पुण्यावर काही विनोद


मुख्य पान

 • चितळे यांच्या दुकानाला भर दुपारी आग लागली.
  चे बंब आले , पण दुकान बंद होते.
  त्यानी चितळ्यांच्या घरी फोन केला.
  चितळे म्हणाले, " दुकान ४.०० वाजता उघडेल, तेव्हा या.
  आत्ता आत जायचा प्रयत्न केला तर तुमचा अपमान होईल

 •  एकदा पाचव्या मजल्यावर रहाणार्या लेल्यांच्या मुलाचे तळ मजल्यावरच्या नेन्यांच्या मुलीवर प्रेम बसतं.संध्याकाळी कोणी नसताना भेटायचं ठरतं.

  वरती यायची खूण म्हणून लेल्यांचा मुलगा ५ रुपयाचं नाणं खाली टाकणार हे देखील ठरलेलं असतं.संध्याकाळी तो मुलगा नाणं खाली टाकतो, 

  आणी कु. नेन्यांची वाट बघत बसतो.जवळपास पाउण तासाने ती वरती येते.

  तेव्हा तो वैतागलेला असतो. त्याला समजावत ती म्हणते, "अरे मी नेन्यांची मुलगी आहे, ५ रुपये वाया जाउ नयेत,म्हणून मी ते खाली शोधत बसले "

   त्यावर तो म्हणतो "अगं मी पण लेल्यांचा मुलगा आहे,मी पैसे खाली टाकताना दोर्याने बांधून टाकले आणी आवाज झाल्याबरोबर वर खेचून घेतले"

 • फोनची बेल वाजते (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.)
  पहिला (फोन करणारा पुणेरी): हँलो...
  दुसरा : बोला.
  पहिला : देशपांडे आहेत का ?
  दुसरा(चिडून) : नाही, ते 'पावन खिंडीत' लढताहेत !
  पहिला: मग त्यांना सांगा , राजे गडावर पोहोचले. आता मेलात तरी चालेल.
  (फोन बंद)

 • काही वेळेला "खोडी" काढायचं मनात नसतं. पण ग्राहकानं अनाठायी शंका विचारुन बेजार केलं तर "इरसाल पुणेरीउत्तराची" चपराक बसते. उदा. शिट्टीवर सुरेल गाणं सादर करणारा मित्रवर्य अप्पा कुलकर्णी मुळात महाराष्ट्र बँकेत होता. त्याच्या बँकेसमोरचा रस्ता फक्त ओलांडायचा अवकाश, समोरच आणखी एक सहकारी बँक होती.  तिथलाच "चेक" घेऊन आपल्यामहाराष्ट्र बँकेतल्या खात्यात भरण्यासाठी ग्राहक  महाशय आले. 

  नेमकं काउंटरवरच्या अप्पाला त्यांनी विचारलं. "कॅश कधी होईल?"
  अप्पा म्हणाला, "उद्या बँकेला सुट्टी आहे, परवा होईल."
  ग्राहाकानं विचारलं, "का पण? समोरच्या बँकेचा तर चेक आहे. वेळ लागतोच कसा?" 

  "अहो. उद्या सुट्टी आहे...".. अप्पाचा नम्रपणा अद्याप सुटला नव्हता!
  "पण समोरच तर बँक आहे...." ग्राहक हेका सोडेना.

  मग खट्याळ अप्पाला राहवेना. तो म्हणाला, "काका, काय आहे, केवळ रस्ता ओलांडल्यावरच्या
  बँकेचा चेक आहे म्हणुन लगेचच कॅश होतो असं नसतं. प्रोसिजर असते... असं बघा."
   "काही सांगु नका, प्रोसिजर - बिसिजर!"

   "ऐका तर काका... वैकुंठ, स्मशानभुमीच्या दारातच.. समजा तुम्ही गेलात म्हणजे मेलात तर दारातच गेले म्हणुन सरणावर चढवतील का? आधी ससुनला नेतील...चेक  करतील.. घरी नेतील.. हार घालतील.. म्रुत्यु पास काढतील.. मग वैकुंठ कडे..!!"
  "कळलं..!" फणकारत ग्राहक महाशय निघुन गेले।
  अशा इरसाल प्रश्नोत्तरामुळे किंवा "न" विचारता केलेल्या - नोंदविलेल्या प्रक्रियेमुळेच पुण्याचा जिवंतपणा टिकुन आहे... पूणं कधी 'डल' होत नाही..! 
  source - मेल फौरवर्ड
   

  •