To get involved in our programme

व्हॉलीयंटर स्वरुपात काम करु ईच्छीता ?

posted Nov 26, 2013, 9:03 PM by Machhindra Gojame   [ updated Oct 28, 2017, 10:08 AM ]

आपण ग्रामीण विकास कामात व्हॉलींयटर म्हणून सहभाग देऊ ईच्छीत असाल तर,

आम्हास आपली मदत हवी आहे. Apply to volunteer

-------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या गावाकडे चला या संदेशातून प्रेरणा घेऊन १५ ऑगस्ट १९८३ ला ’ ग्रामीण विकास आणि सामाजिक परिवर्तना ’ बाबत बांधीलकी असणार्‍या व्यक्तींनी एकत्र येऊन पीपल्स इन्स्टिट्युट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ( ग्रामीण विकास लोक संस्था ) या संस्थेची स्थापना केली.

नैसर्गिक संसाधणांची जपणूक आणि व्यवस्थापन ही आमच्या देशाची सर्वाधिक महत्वपूर्ण गरज असून यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे यामुळे गावे सुखी आणि समृध्द झाली तरच देश समृध्द होऊ शकतो ही आमची भूमिका आहे आणि या भुमिकेशी बांधील राहून संस्था गेल्या ३० वर्षापासून मराठवाडा विभागातील लातूर उस्मानाबाद परभणी आणि नांदेड जिल्ह्यातून नैसर्गिक संसाधणे व्यवस्थापन, शेती आणि पीण्यासाठी पाणी, स्री-पुरुष समानता आणि मुलां-मुलीसाठी शिक्षण इ. विषयाच्या अनुषंगाने गावातील शेतकरी, कामकरी महिला आणि मुले या घटकांसोबत कार्यरत आहे. यानुषंगाने संस्थेने प्रामुख्याने खालील प्रकारचे कार्यक्रम यश्स्वीपणे राबविलेले आहेत.

१.      पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम.

२.     शेती आणि पीण्यासाठी पाणी.

३.     महिला सक्षमीकरण आणि महिलासाठी उपजिवीका कार्यक्रम.

४.    शालाबाह्य आणि बालकामगारांसाठी शिक्षण कार्यक्रम.

५.    बालीका विवाह प्रतिबंध कार्यक्रम.

सध्यस्थितीत संस्था खालील कार्यक्रमात कार्यरत आहे.

१.      एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील लातूर जिल्ह्यातील ३६ गावातील गावस्तरावरील सहभागींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम.

२.     हवामान बदल स्विकृतीकरन कार्यक्रम – ४ गावातून कार्यरत आहे.

नजिकच्या काळातील भविष्यातील कार्यक्रम नियोजन :

१.      हवामान बदल स्विकृतीकरन कार्यक्रम – १० गावातून कार्यान्वीत करणे.

२.     बालीका विवाह प्रतिबंध कार्यक्रम ३० गावातून कार्यान्वीत करणे.

३.     विधवा, परित्यक्ता, सिंगल पॅरेंटस आणि आपतग्रस्त पालकांच्या मुलांसाठी शिक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे.

आम्हास खालील प्रकारच्या कामासाठी व्हॉलीयंटरची आवश्यकता आहे.

१.      विविध कार्यक्रम विषयक रिपोर्ट तयार करणे.

२.     मराठीतून इंग्लीशमध्ये डाक्युमेंट अनुवादीत करणे.

३.     सी एस आर / डोनर एजन्सीशी संपर्क साधणे.

या कामी आपण आपल्या ठिकाणाहून आपल्या वेळेनुसार आम्हास मदत करु शकाल. या कामी आपली आवड असेल तर, कृपया आम्हास संपर्क करावा. Apply to volunteer

संपर्क: मच्छींद्र गोजमे, email : president.pird@gmail.com  , Ph. No. 9423077848

Website : http://sites.google.com/site/pirdlatur

बलात्कारी प्रवृतीचे समूळ उचाटण कसे होईल ?

posted Jul 8, 2009, 11:25 AM by Machhindra Gojame   [ updated Jan 1, 2013, 4:43 AM ]

सण २०१२ च्या शेवटी दिल्लीत घडलेल्या सामुहिक बलात्कारच्या घटणेने संपूर्ण देशभर उद्रेक झाला. अशा घटना पुन्हा आपल्या देशात होऊ नये यासाठी उत्स्फुर्तपणे लाखो युवकांनी देशभर रस्त्यावर येऊन निदर्शने केली. अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कडक शासन करा, फासीच्या शिक्षेची तरतुद करा, महिलांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराबाबत जब्बर कायदे करा, त्याची काटेकोर अमलबजावणी करा, जलद गतिने न्याय मिळणेसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची व्यवस्था करुन गुन्हेगारांना त्वरीत शिक्षा होईल याची व्यवस्था करा, इ. अतिशय म्हत्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या, त्यातील बहुतेक मागण्यावर सरकार सह्मत असून, त्यादॄष्टीने अमलबजावणी पण सुरु झालेली आहे. बलात्कार गुन्ह्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त काय शिक्षा देता येईल याचा त्वरीत निर्णय घेणेसाठी न्यायमुर्ति वर्मा  समिती पण नियुक्त करण्यात आली आहे.

बलात्कार गुन्ह्याच्या बाबत पोलीस, शासन आणि न्यायालये आपापली कर्तव्ये निश्चितच चोखपणे बजावतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही, पण एवढ्यावरच भागणार आहे काय ? असे आपण गॄहीत धरणार असू तर आपणच आपली फसवणूक करुन घेतो आहोत, असा याचा अर्थ होईल. २०१२ च्या शेवटी झालेल्या सामुहिक बलात्कार घटणेच्या आधी पण असे गुन्हे सर्रास घडलेले आहेत, या प्रकरणी एवढा उद्रेक होऊन ही अजून ही देशभरातून बलात्काराचे गुन्हे घडल्याच्या बातम्या येतच आहेत, याचा अर्थ काय ? “ बलात्कारी व्यक्तीला फासीची शिक्षा “ हा काही बलात्काराच्या गुन्ह्यावरील आणि मानसिकतेवरील एकमेव जालीम उपाय ठरु शकत नाही. कायद्यात तरतुद करुन बलात्कारीताला फासीची शिक्षा देण्यास हरकत असण्याचे कांहीच कारण नाही. पण ज्या-ज्या गुन्ह्यासाठी फासीच्या शिक्षेची तरतुद आहे, ते-ते गुन्हे घडतच नाहीत असे नाही ? याचे मुळ शोधले पाहिजे आणि मुळावर घाव घातला पाहिजे.

आम्ही दैनंदिन जीवनात स्त्री-पुरुष संबंधाकडे कसे पाहतो ? आणि कसे वर्तन करतो ? , यातच स्त्रीयांवर होणार्‍या सर्व प्रकारच्या अन्याय–अत्याचाराचे मूळ सापडते. मुळात आधी आम्ही मुलींचा जन्म नाकारुन, तिची गर्भात हत्या करतो आहोत ! सर्वप्रथम हे थांबले पाहिजे. मुलीचा जन्म झालाच तर, पालण-पोषण, आहार, कपडे, शिक्षण, विवाह आणि वैवाहिक जीवन या सर्व स्तरावर दुय्यम स्थान देऊन मुलगा-मुलगी असा भेदभाव करतो आहोत. केवळ भेद-भाव करणे इथच हे थांबत नाही तर “ स्त्री ही उप्भोग्य वस्तु “ आहे हे परंपरेणे आलेले दुषित विचार पुढील पीडीला पुरवण्याचे काम करतो आहोत !

घरा-घरात स्त्री-पुरुष असमानता आणि स्त्रीकडे उपभोग्य वस्तु म्हणून पाहायचे आणि बाहेर बलात्कार होऊ नयेत अशी अपेक्षा करायची, हे कांही सुसंगत नाही. सर्वसामान्यातील बहुसंख्य कुटुंबात हेच पाहण्यास मिळते, पण माझा तर असा अनुभव आहे की, बाहेर व्यासपीठावर स्त्री-पुरुष समानता आणि सहजीवन याचे समर्थन करणारे कित्येक स्त्री-पुरुष घरात मात्र नकळत का असेना ’ वंशाच्या दिव्याचीच ’ मानसिकता घेऊन वर्तन करतात आणि घरातील संबंध स्त्री वर्गाला दैनंदिन जीवनात दुय्यम स्थान देऊन वागवत असतात, या विषयाच्या अनुषंगाने नेतॄत्व करणार्‍यांची ही अवस्था तर सर्वसामान्यांचे काय ? यासाठी प्रत्येक कुटुंबातील वातावरणात ठरऊन बदल आणणे अपेक्षित आहे. आज ही किती टक्के कुटुंबातील मुलांना स्त्री-पुरुष समानता आणि सहजीवन अनुभवायला मिळते ? मुले मुद्दाम दिलेल्या शिक्षणापेक्षा अनुकरणातून अधिक शिकतात. याशिवाय ज्याप्रमाणे मुले घरातील मोठ्या माणसांचे अनुकरण करतात, त्याचप्रमाणे समाजातील सर्वसामान्य लोक पण व्यवस्था परिवर्तनातील नेतॄत्व करणारांचे अनुकरण करतात, याचे भान नेतॄत्व करणारांनी ठेवले पाहिजे.

केवळ बलात्कारच नव्हे तर स्त्रीभ्रूण-हत्या, हुंडा, हुंडाबळी, करणी-धरणी, असभ्य वर्तन, विनयभंग इ. सर्व प्रकारचे अन्याय-अत्याचार होऊच नये यासाठी मुलभूत व प्रतिबंधक उपाय काय असू शकतात ? यावर अधिक विचार करण्याची आणि त्यावर अमल होणे अधिक गरजेचे आहे. जेष्ठ विचारवंत दादा धर्माधिकारी यांनी मांडलेल्या “ स्त्री-पुरुष सहजीवन “ संकल्पनेच्या मार्गाने जाऊन मुलभुत वातावरण निर्मिती होऊ शकते, यासाठी संबंध समाजाने ठरऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजनेत सर्वप्रथम सर्वसामान्य नागरीक या नात्याने समाजात वावरत असतांनाची प्रत्येक व्यक्तीची भूमिका सर्वाधिक महत्वाची आहे.

संबंध समाजात स्त्री-पुरुष समभावाची वॄती रुजली पाहिजे, याकरिता सर्वप्रथम कुटुंबात ही वॄती रुजली पाहिजे, हे कटाक्षाने पाळले पाहिजे. यानंतर, शाळा आणि कामाची ठिकाणे या ठिकाणी पण ही वॄती जोपसण्यासाठी अजून कांही दशके तरी काम करावे लागेल तेव्हां कुठे समाजातील स्त्रीयांवरील होणारे सर्व प्रकारचे अन्याय-अत्याचार थांबतील. हे सर्व करण्यासाठी “ मानव म्हणून सर्व मानव जातीला निसर्गदत्त लाभलीले सर्व अधिकार, जागतिक मानवाधिकार घोषणा-पत्राप्रमाणे मिळालेले अधिकार आणि भारतीय राज्यघटनेने नागरिक या नात्याने सर्व स्त्री-पुरुषांना बहाल केले ’ मुलभूत अधिकार ’ हाच ’ स्त्री-पुरुष ’ समतेचा, मूळ पाया असणार आहे, हे सतत लक्षात ठेवले पाहिजे.

आम्ही आमच्या स्तरावर प्रारंभीपासूनच या दॄष्टीने प्रयत्नरत आहोत, यापुढे अधिक जोमाने आणि व्यापकतेने याप्रश्नी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या परिसरातील शाळा-कॉलेजस आणि गावां-गावांच्या स्तरवर कार्यरत राहणार आहोत, याकरिता या विषयाच्या अनुषंगाने राज्यस्तरावर आधीपासूनच कार्यरत असलेल्या संस्था, संगठना आणि व्यक्ती यांचे सहकार्य घेणार आहोत. यानुषंगाने आपला सहभाग अपेक्षित आहे, आम्ही आपल्या प्रथिसादाची अपेक्षा करत आहोत. कळावे.

 

मच्छींद्र गोजमे,अध्यक्ष,

                                            942307784

                                          ग्रामीण विकास लोक संस्था (PIRD) ,

                                   कराड नगर, नांदेड रोड,अहमदपूर, जि. लातूर

president.pird@gmail.com

1-2 of 2