वचनामृत


 

 काही ग्रंथ

 

परमार्थ प्रश्नोत्तरी

दासबोधातील तत्त्वज्ञान

मध्वाचार्य - मायावाद खंडन

मध्वाचार्य - प्रपंच मिथ्या अनुमान खंडन

मध्वाचार्य - उपाधी खंडन

सांख्यकारिका - गौडपाद भाष्य

शंकराचार्यकृत - शतश्लोकी

शंकराचार्यकृत - तत्त्वोपदेश

शंकराचार्यकृत - विवेकचूडामणि

श्रीमद् भगवद्‍गीता - निवडक श्लोकांवरील लेख

 श्री दासराम महाराजांचा वचन संग्रह

चिमड सांप्रदाय

हरिपाठ संकीर्तन -


 

प्रा. डॉ. के. वा. आपटे

- अल्पपरिचय -


जन्म  :  सांगली, ०९-०९-१९२९

शिक्षण  : सांगलीतील पी. एम् हायस्कूल् (सध्याचे जी. ए. हायस्कूल) आणि विलिंग्डन कॉलेज. मॅट्रिक परीक्षेत (मुंबई विद्यापीठ, १९४७) अकबरनवीस संस्कृत शिष्यवृत्ती. इंटर आर्ट्स् परीक्षेत (पुणे विद्यापीठ, १९४९) लो. टिळक संस्क्रुत श्ष्यवृत्ती. बी. ए. (ऑनर्स, १९५१) व एम्. ए. (१९५३)  या दोन्ही परीक्षेत (पुणे विद्यापीठ) प्रथम वर्ग. एम्. ए. परीक्षेत बी. डी. नातू वेदान्त पारितोषिक. पीएच. डी. (मुंबई विद्यापीठ, १९६४) विषय - ’ब्रह्मसूत्रातील बौद्ध व जैन मतांचे खंडन).

कीर्ती कॉलेज व विलिंग्डन कॉलेज (सांगली) येथे संस्कृत व अर्धमागधी भाषांचे अध्यापन.

एम्. फिल्. व पीएच. डी. साठी मार्गदर्शन म्हणून शिवाजी विद्यापीठाची मान्यता.

भारतीय तत्त्वज्ञानातील आत्मसाक्षात्काराचे मार्ग’ या निबंधास बनारस हिंदू विद्यापीठाचे बूच मेटॅफिजिक्स प्राईझ, ’मूल गेता व तिचा वक्ता’ या निबंधास प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे पारितोषिक/

पुढील पुरक्स्कार मिळाले - पाठक स्मृति प्रतिष्ठान, सांगली नगरवाचनालय, खोचीकर गौरव पुरस्कार, प्रतिष्ठा प्रतिष्ठान, ना. ह. आपटे, मातृमंदिर विश्वस्त संस्था.

लेखन  :  :संस्कृत, इंग्रजी, हिंदी व मराठी या चार भाषांमध्ये, उपनिषदे, ब्रह्मसूत्र, भगवद्‌गीता, शंकराचार्यांचे ग्रंथ, रामानुजकृत श्रीभास्ःय, मध्वाचार्यकृत खंडनत्रय, सांख्यकारिका गौडपादभाष्य, जैन व बौद्ध दर्शन, पंचदशी, रामरक्षा इ., स्तोत्रे; वाल्मिकी रामायण, आनंदरामायण, अद्‌भुत रामायण, अध्यात्म रामायण, कालिदासाची नाटके व काव्य, स्वप्नवासवदत्त, प्राकृत भाषा व मराठी भाषा, संस्कृत व प्राकृत व्याकरण, अध्यात्म, ज्ञानेश्वरांचे अभंग व अनुभवामृत, रामदासांचा दासबोध इत्यादिवर ५० नियतकालिकांतून लेख प्रसिद्ध.

ग्रंथ  :  नियतकालिकांतून ६ इंग्रजी ग्रंंथ, श्रीभाष्य, कालिदासाची नाटके, सांख्यकारिका, जैन व बौद्ध दर्शन यांवरचा प्रत्येकी १ ग्रंथ; मध्वाचार्यांचे तीन ग्रंथ, चूडामणिचरित्रामृत व चिमड संप्रदाय प्रत्येकी १, उपनिषदांअरचे ९ ग्रंथ असे एकूण ३८ ग्रंथ प्रकाशित. स्वतंत्रपणे प्रकाशित, संस्कृत भाषेतील २, प्राकृत व्याकरणावरील हिंदीतील २ ग्रंथ, ५ भाषांतरीत ग्रंथ, ४ संपादित ग्रंथ, प्रस्तावनेसह संपादित ५ ग्रंथ, प्रस्तावना, भाषांतर, टीपांसह संपादित ६ ग्रंथ, ३ स्वतंत्र ग्रंथ, ७ संतचरित्रग्रंथ, भगवद्‌गीतेवरील ५ ग्रंथ, असे एकूण ४० ग्रंथ.

दिव्यज्योति (संस्कृतमध्ये, लर्नेड इंडिया व रेफरन्स इंडिया (इंग्रजीत) आणि मराठी सारस्वत (मराठीत) या ग्रंथांत नावाची नोंद व माहिती आहे.