आणखी काही पाट्या


मुख्य पान

# सूचना: दरवाज्‍या मध्‍ये थांबुन गप्‍पागोष्‍टी करू नये ही जागा व्‍यवसायाची आहे , चर्चा करण्‍याचा हाँल नाही
# आंघोळीला रोज एक बादली पानी मिळेल. ते पण ते त्या gas वर गरम करुन देतिल तेवढा.. बाथरुम मधला heater वापरायचा नाही
# रोज सकाळी चहा मिळेल. पण कप स्वत्:चा वापरावा
# रूम मध्ये पंखा नाही.
# घरातल्या अजुन कुठल्याहि facilities वापरु नये
# झेरॉक्सच्या दुकानातील पाटी- आमचे येथे सर्व भाषेतील झेरॉक्स काढून मिळतील.
# रंग ओला आहे. विश्वास नसेल तर हात लावून पहा.
# साने येथेच रहातात. उगीच भलतीकडे चौकशा करीत बसू नये.
# " येथे दणकट पायजमे मिळतील." जागाः तुळशीबागेतुन मंडईच्य बाजुला बाहेर
# "येथे एक पाय फळीवर व एक पाय रस्त्यावर ठेवून बोलू नये"
# फेरीवाल्यांनी फक्त दुपारी ३ ते ५ या वेळात आत यावे.
# आमच्या इथे हापूस आंबे, कोकम नि परकर मिळतील
# आमच्या येथे सर्व भाषांमधील झेरॉक्स काढून मिळतील
# उगीच बेल वाजवू नये. विजेचे बिल आम्ही भरतो.
# येथे जोशी राहत नाहीत. उगीच कडी वाजवू नये.
# जोशी येथेच राहतात. शेजाऱ्यांची कडी वाजवू नये.
# आमच्याकडे वस्तू विकत घेतली म्हणजे दुकान विकत घेतल्यागत वागू नये.
# बाकरवडी संपली. बर्फ़ी संपली. फ़क्त पेढे आहेत.
# "दामले शेजारी राहतात आमची बेल वाजवल्यास अपमान केला जाईल."
# 'Bajaj Scooter' वर पाठीमागे लिहिलेली एक पाटी - .."ज्या अर्थी तुम्हाला ही पाटी वाचता येत आहे, त्या अर्थी तुम्ही खूप जवळ आला आहात. तेंव्हा कृपया मागे व्हा आणि योग्य अंतर ठेऊन तुमचे वाहन चालवा."
# कुत्र्यापासुन सावधान! इजा झाल्यास भरपाई मिळणार नाहि. [!]
# आम्‍ही शाकाहारी आहोत , पण आमचा कुत्रा नाही
# कृपया येता-जाता गेट लावावे. [!]
#  सेल्समनला मनाई आत आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.[!]
# ईथे आता जोशी रहातात. २ महिन्यांपुर्वी देशपांडे घर आम्हाला विकुन गेले. [!]
# 'येथे पँटची चेन लावून मिळेल.'
# 'संत ज्ञानेश्वर मटणशॉप.' (दुकानाची पाटी.)
# '' येथे सायकल उभी केल्यास हवा काढली जाईल व दुचाकी वाहन वाहन मेन स्टँडवर लावलेले नसल्यास आडवे करुन ठेवण्यात येईल.'' - आदेशावरुन (??)
# नारायण पेठेतील एका घराबाहेर रंगवलेली पाटी (सुचना वजा धमकी) इथे कचरा टाकु नये, टाकल्यास परत केला जाईल
#एका पुणेरी खानावळी बाहेर लावलेली पाटी जेवणात कोणत्या भाज्या आहे ते अगोदरच पाहुन घ्यावे, नंतर तक्रार चालणार नाही आपले म्हणणे मालकास थोडक्यात नम्र पणे सांगावे, नोकरांशी हुज्जत घालु नये
# खानावळीमधील पाटी कृपया तोंड धुताना इतरांना त्रास होईल असे चित्रविचित्र आवाज काढु नये.
# बादशाहीत पूर्वी म्हणे अशी पाटी होती.... बशी मधे सिगारेट विझवू नये अन्यथा ash tray मधे चहा देण्यात येईल
# ही एक अफ़लातून पाटी डेक्कनजवळ आहे. - येथे लघुशन्का करू नये. प्राजक्ताची फ़ुले पडतात.
# "येथे फुसक्या फटाक्यांना वाती लावून मिळतील !!"