पुणेरी शब्दार्थ


मुख्य पान

केशव - साधा सरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा.
सामान - त्याची प्रेयसी.
काटा काकु - चांगली दिसणारी पण वयाने ज्यास्त.
खडकी - एकदम टुकार.
झक्कास - एकदम चांगले.
काशी होणे - गोची होणे.
लई वेळा - नक्की, खात्रीने.
चल हवा येवू दे - निघून जा.
मस्त रे कांबळे - छान, शाब्बास.
पडीक - बेकार.
मंदार - मंद बुध्दीचा.
चालू - शहाणा.
पोपट होणे - फजिती होणे.
दत्तू - एखाद्याचा हुज~या.
बॅटरी - चश्मेवाला / चश्मेवाली.
पुडी - माणिकचंद व दुसरा गुटखा.
राष्ट्रगीत वाजणे - संपणे / बंद पडणे.
पुडी सोडणे - थाप मारणे.
खंबा - दारुची / बीयरची बाटली.
पावट्या - एकदम मुर्ख.
खडकी दापोडी - हलक्या प्रतीचे.
टिणपाट - काहीच कामाचा नसलेला.
पेताड / बेवडा - खुप दारु पिणारा.
डोलकर - दारु पिवून झिंगणारा.
सावरकर - दारु पिवून झिंगणा-याला सावरणारा.
वखार युनूस - दारु पिवून ओकारी करणारा.
सोपान - गांवढंळ माणुस.
श्यामची आई - 18+ सिनेमा.
सांडणे - पडणे.
जिवात जिव येणे - गरोदर रहाणे.
पाट्या टाकणे - रोज तेच तेच काम करुन वेळ घालवणे.
भागवत - दुस-याच्या जिवावर जगणारा.
पत्ता कट होणे - शर्यतीतुन बाहेर होणे.
फणस लावणे - नाही त्या शंका काढणे.
फिरंगी - कोकाटे इंग्लीश फाडणारा.
पेटला - रागावला.
बसायचे का? - दारु प्यायची का?
चड्डी - एखाद्याच्या खुप जवळचा.
हुकलेला - वाया गेलेला.
डोळस - चष्मेवाला/ली.
यंत्रणा - जाड मुलगी.
दांडी यात्रा - ऑफीसला बुट्टी मारणे/खाडा.
चैतन्य कांडी - सिगारेट/बिडी.
चैतन्य चुर्ण - तंबाखु.
चेपणे - पोटभरुन खाणे.
कल्ला - मज्जा.
सदाशिव पेठी - कंजुष.
बुंगाट - अती वेगाने.
टांगा पल्टी - दारुच्या नशेत `आउट' झालेला.
थुक्का लावणे - गंडवणे.
एल एल टी टी - तिरळा. लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो.
घ्या श्रीफळ - जा आता घरी.
कर्नल थापा - थापाड्या.
सत्संग - ओली पार्टी.