मुख्‍य पान

कृपया प्रथम http://www.rksmumbai.blogspot.in/ येथे भेट द्यावी, ही विनंती.


रेशनिंग कृती समितीची निर्मिती १९८८ साली झाली. रेशनच्‍या प्रश्‍नावर काम करणा-या संस्‍था-मंडळांची ती समन्‍वय समिती आहे. प्रारंभी केवळ मुंबईत असलेल्‍या रेशनिंग कृती समितीचा विस्‍तार क्रमात महाराष्‍ट्राच्‍या विविध भागांत झाला. रेशनविषयक अधिकारांविषयी जागृती, संघटन व अपेक्षित बदलासाठी रेशन दुकान, रेशन कार्यालय ते शासन असा विविध पातळ्यांवर संघर्ष हा तिचा लढ्याचा मार्ग राहिला आहे. या लढ्याचा एक धावता परिचय अन्‍यत्र करुन दिला आहे. या लढ्याच्‍या क्रमात लोकशाही अर्थपूर्ण करण्‍यासाठी जनतेला सिद्ध करणे या व्‍यापक ध्‍येयांतर्गत रेशन व अन्‍न अधिकाराच्‍या प्राप्‍तीसाठी गरजवंत जनतेला सिद्ध करणे हे ताबडतोबीचे उद्दिष्‍ट रेकृसने स्‍वीकारले. रेकृस ही संस्‍था-मंडळांची मुद्दाआधारित समन्‍वय समिती असल्‍याने किमान समजाने किमान सहमती अशीच तिची निर्णयप्रक्रिया राहिली आहे. जे तिच्‍यात आज क्रियाशील आहेत, तेच निर्णय घेणारे असतात.

 

ज्‍यांना यासंबधी अधिक समजून घ्‍यावयाचे असेल, रेकृसशी जोडून घ्‍यावयाचे असेल, त्‍यांनी ईमेल अथवा फोनवर संपर्क साधावा, ही विनंती.

 

ही वेबसाईट गुगलच्‍या सहाय्याने आम्‍ही कार्यकर्त्‍यांनी तयार केली आहे. ती अधिक उपयुक्‍त ठरावी, यासाठी तिच्‍यात सतत सुधारणा करत राहणार आहोत. तंत्र व आशय या दोन्‍ही बाबतींत आपल्‍या सूचना, मार्गदर्शन व सहाय्याची आम्‍हाला अपेक्षा आहे. 


Comments