतात.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य जनतेत कामाच्या व्यापाने व इतर कारणाने अवेळी भोजनम, विरूद्ध आहार, भूक लागली नसतांना पण जेवणे. तेल तुपाचे पदार्थ, अति स्निग्ध, जड असे भोजन करणे व लगेचच फिरणे, तसेच सदा काही ना काही खात राहाणे. नुसते पडून वा बसून राहणे. थंड कुलरसमोर वा वातानुकुलीन रूममध्ये जास्त काळ राहणे. रोज दिवसा झोपणे, लठ्ठ होण्याच्या इच्छेपोटी अति स्निग्ध पदार्थ जसे तूप, बदाम, काजू, शेंगदाणे, दूध व त्याची विकृती, बासुंदी, दही, श्रीखंड आदी खाणे. आईसक्रीम खाणे, फ्रीजचे अतिथंड पाणी सतत पिणे, रात्री कामास कंटाळून रोज भात, खिचडी खाणे अशा आहार व विहाराने दुषित अशा (विकृत आहार रस भाव) आमाची, धातूची मेदाची वृद्धी होते. त्यामुळे परिणामी लठ्ठपणा (मेदवृद्धी), आमवात (सांधेदुखी)आदि आजारांचे पाहुणे शरीरात येतात. तेव्हा अशा सांधेदुखीच्या रूगणांना त्यांचे पथ्य म्हणजे त्यांनी भूक लागल्याशिवाय जेवू नये. आहारात स्निग्ध पदार्थ, तांदळासारखे पदार्थ, दूध व त्यांची विकृती, तसेच जड अन्न इ. खाणे टाळावे. तसेच फ्रीजचे अतिथंड पाणी पिणे, थंड पेय इ. टाळावे. कोष्ण पाणी पिणे, दिवसा शरीरास शक्यतोवर सतत व्यायामात राहील असे शरीर हालचालीत ठेवणे. यातच प्रात फिरणे, घरची कामे करणे इ. पथ्यांनी वरील रोग्यास बराच फायदा होईल. तसेच सांधेदुखीत सांधे हालचालीत राहिल्याने पुढील उपद्रव होणे टळतील.

सांधेदुखीचे पथ्यापथ्य सांगताना सध्याच्या बदलत्या हवामानाचा (कालाचा) विचार पण एक प्रमुख मार्गदर्शक ठरतो. तेव्हा उन्हाळ्यात उन न पडणे, पाऊस पडणे तसेच हिवाळ्यात पाऊस पडणे वा पावसाळ्यात उन पडणे या बदलत्या वातावरणाचा शरीरावर तसेच सांधेदुखीवर प्रभाव हा पडतो. पण कालाचा परिणम टाळाणे हे अपरिहार्य आहे. त्यावर तोडगा म्हणजे आयुर्वेदातील व्यापक असा पंचकर्म उपचार, स्वस्थ वृत्त, व ऋतकालीन दिनचर्या इ. होय. तसेच काही रूग्णांत आढळणारे सांधेदुखीचे आगळे वेगळे स्वरूप म्हणजे सांध्यात ठणका असणे, दिवसा व रात्री झोप न लागणे, छोटे सांधे दुखणे, अतिशय वेदना, स्पर्श सहत्व, सार्वदेहीक दाह, दांर्बल्य पांडुता असणे, भूक न लागणे इत्यादी लक्षणे, जी श्रीमंत व सामान्य वर्गात पण आढळतात, त्यांची कारणमीमांसा लावली असता ती म्हणजे दूषित रक्ताची (वात रक्तांची) सांधेदुखी लक्षणे होत. अशा रोग्यात त्यांचा आहार विहार, आमवातातील रोग्याच्या साजेचा पण रक्ताला विदग्ध करणारा असा घडलेला असतो. असे रूग्णात मंदाग्नी असतांना जेवणे, अजीर्ण झाले तरी खाणे तसेच सांध्याची आंबलेली खारट, आंबट, गोड असे पदार्थ खाणे, त्यातच चाट भांडावरील पदार्थ अधिक सातत्याने खाणे, दही सतत खाणे, थंड पेये, फळांचा रस थंड असा पिणे, मांसाहार इ. खाणे, अति चहा पिणे, अति मद्यपान करणे, धुम्रपान करणे, रात्री जागरण करणे, अति फिरणे, तसेच उष्ण शीतकाल व्यतासात येणे इ. आहार व विहार वात व रक्त अशा दोन्ही गोष्टीस प्रकुपित व दुषित करतो. असे दुष्ट रक्त व वात संधिस्थानात , शोच, ठणका आदी पूर्वरूपात्मक लक्षणे उत्पन्न करतात. अशा रोग्यात त्यांनी आपला आहार विहार बदलला पाहिजे. व प्रामुख्याने वरील सातत्याने घडणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांच्या सांधेदुखीचे निराकरण व उपचार हा पथ्याने साधता येईल. अशा प्रकारे सांधेदुखीच्या आजारावर व इतर अनेक आजारांवर आपल्याच आहार विहारातून प्रारंभी पथ्यापथ्यानेव आयुर्वेदातील इतर व्यापक उपचाराने विजय मिळविणे सहज शक्य होईल.


 

 

 

 


निपुत्रिका पुत्रवती कशी होईल?

Being Mother

डॉ. अरविंद संगमनेरकर

M.D.,D.G.O. स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ

हल्लीच्या मुलामुलींच्या खेळण्यात कितीतरी नवीन नवीन खेळण्यांची भर पडत असते. लाकडी खेळण्यांची जागा प्लॅस्टिकच्या खेळण्यांनी घेतली. दोरी बांधून ओढायचा हत्ती, घोडे याची जागा रिमोट कंट्रोलच्या मोटारी, आगगाड्या रणगाड्यांनी घेतली. पण प्रत्येक मुलाच्या खेळण्यात एकतरी बाहुली असतेच असते. पूर्वी ठकी होती, आता प्लॅस्टिकची, डोळ्याची उघडझाप करणारी एवढाच फरक. पण खेळण्यात बाहुली असतेच असते. मुली तिला मांडीवर घेतात. झोपवतात, गाण म्हणतात. खाऊ घालतात, वेळप्रसंगी चापटपोळीही देतात!

खेळण्यातली बाहुली ही स्त्रीच्या उत्कट इच्छेचं असतं. मुलीच्या खेळण्यातली भातुकली हा तिच्या भविष्यातल्या स्वप्नांचा लुटुपुटीचा संसार असतो.

मुलगी मोठी होते. शिकते, संस्कारित होते आणि मग एक दिवस लग्न होऊन संसार करू लागते. भातुकलीच्या खेळामधला राजा-राणींचा संसार खऱ्या अर्थानं सुरू होतो. आता दुसरं स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ केव्हा येते याची वाट ती पाहते-मनातली बाहुली खेळातली ठकी वास्तवात केव्हा येईल? बाळाला कुशीत घेऊन थोपटू, त्याला पाजू, खेळवू, मोठं करू.....

एकदोन, अडीच तीन. वर्षांमागून वर्षे जातात. पण कूस उजवतच नाही. मग राजाराणीच्या संसारात धुसफूस, चिडाचीड सुरू होते. सासू-नणंदाची कुजबूज. आईचा दुःखीकष्टी चेहरा, मैत्रिणी नातेवाईकाची दृष्टी सगळे तिच्या अंगावर येऊ लागत. कोणी सुचवतं तपासून ये. माहेरचे म्हणतात तपासायला दोघंही जा. कोणात दोष आहे?... घरात सुरू होते. पती तयार होत नाही. ‘तुझ्यातच दोष आहे. वंशाचा दिवा लागणार नाही ’ अशी विषारी वाक्य झेलत तिला दिवस काढावे लागतात. जिणं नको वाटू लागते.

पण अशावेळी तिने निराश व्हायचं अजिबात कारण नाही. मूल होत नाही म्हणून नशिबाला बोल लावायचे नाहीत. अंगरिधुपारे करायचे नाहीत. मन शांत ठेवायचं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा.

हल्ली विज्ञान इतकं पुढं गेलं आहे की, निपुत्रिका पुत्रवती होऊ शकते. त्यासाठी कितीतरी वर्ष शास्त्रज्ञ झटत होते. अजूनी झटत आहेत. तेव्हा निराश का व्हायचं?

हे नवेनवे शोध आणि उपचारपद्धती विविध तऱ्हेच्या असतात. त्यांची माहिती असणं केव्हाही चांगलेच ठरतं. मूल न होणे हे काही त्या स्त्रीच्या चुकीमुळे झालेले नसतं. तेव्हा अशा स्त्रीला दोष देणं सर्वस्वी अयोग्यच उलट तिला बाकीच्यांनी, विशेषतः तिच्या पतीनं धीर द्यायला हवा दोघांनीही डॉक्टरांकडे जायला हवं आणि या उपचाराची माहिती करून घ्यायला हवी.

सर्वसाधारणपणे १० ते १५ टक्के स्त्रिया तीन वर्षांनंतरच्या वैवाहिक सुखानंतरही मातॄत्वाचं सुख अनुभवू शकत नाहीत. लग्नानंतर तीन वर्षांत जर दिवस गेले नाहीत तर त्याला सामान्यपणे वंध्यत्व म्हणतात.

तपासणी केव्हा करावी?

तीन वर्षांच्या वैवाहिक सुखानंतर, दिवस जाण्याची इच्छा असूनही कोणतंही नियोजनाचं साधन न वापरताही दिवस गेले नाहीत तर, तपासणी करून दिवस न जाण्याचं, मूल न होण्याचं कारण शोधायला हवं. अर्थात तीन वर्षाची ही मर्यादा ही लक्ष्मणरेषा नाही. कितीतरी जोडप्यांच्या बाबतीत ही कालमर्यादा बदलते. तसंच लग्नाच्यावेळी पतिपत्नींची वयं जास्त असतील तर, मात्र तीन वर्षांपर्यंतही न थांबता लगेचच तपासण्या करून घ्यायला हव्यात त्याच प्रमाणं वैवाहिक सुख, पुरुष किंवा स्त्रीमधील दोषांमुळं अनुभवाला येण कठीण जात असेल तर लगेचच तपासण्या करून घेणं चांगलं कारण यामुळे मूल न होण्याचा प्रश्न पुढं उद्‌भवणारच असतो.

गर्भधारणा कशी होते !

स्त्रीबीज व पुरुषबीज यांच्या संयोगातून गर्भधारणा होत असते हे सगळ्यांनाच माहिती आहे. स्त्री पुरुषबीजाचा संयोग गर्भनलिकेमध्ये ( फॅलोपियन ट्यूब ) होतो आणि नंतर हा गर्भ गर्भाशयामध्ये येऊन वाढीला लागतो. पाळी जर नियमित असेल, तर सामान्यता पाळीच्या चौदाव्या दिवशी किंवा चौदाव्या दिवसांच्या आसपास स्त्रीबीज निर्माण होत असतं. म्हणून पतिपत्नी संबंध या सुमाराला आला तर गर्भधारणा होण्याची शक्यता खूपच असते.

विवाहापूर्वी तपासणी

पुरुषत्वाचा किंवा स्त्रीत्वाचा अभाव असल्यामुळे लग्नानंतर येणारं वैफल्य टाळण्यासाठी, आपल्याला लक्षात येण्यासारखी विकृती आढळली तर, लग्नाआधी लगेच तपासणी करून घेतली तर त्यावर उपाययोजना करायला सुरुवात करता येते. पाळी येतच नसेल, अगदीच अनियमित असेल, स्तनांची वाढ योग्य तऱ्हेनं झालेली नसेल किंवा पुरुषांप्रमाणं स्त्रीच्या शरीरावर केसांची वाढ झालेली असेल तर याची कारण शोधून काढणं केव्हाही चांगलंच. तसंच पुरुषामध्ये दोन्ही अंडबीज अंडकोषात नसतील, स्तनांची वाढ होत असेल, दाढी मिशा योग्य प्रमाणात येत नसतील तरीही तपासणी आवश्यक ठरते. तसंच लैंगिक शिक्षण आधीपासून माहिती करून घेतले की, नंतर वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत.

कोणकोणत्या तपासण्या आवश्यक ?

वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी स्त्रीबीज निर्माण होणाऱ्या काळात पतिपत्नीसंबंध येऊ द्यावा. या गोष्टी कटाक्षान पाळूनही दिवस राह्यले नाहीत, तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या करून घ्याव्यात. डॉक्टर प्रथम दोघांचीही संपूर्ण शारीरिक व रक्त, लघवीची म्हणजेच गुप्तरोगासाठी व मधुमेहासाठीच्या तपासणी करतात, नंतर होते ती पती आणि मग पत्नीची विशेष तपासणी.

पुरुष तपासणी

() पत्नीच्या कोणत्याही विशेष तपासण्यापूर्वी पतीची वीर्य तपासणी ही सोपी, विशेष त्रास न घेता व कोणत्याही धोक्याची शक्यता नसल्यामुळे जास्त सोयिस्कर असते.

वीर्यामध्ये जर दोष आढळलाच तर, निष्कारण पत्नीच्या शस्त्रक्रिया करून तपासण्या करण्यात काहीच फायदा नसतो. म्हणून तपासणी सुरुवातीलाच करतात.

() वीर्यात दोष आढळला तर अंडबीजाच्या तुकड्याची तपासणी ( टेस्टीक्यूलर बायास्पी ) केली जाते.

() त्यावेळी अंडचीजाकडून इंद्रियाकडे जाणाऱ्या नलिकांचीही तपासणी ( व्हासोग्रफी ) सुलभत्तेनं करता येते.

वीर्य तपासणीत जर काहीही दोष आढळला नाही तर मग पत्नीच्या तपासण्यास सुरुवात केली जाते.

स्त्री-तपासणी

() लॅप्रोस्कोप

ही तपासणी लॅप्रोस्कोप नावाच्या दुर्बिणीसारख्या यंत्राच्या सहाय्याने जाते. बेंबीपाशी सूक्ष्म क्षीद्र पाडून लॅप्रोस्कोपमधून पोटात बघता येतं. यामुळं गर्भाशयाची पिशवी, तिचा आकार, स्थिती ( पालथी सरळ ) तसंच फायब्राईडसारखे ट्यूमर असल्यास तीही वैगुण्य कळू शकतात. याचबरोबर गर्भनलिका, स्त्रीबीज निर्माण करणाऱ्या ग्रंथीही ( ओव्हरीज ) बघता येतात. यामुळं स्त्रीबीज वेळच्यावेळी निर्माण होतं का ? हेही कळतं. त्याचवेळी गर्भाशयाच्या तोंडातून रंगीत औषध घालून गर्भनळ्या उघड्या आहेत का ? तेही पाहाता येतं. बंद असतील तर त्या नेमक्या कुठं बंद झाल्या आहेत ? कशामुळे बंद झाल्या आहेत ? या गोष्टीही समजू शकतात. या तपासणीमुळे पोटातील टी. बी. ट्यूमर यासारखे रोग आहेत का ? हेही समजून घेता येते.

या नंतर गर्भाशयाचं तोंड मोठं करून ( डायलेशन) क्युरेटिंग करतात. गर्भाशयाच्या आतलं आवरण काढून ते पॅथॉलाजीकल तपासणीसाठी पाठवलं जातं. या तपासणीमुळं वेळच्यावेळी स्त्रीबीज निर्मिती होते की नाही-गर्भाशयाच्या पिशवीला टी. बी. सारखा जीवघेणा विकार आहे की नाही याचा शोध घेता येतो.

लॅप्रोस्कोपी केली तरी पेशंटला त्याच दिवशी घरी जाता येतं.

लॅप्रोस्कोपीचे फायदे

() एकाच ऑपरशेनमध्ये एकाच वेळी गर्भाशयाची संपूर्ण माहिती मिळू शकते.

() त्याचवेळी क्युरेटिंगचही ऑपरेशन होऊन जातं.

() गर्भनलिकांची तोंडं उघडी आहेत की नाही हे कळू शकतं.

() वेळच्या वेळी स्त्रीबीज निर्माण होतं की नाही हे कळतं .

() गर्भनलिका लाळेसारख्या प्रवाहामुळं ( म्यूकस ) बंद असेल, तर गर्भाशयाच्या तोंडातून भरलेल्या ओषधामुळं गर्भनलिका पुन्हा मोकळी होऊ शकते.

() इंडोस्कोपिक फोटोग्रॉफी

लॅप्रोस्कोपी करताना जे प्रत्यक्षात दिसतं ते या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं कायमचं टिपून ठेवता येत आणि एखाद्या एक्सरेप्रमाणं त्यात बघून असलेला दोष सांगता येतो.

क्युरेटिंगचे फायदे

() गर्भाशयाच्या पिशवीचं सर्वसामान्य ज्ञान होतं.

() आतील आवरणाच्या पॅथॉलॉजीकल तपासणीनंतर स्त्रीबीज तयार होतं किंवा नाही हे कळतं.

() गर्भाशयाच्या पिशवीला टी. बी. सारखा विकार असेल तर त्याचे निदान होतं.

() पिशवीचं लहान असलेलं तोंड मोठं होतं.

() फायब्राईड, पॉलिपसारख्या ट्यूमरचं निदान होतं.

एक लक्षात ठेवलं पाहिजे की, क्युर्टिंग केल्यावर दिवस जातातच असं नाही. तसंच पुनः पुन्हा क्युरेटिंग करून घेतल्याने दिवस जातात असंही नाही. उलट या वारंवार होणाऱ्या क्युरेटिंगमुळेच गर्भाशयाच्या नळ्या बंद होण्याची शक्यता असते त्यामुळे कायमचे वंध्यत्व येऊ शकतं.

() हवा भरणे :

पाळी संपल्यावार गर्भाशयामुखातून गर्भाशयात हवा भरली जाते. त्यामुळे गर्भनलिकांचा मार्ग उघडा आहे की नाही याचे ज्ञान होतं. त्याचबरोबर लाळेसारख्या घट्ट द्रवानं ( म्यूकस ) गर्भनलिका बंद झाल्या असतील तर त्या पुन्हा मोकळ्या करायला मदत होते.

() गर्भाशयाच्या फोटो

या फोटोमुळे गर्भाशयाची पिशवी, गर्भनलिका यासंबंधी माहिती मिळते. त्याचबरोबर फायब्राईड पॉलीपसारख्या ट्यूमर्सची माहिती मिळते.

() संभोगानंतरची तपासणी :

संभोगानंतर काही तासांनी पत्नीच्या योनीमार्गातील व गर्भाशय मुखातील द्रवांची तपासणी करतात त्या द्रवांमध्ये असलेल्या शुक्रजंतूचे प्रमाण यामुळे कळतं.

() आणखी काही तपासण्या

यामध्ये आंतस्त्राव ( हार्मोन्स ), इस्ट्रोजीन, प्रोजेस्ट्रॉन, एफ्‌. एस्‌. एच्‌. एल्‌. एच‌. यांच्या तपासण्यांचा अभ्यास समावेश होतो.

यामध्ये स्त्रियांमध्ये निर्माण होणारे आंतस्त्राव व त्यांचं कमीजास्त होणारं प्रमाण याचं अचूक निदान करता येतं. त्याचबरोबर स्त्रीत्त्व व स्त्रीबीज निर्मिती याविषयी ज्ञान मिळू शकतं. परंतु ही तपासणी खूपच खर्चाची असते आणि ती करण्याची सोयही पुण्या मुंबई सारख्या मोट्या शहरातच आहे.

पती-पत्नीच्या तपासणीनंतर......

पती-पत्नीच्या तपासणीनंतर दोष कोणात आणि किती प्रमाणात आहे, याचा एकत्रपणे आणि साकल्यानं विचार करून त्यावर करावयाची उपाययोजना आखली जाते. दोष नेमका कुठं आहे तो नीट होईल का मूल होण्याची शक्यता किती असेल, हे डॉक्टरांकडून पती पत्नीनं समजावून घेतलं की मग पुढच्या उपाययोजना करणं सोयीचं जातं.

पुरुष-दोषावर उपाययोजना

() दोष निर्माण होऊ नयेत म्हणून उपाय : हार्निया, हायड्रोसिल, अंडगोळी अंडकोषात नसणं अशा विकारांवर वेळीच उपाय करण्यात आले म्हणजे पुढं येणारं वध्यंत्व टाळता येतं. अंडगोळी अंडकोषात नसणं यावर उपाय लहानपणीच मुलाला शाळेत घालण्यापूर्वीच करून घ्यावा. म्हणजे पुढं होणारे दुष्परिणाम टाळता येतातं. लहानपणी खेळताना, सायकलवर बसताना, कुस्ती खेळताना अंडबीजाला मार लागला असेल तर डॉक्टरांकडून उपचार करून घेणं आवश्यक असतं तसंच करकचून लंगोट बांधणं ही सवय वीर्यनिर्मितीला हानिकारक असल्यामुळे ती सवय बदलायला लावावी. वीर्य निर्मिती कमी प्रमाणात होत असेल तर लंगोट ना बांधता सकाळ संध्याकाळ दहा मिनिटं थंड पाण्यात बसावं. त्याचप्रमाणं लहानपणी होणाऱ्या गालफुगीम टॉफाईड, कावीळ यासारख्या रोगांमध्ये मुलाची नीट काळजी घ्यावी. मुलांवर योग्य संस्कार केले व सर्व गोष्टींची आरोग्य विषयक माहिती करून दिली तर अजाणतेपणी होणारे गुप्तरोग टाळता येतील.

() वीर्यनलिका बंद असल्यास उपाय : वीर्यनलिका कुठे, किती ठिकाणी व कशामुळे बंद झाली आहे याचा शोध घेऊन त्यावर उपचार करता येतात. बंद असलेला भाग काढून टाकून वीर्यनलिका परत जोडता येते. ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक व विशेष यंत्र व तंत्राच्या सहायाने ( मायकोसर्जरी ) केली गेली तर यशाचं प्रमाण खूपच वाढतं.

स्त्रीदोष उपाययोजना :

() दोष निर्माण होऊ नयेत म्हणून काळजी

लहानपणी मुलींच्यावर चांगले संस्कार केले तर व सर्व गोष्टींची आरोग्यविषयक माहिती करून दिली तर अजाणतेपणी व भीतीपोटी होणारे गुप्तरोग टाळता येतील. आईनं मुलींना स्वच्छतेची व आरोग्याची आवड निर्माण करावी.

ऍबॉर्शन घडवून आणण्याची शस्त्रक्रिया शक्यतो टाळावी. तशीच वेळ आल्यास गर्भपात तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच व चांगल्या हॉस्पिटलमध्येच करवून घ्यावा.

() निश्चित उपाययोजना

() हार्मोन्स : स्त्रीबीज जर वेळेवर निर्माण होत नसेल व पाळीही नियमित येत नसेल तर हार्मोन्सच्या गोळ्या देऊन हे घडवून आणता येतं. नवीन शोधामुळं स्त्रीबीज निर्माण होण्यासाठी हार्मोन्सची इंजेक्शन निघाली आहेत. सध्या त्याची किंमत जरी खूप असली तरी त्यांचा बऱ्याच अंशी फायदा होऊ शकतो.

() पालथ्या पिशवीवर उपाय : केवळ पालथ्या पिशवीमुळे मूल न होण हे फारच थोड्या वेळा घडतं. बऱ्याच वेळा मूल होण्यासाठी पूर्णपणे तपासण्या न करता घाईघाईनं पालथी पिशवी सरळ करण्याचं ऑपरेशन केलं जातं आणि तेच बऱ्याच वेळा बंधत्वास कारण ठरतं.

() गर्भनलिका बंद असल्यास जोड ऑपरेशन : गर्भनलिका कुठे, किती ठिकाणी व कशामुळं बंद आहेत यावर उपाययोजना करणं जास्त श्रेयस्कर ठरतं. ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक व विशेष यंत्र तंत्राच्या सहाय्यानं ( मायक्रोसर्जरी ) केली तर यशाच प्रमाण खूपच वाढतं.

() वारंवार गर्भपात होऊ नये म्हणून : याचं नेमकं कारण शोधून काढण्यासाठी बऱ्याच तपासण्या कराव्या लागतात. गर्भनलिका याच तोंड बंद असेल तर टाके घालून वारंवार होणारा गर्भपात टाळता येतो.

() मानसिक उपाय योजना : वरील सर्व उपायांबरोबर स्त्रीला धीर देणं हे तितकंच महत्त्वाचे ठरतं. काही वेळेला नुसत्या डॉक्टरीच्या व्यक्तिमत्त्वामुळेच व समजावून देण्याच्या पद्धतीनंच तसंच उत्साहाच्या दोन शब्दानीच निम्म्याहून अधिक काम झालेलं असतं.

() कृत्रीम गर्भधारणा : पुरुषाच्या वीर्यात जर दोष असेल व तो बरा न होण्यासारखा असेल तर दुसऱ्या अनाहूत डोनरचं वीर्य घेऊन कृत्रिम गर्भधारणा करता येते. अर्थात कृत्रीम गर्भधारणेच्या आधी पती पत्नी दोघानीही संमती द्यावी लागते. कृत्रीम गर्भधारणा ही पूर्णपणे गुप्तच ठेवली जात असल्यामुळं समाजाच्या दृष्टीनं पतीपत्नीचं जीवन कुठंही विस्कळीत होत नाही. पण यासाठी दोघांच्या मनाचा घट्टपणा व दोघंही समविचारी असायला हवेत

टेस्ट ट्यूब बेबी

गर्भनलिका पूर्णपणे खराब झाल्या असतील तर अशा वेळी गर्भनलिकेत गर्भधारणा करता कृत्रीम तऱ्हेने शरीराच्या गर्भधारणा करून तो गर्भ गर्भाशयाच्या पिशवीत वाढवता येतो ही पद्धती अगदी नवीनच उपलब्ध झाली आहे व जगातील फारच थोड्या हॉस्पिटलमध्ये याची सोय आहे.

काय गोष्टी करू नयेत ?

मूल होण्यासाठी साधू, बैरागी यांच्याकडून अघोरी उपचार करून घेऊ नयेत तसंच होणारं मूल हा मुलगा असावा म्हणून पुसंवेदन विधी काही ठिकाणी केला जातो. ही पूर्णपणे भोंदू समजूत आहे. पोटात वाढणारा गर्भ मुलगा की मुलगी हे, स्त्री पुरुष बीज एकत्र येत असतानाच ठरत असतं आणि आत्ताच्या शास्त्राप्रमाणं हे लिंग कोणीही आणि कोणत्याही उपायानं बदलू शकत नाही. गंडेदोरे, मंत्रताईत, साधू, संन्याशी यांच्या तथाकथित मंत्रसामर्थ्यामुळं मूल होत, ही समजूत अत्यंत चुकीची आहे. असल्या गोष्टींना कोणीही फसता कामा नये. निपुत्रिकेला पुत्रवती होण्यासाथी वर सांगितलेले वैद्यकीय उपचारच उपयोगी पडतील.

आणि एवढंही करून मूल होऊ शकलं नाही तर काय करायचं ? मुख्य म्हणजे निराश व्हायचं नाही. आजारी माणसावर आपण उपचार करता असतो. खूप काळजी घेतो. पण दुर्दैवानं त्यातूनही तो दगावला तर आपण काय करू शकणार ? दुःख मिळायलाच हवीत आणि पुढे जायला हवं. आपल्याला मूल होणार नाही अस जरी पक्क कळालं तरी निराश न होता, एका मुलाची आई होता येत नाही, तर आपल्या समाजातल्या अनेक अनाथ मुलांची आई तुम्ही होऊ शकालच की नाही ? स्त्री ही मातृहृदयी असते. प्रेम माया तिनं लावली तर अनाथांची आई होणं अवघड नाही.

देवकी होता आला नाही, तरी यशोदा होता येतंच ना ?


 

 

 

 

 

 

 

 

 


आयुर्वेदिक औषधे

Ayurvedic Medicines

आयुर्वेद (Ayurveda) हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.

आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्ध यांच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी (Dhanvantari) हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


बहुउपयोगी एरंडेल | Erandel

एरंडेल तेलाला अमृताची उपमा :

एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात. आरोग्यशास्त्रदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे. अशा वनस्पतीचा परिचय माहित असणे जरून आहे. एरंडेल तेलास अमृताची उपम दिली आहे. अंगास लावल्यास, पोटात घेण्यास डोके व तळ पायांना शांतता येण्याकरीता हे तेल अवश्य वापरतात. या तेलाच्या दिव्यानेसुद्धा डोळ्यांना थंडावा येतो. यामध्ये तांबडा अशा दोन जाती आहेत. दोन्हीहि जाती श्रेष्ठ आहेत.

गुणधर्म :

तिखट, तीक्ष्ण, उष्ण, गोड, कडू, वृष्य, जड, स्वादू, सारक आहे. वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, बस्ति, मस्तक यातील शूल दमा अनाह, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त, प्रमेह, उष्णता, वातरक्त, मेद, वृषण वृद्धी, रक्तदोष, अरुचि, कृमि, अर्श, मुत्रकूच्छ यांचा नाश करणारा आहे.

कमला ( कावीळ ) :

सर्व शरीर पिवळे झाले आहे. डोळे पिवळे आहेत, नखे पिवळी झाली. थोडाफार ताप येत असेल, यकृताची वाढ झाली आहे, अशा वेळी एरंडाच्या पानाचे कोवळे मोख व मेंदीचा पाला एकत्र वाटुन तो दुधात मिसळावा ते दूध रोज सकाळी व सायंकाळी घ्यावे अगर एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे. कसलीही कावीळ बरी होते.

शूल :

पोटात बारीक बारीक व राहून राहून दूखत असेल तर, भुक लागत नाही, अन्नाचे पचन होत नाही, अस्वस्थता वाटते. अपचन, करपट ढेकर, अन्नावर वासना नसते अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हींग, पादेलोण, व सुंठीची पूड घालून निदान चार सप्तके द्यावा.

संदिवात बरा होण्यास मदत :

- आमवात संधिवात

सांध्यांना विचंवाने दंश करावा अशा वेदना. हातापायाची हालचाल होत नाही. साध्यांना सूज, चालता येत नाही, उठता बसता येत नाही, थोडा ताप असतो, कष्ट सहन होत नाहीत, अशा वेळी रोज सकाळी रात्री अर्धा तोळा ते एक तोळा एरंड तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. एरंड तेल एरंडाच्या पानास लावून दुखाच्या सांध्यांना ही पाने बांधावी, हातपायाची हालचाल नियमित व्हावी. जितके फिरता येईल तितके फिरावे. संधिवात अगर आमवात दोन्हीहि बरे होण्यास फार मोठी मदत होते.

कंबरेचा व पाठीचा शूल :

कंबर वाकता येत नाही. पाठही दूखत असते, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कमी होत नाही. चालताना चमका मारतात. अशा वेली एरंडमुळ व सुंठ यांचा काढा करावा. या काढ्यामध्ये दोन ते तीन गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा शूल थांबतो.

गळवे :

अनेकांना गळवे होतात. लवकर फुटत नाहीत. गळवावर एरंडाची मुळी पाण्यात उगळावी व गरम करुन गळवावर लेप द्यावा. लेप सुकला म्हणजे एरंडाचे पान वर बांधावे. आराम वाटतो.

रक्तदोष :

अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे. एरंडाच्या सालीचा गंध अंगास लावावे.

झोप येत नाही, डोके गरम - विकार:

अनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. डोके गरम राहते. टाळुचा भाब गरम होतो, डोक्यावर घण मारल्यासारखे होते, सारखे डोके दुखत असते, चैन पडत नाही, विचार मालिका सुरु झाली म्हणजे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरावावे व तळपायांनाहि तेल लावावे व डोके, तळहात व तळपाय यांना एरंडाचे पान बांधवे. हि गोष्ट सातत्याने व्हावी. गुण खात्रीने येतो.

उदर :

हात, पाय, नाभी यांन सूज येते, सांधे ढिले पडतात. कंबरेपासून जड वाटते, पोट मोठे होते. अशावेळी ताजे गोमुत्र एक कप गाळुन घ्यावे व त्यात दोन तोळे एरंडेल तेल घालुन रोज घेत जावे म्हणजे जुलाब होऊन पोट साफ राहते व उदर बरा होण्यास मदत होते.

वृषण वृद्धि :

वृषणाची वृद्धि होते व हवेने भरलेल्या पिशवीसारखे वृषण लागते.या अवस्थेत सुरुवातीस एरंडेल तेलाचे सावकाश मसाज करावे व एरंडास पानतूप लावून वृषणास बांधून घट्ट पट्टा अगर लंगोट घालावा.

दमा :

सारखा श्वास लागतो. चावत नाही छाटी भरल्यासारखी वाटते. चढण चढवत नाही. अशावेळी एक पट एरंडेल तेल, दुप्पट मध एकत्र करून घेतले असता बरे वाटते. सर्वच दमेकऱ्यांना हे औषध उपयोगी पडते. त्यामुळे कोठा साफ होतो व मलाची सुद्धता झाली म्हणजे श्वास कमी होतो.

गंडमाळा :

गळ्याभोवती गाठी उठतात. त्या गाठी ओळीने येतात. क्वचित प्रसंगी त्या गाठी पिकतात. पिकण्यापूर्वी त्यास एरंडमूळ, शेवग्याचे मूळ, पळसाचे मूळ, गोमूत्र अगर तांदळाचे धुण्यात उगाळून लेप करावा व त्यावर एरंडाचे पान बांधावे. रोज नियमाने ही गोष्ट करत जावी.

ऋदयशूल :

पुष्कवेळा छातीत दुखण्याचा तक्रार असतात. सारखे बारीक छातीत दुखत असते. क्वचित बारीक कळा येतात. हे सर्व पोटातील वायुमुळे होण्याचा संभव बऱ्याच वेळा असतो. यावेळी एरंडाचा प्रथम जुलाब घ्यावा. नंतर एरंडमुळाचा काढा दोन गुंजा जवखार घालुन देत जावा. गर्भारशीबाईने नियमीतपणे एरंड तेल निदान चार दिवसांनी तरी घेत जावे. यामुळे सुलभ प्रसुती होते.

पोटासंबंधी कोणत्याही विकारावर एरंडेल तेल हे एक रामबाण औषध आहे. अगदी लहान मुलांना (जन्माला आलेल्या बालकालासुद्धा) मध आणि एरंडेल तेल देतात. हे अत्यंत चांगले रेचक आहे. इंजिनाला ज्याप्रमाणे तेल घालून साफसूफ करतात त्याप्रमाणे एरंडेल तेलाच्या विरेचनाने साध्य होते.

ओठ फुटणे :

अनेक वेळा थंडीने किंवा उष्णतेने सुद्धा ओठांना भेगा पडतात. भेगा तडतडतात, रक्त येते. अश वेळी रात्री एरंड्या बारीक वाटुन त्यात थोडे दुध घालावे व ते मिश्रण ओठांना लावावे. भेगा मऊ पडून आराम वाटतो.

पीनस :

नाक ओढल्यासारखे होते. नाकातून वारंवार पांढरा अगर धुम्रवर्ण कफ निघतो. श्वासाला दुर्गंधी येते. नाकातून रक्त पडते. वास येत नाही. अशा वेळी एरंडेल तेल व थोडे तूप एकत्र करुन नाकात वरचेवर घालीत जावे.

खुपऱ्या :

डोळ्यात खुपऱ्या असतात. डोळे लाल होतात. पाणी येते. चिकटतात. लाल एरंडाचा चीक डोळ्यात घालीत जावा.

शरीरामध्ये होणाऱ्या कोणत्याही शुलावर एरंडाचा युक्तीने उपयोग करावा.

जुन्या संधिवाताचा त्रास :

तोळाभर एरंडमुळ, थोडे कुटुन अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा करावा (मंदग्नीवर). तो गाळून त्यात अर्धा चमचा मध टाकुन ते प्यावे. त्याने सांध्याची सूज कमी होते. एरंडाचाई पाने वाटून गरम करऊन सुजेवर बांधावी किंवा आस्कंदाचे वस्त्रगाळ चूर्ण पावलीभार, सांजसकाळ ३ मासे तुपातून, चारच दिवस घ्या. संधिवातचे दुखणे आटोक्यात येईल.

कावीळीवर उपयुक्त : एरंड :

एरंडाचे झाडे हे बहुतेक जागी आढळणारे आहे. याच्या बियापासून तेल काढले जाते. कुंपणासाठी व बहुधा पडिक जागेवर आढळणारे हे झाड तसे औषधोपयोगी आहे. एरंडाचा कावीळीवर फार चांगला उपयोग होतो. गोड्या एरंडाची पाने बारीक वाटून त्याची साधारण बोराएवढी गोळी करुन दुधात कालवून घ्यावी. एका आठवड्यात कावीळ बरी होते. अथवा एरंडाच्या पालाचा रस अर्धा कप सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर घ्यावा.


 

 

 

Comments