लग्न


विवाह पूर्व खरेदी

             साखरपुड्यानंतर साडी खरेदी ह्यासाठी देखील अगोदर दोन्ही बाजूकडील मंडळी एकत्रितपणे जाऊन एकमेकांच्या पसंती ने खरेदी करायचे.आता वेळेची कमतरता व प्रवास करणे जिकीरीचे यास्तव वधु आपली निकटतम घेऊन जाते व साड्या,दाग-दागिने खरेदी केले जातात. वर पक्षाला सुट शिवण्यासाठी ठराविक रक्कम ठरविलेली असते ती दिली कि ज्याचे तो सर्व पाहतो.

विवाह सोहळा- पुण्याह वाचन


             विवाह कार्यालयावर जाताना वधुवरांनी आपापल्या कुल deivate   ला व वडील माणसाना नमस्कार करून बाहेर पडायचे असते.वरा सोबत कर व तळी घेऊन बाहेर पडायचे.वधु-वर कार्यालय जवळ आल्यावर त्यांच्या अंगावरून नारळ ओवाळून टाकतात. थोडक्यांत वाटेत कुणाची  दृष्ट वगैरे लागली असेल म्हणून वर कार्यालयात  आल्यावर प्रवेशद्वारापाधी वधु कडील मंडळींनी त्याचे औक्शन करायचे.म्हणजे पाय धुवून आरती ओवाळायची व अगरबत्तीचे  भस्म वराच्या कपाळी लावायचे.वराने आरतीत काहीतरी धन टाकायचे.आपल्या पद्धतीत मुलीचे पुण्यवचन म्हणजे देवक ठेवणे प्रथम केले जाते.रत्नागिरी भागात मुलाचे देवक ठेवून उष्टी हळद मुलीकडे पाठवतात.
             देवक ठेवताना चार पाट यजमान,यजमानीन,वधु अथवा वर व धेडा  किंवा धेडी यांच्यासमोर मांडतात.शक्यतो पूर्वाभिमुख असावेत.त्यावर चादर बाजूस भटजीचा पाट.समोर दोन कलश पाणी भरून  त्यात आंब्याचा टाळ व नारळ.बाजूस गणपतीचा नारळ.देवाचा पाच नारळाचा घाणा व इतर पाच नारळाच्या ओट्या.मूळभूमिका, मावलेवस व इतर देव देवतांचा समावेश असतो.परडी मध्ये पांढरा कपडा घालून त्यांत कुळाची फांदी (पळस,वड.कलम.सोनवेल अशा प्रकारे ज्यांचे कुळ असेल तो) ठेवली जाते.हिरवा  खण.नारळ असतोच.पराशर गोत्र असणारे चाकू किंवा सुरी कुळाच्या परडीत ठेवतात.समई लावली जाते.सर्व तयारी झाली की वधु कडील मंडळीस बोलावून  पुण्याहवाचनास सुरुवात करतो असे सांगितले जाते.प्रथम सर्व देवदेवतांना आवाहन करून शुभकार्यात सामील व्हा असे गाऱ्हाणे  घातले  जाते.त्यावेळी पाटा बाहेर उभे राहून आप्तेष्ट मंडळीसह हे गाऱ्हाणे होते.

 

विवाह सोहळा- पुण्याह वाचन 

              विवाह कार्यालयावर जाताना वधुवरांनी आपापल्या कुलदैवतेला व वडील माणसाना नमस्कार करून बाहेर पडायचे असते.वरा सोबत कर व तळी घेऊन बाहेर पडायचे.वधु-वर कार्यालय जवळ आल्यावर त्यांच्या अंगावरून नारळ ओवाळून टाकतात. थोडक्यांत वाटेत कुणाची  दृष्ट वगैरे लागली असेल म्हणून वर कार्यालयात  आल्यावर प्रवेशद्वारापाशी  वधु कडील मंडळींनी त्याचे औक्षण  करायचे.म्हणजे पाय धुवून आरती ओवाळायची व अगरबत्तीचे  भस्म वराच्या कपाळी लावायचे.वराने आरतीत काहीतरी धन टाकायचे.आपल्या पद्धतीत मुलीचे पुण्यवचन म्हणजे देवक ठेवणे प्रथम केले जाते.रत्नागिरी भागात मुलाचे देवक ठेवून उष्टी हळद मुलीकडे पाठवतात.
               देवक ठेवताना चार पाट यजमान,यजमानीन,वधु अथवा वर व धेडा  किंवा धेडी यांच्यासमोर मांडतात.शक्यतो पूर्वाभिमुख असावेत.त्यावर चादर बाजूस भटजीचा पाट.समोर दोन कलश पाणी भरून  त्यात आंब्याचा टाळ व नारळ.बाजूस गणपतीचा नारळ.देवाचा पाच नारळाचा घाणा व इतर पाच नारळाच्या ओट्या.मूळभूमिका, मावलेवस व इतर देव देवतांचा समावेश असतो.परडी मध्ये पांढरा कपडा घालून त्यांत कुळाची फांदी (पळस,वड.कलम.सोनवेल अशा प्रकारे ज्यांचे कुळ असेल तो) ठेवली जाते.हिरवा  खण.नारळ असतोच.पराशर गोत्र असणारे चाकू किंवा सुरी कुळाच्या परडीत ठेवतात.समई लावली जाते.सर्व तयारी झाली की वधु कडील मंडळीस बोलावून  पुण्याहवाचनास सुरुवात करतो असे सांगितले जाते.प्रथम सर्व देवदेवतांना आवाहन करून शुभकार्यात सामील व्हा असे गाऱ्हाणे  घातले  जाते.त्यावेळी पाटा बाहेर उभे राहून आप्तेष्ट मंडळीसह हेगाऱ्हाणे होते.वडील मंडळीना नमस्कार करून पुढील कार्यास सुरुवात होते.सवाष्ण बोलावून हळद कुंकू लावून कार्यास सुरुवात करतात.धेडा धेडीचा मान प्रथम.यजमानातर्फे सर्व पूजा होते.यजमानीन त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराला  उजवा हात लावून मी तुमच्या बरोबर आहे हे सूचीत करते. यजमानीन उपस्थित नसल्यास यजमान सुपारी लावून विधी करतात.गणेश पूजन,कलश पूजन इ. झाल्यावर देवकाची पूजा होते.यजमानीन हातात समई घेऊन देवक ठेवायच्या खोलीकडे निघतात. यजमान हातात देवकाची परडी घेऊन मागून असतो व त्याच्या मागे करवल्या करा  व तळी घेऊन असतात.गणेश पूजन,कलश पूजन इ. झाल्यावर देवकाची पूजा होते.यजमानीन हातात समई घेऊन देवक ठेवायच्या खोलीकडे निघतात. यजमान हातात देवकाची परडी घेऊन मागून असतो व त्याच्या मागे करवल्या करा  व तळी घेऊन असतात.
 
           देवकाची स्थापना करून झाल्यावर तेथे गाऱ्हाणे घातले जाते.नंतर मुहूर्तमेढीची पूजा होते. मूहूर्त मेढ म्हणजे शेवरिची काठी. तिला कपड्यांत  नाण्यांसहित सुपारी व आंब्याचाटाळ बांधतात. नंतर आंब्याची दोन पाने घेऊन मुहूर्तमेढीला हळद चढवतात.परत पुण्यवचनाच्या जागी सर्व मंडळी  येतात. आता वेळ असते घरचा आहेर करण्याची.यजमानाला   कपडे,यजमानणीस साडी-ब्लाउज,नावरयास  विडा व धेड्यास नारळ असा  आहेर घरच्या माणसाने प्रथम करायचा   असतो.ह्यावेळी प्रथम धेड्याचा   मान. म्हणून त्याला कुंकू लावून मग वाढू/वर ,यजमानीन व शेवटी यजमान असा  क्रम असतो.पुरुष मंडळीस फक्त कुंकू लावतात.ह्यावेळी अगदी जवळचे नातलगसुध्दा aher  करतात.पाहुणे मंडळानी आहेर केल्यावर  त्यांना नारळ देऊन त्यांचा मान राखला  जातो. 
 
घाणे भरणे  - निम सांडणे
 
            आहेर झाल्यावर घाणे भरणे होते.येरवाणात असलेला नारळ काढून ठेवून पाच मुसळे आणली जातात.आता एकाच मुसळावर काम भागविले जाते.पाच सवाष्ण  ते मुसळ येरवाणात ठेवतात.तळीवाली  मुसळावर तळी धरते.वर/वधूने दोन हाताने मुसळ धरायचे व तांदूळ कांडण करायचे.ह्यावेळी देखील ओव्या म्हटल्या जातात.नंतर मुसळ बाहेर काढून येरवाणातील तांदूळ वर/वधूने घाणे भरण्यास आलेल्या सवाष्णीच्या  पदरात पसा भरून  टाकायचे.हा त्यांचा मेहनताना असोत.त्या परत हे तांदूळ येरवाणात ओततात  .घाणे भरून झाले कि देवकाचे काम संपते.ह्या विधीस एक तास लागतो.पण शेवटी सर्व भटजीवर  अवलम्बून.

            नंतर वधु /वर निम सांडन्यास  जातात.निमाच्या काठ्या चार असतात.शक्यतो शेवरीच्या.त्या वरच्या टोकास एकत्र बांधून त्यावर ओटी बांधतात.एका काठीच्या टोकास पाच वडे अडकवतात.प्रथेम वधु/वर पाच सवाष्णी सह  निम सांडण्याच्या जागी येतात.निमाच्या काट्यांचा चौकोन करून त्यामध्ये पाट ठेवतात.त्या मांडणी भोवती पुढे तळी,मग वधु/वर त्यामागे  करेवाली व मागून इतर अशा क्रमाने पाच फेरया होतात.

             चालताना वधु/वराने मागे पाहायचे नसत.कारेवली त्याच्या पायावर कार्य तील थोडे थोडे पाणी धारेने ओतत असते.नंतर वधु/वरांस  त्या पाटावर बसविले जाते.ह्यावेळी त्या काट्यांना  स्पर्श करू नये असा संकेत आहे. करेवाली वर बांधलेल्या ओटीवर करयातील पाणी   ओतते.ते वधु/वरांच्या डोक्यावर पडते.नंतर त्यांनी पूर्ण  आंघोळ  करून खोलीत यायचे असते.येण्या अगोदर वधु/वरांचे मामा सुरी अथवा कोयता घेऊन त्या काठ्या  तोडून टाकतो.आंघोळ करताना  घातलेले कपडे वधु/वराने तेथेच सोडून  द्यायचे असतात.घरात   येण्यापूर्वी मामा वधु/वरांच्या मागे उभा राहतो.वधु/वराच्या हातात विडा दिला जातो व वाडवडिलांच्या पुण्याईने निम गेला असे म्हणून तो विडा मागे टाकायचा असतो.थोडक्यांत या विधीचा अर्थे त्यांचे कुवारपण आज पासून संपले .त्यावेळी पूर्वजांची आठवण मामांच्या साक्षीने केली जाते.हा विधी अविवाहीतांनी  पाहू नये असा संकेत आहे.
 
जान वसा - सीमांत पूजन  
          विवाह मुहूर्ताच्या साधारण अर्धा तास अगोदर जानवसा होतो. पूर्वी विवाह सर्व साधारण मुलीच्या घरी व्हायचा तेव्हा वर  पक्षाचे स्वागत करण्याचे ठिकाण म्हणजे जानवसा. गावी मंडपाच्या बाहेर डाळी घालून हा विधी करतात तर मुंबईत कार्यालयात स्टेजच्या बाजूस.प्रथम वराचे स्वागत करून त्यास खुर्चीवर/ पाटावर बसवतात.यजमानाने वराचे पाय धुवून उपरण्याने पुसून त्यावर स्वस्तिक काढायचे. यजमानीन वरास कुंकू अक्षता लावून आरती ओवाळते.नंतर  करवली रुखवत आणते.हे रुखवत म्हणजे  ताटात ठेवलेला मिठाईचा पुडा.तो उघडून ती वराला व धेड्याला मिठाई भरवते  .वधुपक्षाकडून तो पुडा घेऊन,रुखवताचा मान म्हणून  करवलीला वस्त्र अथवा पैसे  दिले जातात. वधु पक्षाकडून वराला देण्यात  येणारे कपडे (सूट-बूट) आता दिले जातात.बरोबर साडे  आणलेली असतात.साडे म्हणजे वधूस दोन साड्या - एक शालू व एक हिरवी साडी. एका परातीत तांदूळ,पाच नारळ,दोन साड्या.ओटीचे सामान व वेणीचा सड  ,गजरे इ..काही  वेळा वर बाशिंग बांधून आलेला असतो.हे बाशिंग गणपतीचे खाली व सरस्वतीचे वर असे बांधतात. काही वेळा जानवाशाचे वेळी पूजा करून बाशिंग बांधतात.मुहूर्त मणी ओवणे हा विधी  अन्यंत महत्वाचा व वराच्या कसोटीचा असतो.पाच काळे मणी.सोन्याचा मुहूर्तमणी व परत पाच काळे मणी असा क्रम असतो.घाई,  थरथरणारे  हात यामुळे हे मणी ओवणे फार जिकीरीचे असते. यास्तव हल्ली हे अगोदरच ओवून ठेवतात.वधूला घालवायचे दागिने (जोडवी,करंडा.फणी आवश्यक)येथेच दिले जातात.वराकडून साड्यांची पूजा होते व पाच सवाष्ण हे साडे घेऊन वधु कडे जातात. गणपतीचे बाशिंग वधु च्या मस्तकाला  लावून परत वरास बांधतात.इकडे पाच सवाष्ण वधूला मुहूर्त मणी व दाग दिगीने घालून सजवितात. ह्यावेळतो कार्यलयात अक्षता  वाटून झालेल्या असतात.
ह्यावेळी वधु मामाकडून दिलेली  साडी नेसलेली असते.सर्व आटोपल्यावर  ह्या पाच सवाष्णींच्या ओट्या भरून वधु पक्षाकडून मान केला जातो.तोवर इकडे व्याही  भेट होते.दोन्ही यजमान आपल्या हातातील नारळांची अदलाबदल करतात व एकमेकांना भेटतात.
 
लग्न बंधन - मुहूर्त 
              नंतर वधु कडील यजमान वराचा हात धरून विवाह स्थळी घेऊन येतात व पाटावर पूर्व- पश्चिम उभे करता.भटजीनी पाटा खाली स्वस्तिक काढलेले असते.आंतरपाट  साधारण दोन वाराचा असतो.त्यावर मधोमध स्वस्तिक काढलेले असते.भटजी आंब्याच्या  पानांची बनविलेली  पाच गाठींची माळ वराच्या हाती देतात. तोंडात पानात जिरे टाकलेला विडा देतात.(मौन असावे म्हणून).आंतरपाट धरला जातो.वराच्या डोक्यावर खंजीर धरला जोत.मामा येरवन घेऊन उभा असतो.करा-तळी बाजूस  असतातच.मंगलाष्टाकाना सुरवात होते.मुहूर्ताच्या अवधीनुसार  मंगलाष्टके म्हटली जातात.पलीकडील पाटावर वधु उभी राहते. हाती  आंब्याच्या पानांची माळ दिली जाते.तोंडात जिरेभरीत विडा.माझ्या  मते ह्यावेळी वधु-वरांनी कोणाशी बोलू नये म्हणून विड्याची योजना असावी.तरी देखील सांप्रत काळी वराशी मित्र  मंडळी गप्पा मारीत असतातच.मुहूर्ताची वेळ झाल्यावर ' आली लग्न घटी  समीप नवरा...' हि मंगलाष्टक म्हणून शुभ मंगल सावधान व तदेव लग्नं... म्हटल्यावर भटजीनी इशारा करतातच अंतरपाट दूर केला जातो.प्रथम वधूने वरास माळ घालायची व नंतर वराने वधूस.हल्ली वधु माळ घालीत असताना वरास इतके उंच उचलतात कि त्या मुळे माळ घालणे शक्य होत नाही.काही वेळा अक्षरशः वधु वराच्या डोक्यावर माळ लांबूनच टाकते.हौशी तरुण पिढीला यात गम्मत वाटत असली तरी हि अनिष्ट परंपरा बंद होणे आवश्यक आहे.त्यामुळे सोहळ्याची मंगलता व पावित्र्य बिघडते असे माझे स्पष्ट मत आहे.शिवाय अपघात होण्याचाही  संभव  असतो.
 
होम विधी - सप्तपदी
               आंब्याच्या पानांच्या माळाच्या जागी आता  हार वापरणे सुरु झाले आहे.हार घालून झाल्यावर गुश्चान्ची    अदलाबदल केली जाते.वधु-वर तोंडातील विडा बाहेर टाकून देतात.करेवाली करयाचे  पाणी वधु वराच्या डोळ्यास लावतात व एकमेकांच्या क रयांत   थोडे-थोडे ओततात.तळीवाली वधु वरांस हळद कुंकू लावून ओवाळते व निरांजनाची वात एकमेकांच्या निरंजनास लावतात.
               विवाह स्थळी वधूचे आई-वडील उपस्थित नसतात.एवढी  लहानाची मोठी केलेली लेक दुसऱ्यास देताना  पाहणे कठीण जाते.यास्तव त्यांना दूर  केले जात असावे आता त्यांना बोलावून वधु-वरांच्या  डोक्यावर अक्षता टाकण्यास सांगतले जाते.तोवर भोजनाच्या कंत्राटदाराकडून पेढे व फुलांचे उपस्थिताना  वाटप होते.प्रत्येकी दोन-दोन नेवैद्य दोन्ही खोल्यांमध्ये पाठविले जातात.वधु-वर पक्षाच्या यजमानांकडून कुल देवतेस व मुहूर्त मेढीस नेवैद्य दाखविला जातो.पंगती बसण्यास सुरुवात होते. (आता स्वेश्चा भोजन)  
              वधु वरांचे सभोवती भटजींसह चार इसम उभे राहून,भटजी मंत्र म्हणून सुत फिरवतात.पाच फेरयांचा एक व तीन फेऱ्यांच एक असे दोन गट बनवितात.पहिला गट दुसर्या गटाच्या वरून काढून वधु-वराच्या डोक्यावरून काढून त्याचा एक जाडसर सड -कंगण बनवतात.दुसरा गट वधु-वरांच्या पायाजवळ ठेवून त्यांनी तो ओलांडून मागे यायचे असा प्रघात आहे.वधूस वराच्या उजव्या हातास बसवतात  .वधु वराच्या उजव्या हातात व वर वधूच्या डाव्या हातात हे कंगण  बांधतो.त्या आधी कंगनास हळकुंड बांधले जाते.आता विधी सुरु होतो होमाचा.होमकुंड वधु वरांच्या समोर ठेवले जाते. वराच्या बहिणी कडून होमकुंडात अग्नी प्रज्वलीत केला जातो.तिला तिचा मान देऊन (इंगळीचा मान) वधु तिला हळद कुंकू लावून तिची पाठवणी केली जाते.होम कुंडात समिधा टाकल्या जातात. वधूच्या  भावास  बोलावले जाते.वराकडून वधूच्या हातास तूप लावले जाते.वधूच्या भावाकडून पसाभर लाह्या वधूच्या हातात ठेवल्या जातात.वधु-वर उभे राहून त्या लाह्या होमकुंडात सोडतात.असे पाच वेळा करतात.नंतर होते कानपिळी.वधूचा भाऊ वराचा  उजवा कान पिळतो व सांगतो कि ' माझी बहिण तुम्व्ही  बायको झाली आहे तिचा  योग्य सांभाळ करा.त्याचा वस्त्र अथवा पैसे देऊन मान केला जातो.मंगलसूत्राच्या दोन वाट्यात हळद व पिंजर भरून वर अग्नीच्या साक्षीने वधूच्या गळ्यांत मंगलसूत्र घालतो.होमाच्या बाजूस पाट ठेवला जातो.त्यावर तांदुळाचे सात पुंजके ठेवून त्यावर सुपारया ठेवतात.पुढे सहाण ठेवून त्यावर सुपारी ठेवली जाते.होमाभोवती सात प्रदक्षिणा करताना प्रत्येक वेळी तांदुलावरील सुपारी वधु उजव्या पायाच्या अंगठ्याने बाजूस ढकलते व सहणेला पाय लावते.हा विधी सात जन्म सोबत देण्याची शपथ असते. सात प्रदक्षिणा  पूर्ण झाल्यावार वधु पुंजक्यांच्या समोर उभी राहते.वर तिच्या समोर ओभ  राहून डाव्या  हाताने वधूच्या उजव्या पायाचा अंगठा त्या पुंजक्या वरून ओढतो.दोघेही समोरा  समोर उभी राहून बशिन्गास  बाशिंग भिडवतात.नंतर भटजींकडून वधु वरांना  ध्रुव  दर्शन केले जाते.उत्तरेच्या दिशेस दोघांना नेले जाते व वराने  वधूस आकाशाच्या दिशेने ध्रुव दाखवून त्यास नमस्कार करतात.नंतर वर वधु चे कुलदैवत  हलविण्यासाठी वधूच्या खोलीत जातो.सोबत पाच मित्रमंडळी असतात.तेथे गाऱ्हाणे केले जाते व वर काही धन त्या कुळाच्या परडीत ठेवून दोन हाताने ती परडी हलवतो व आंत ठेवलेला बाळकृष्ण अथवा गणपती आपल्या सोबत घेतो.
               वधु पक्षाकडून वराचे व आलेल्या मंडळींचे तोंड गोड केले जाते.ह्याला उष्टावळ म्हणतात.वधूस पूर्वी काही तरी खायला द्यायची पध्दत होती. कारण तिचा उपवास असतो.तेथून वर-वधु वर पक्षाच्या खोली कडे येऊन वर पक्षाचे कुळास गाऱ्हाणे घालून हलविले जाते.नंतर कुळाची फांदी स्वश्च अशा  झाडाच्या कुळाशी ठेवली जाते.भात/गव्हाचा वापर घरच्या मंडळीसाठी  केला जातो.
   
भोजन समारंभ / स्वागत समारंभ 
               होमाचा व कुळहलविण्याचा कार्यक्रम होईपर्यंत इकडे भोजन समारंभास  /स्वेच्श्चा भोजनास सुरवात झालेली असते.भोजन samarambh  होई पर्यंत वाढू-var  स्वागत समारंभाचा  पोशाख घालून स्टेजवर येतात.हल्ली वधू-वरास सजविण्यासाठी ब्युटीशिअन   बोलावले जातात.ते वधु-वरांना सजविन्या साठी  तास-दीड तास लावतात.त्यामुळे  होते काय कि जेवून झालेली मंडळी ताटकळत  असतात. केव्हा एकदा आहेर  देऊन मोकळा होतो असे प्रत्येकाला  झालेले असते.शिवाय अगोदर व्हीडीओ  शुटींग  मग फोटो सेशन ह्यातच फार वेळ जाते.देव दर्शनास  जशी रांग लागते तशी रांग स्वागत समारंभास  लागते हे आपण नेहमीच पाहतो.
                 स्वागत समारंभाचा  सोहळा आटोपल्यावर घाई होते ती निघण्याची.कारण कार्यालयाची बेल ठण ठण वाजत असते.ती वेळ संपल्याची आठवण करून देत असते.जादा वेळे साठी अधिक आकार भरावा   लागेल असा इशारा  देत असते.सर्व सामानाची आवर आवर करण्या पूर्वी मान पानाची वस्त्रे काढून ठेवली जातात.आपल्या पध्दती नुसार निरोप देताना हि वस्त्रे (हातीबोटी व पोट झाकणी)  दिली जातात.वधु कडील जाणता माणूस वधूस वर माईच्या  हाती सुपूर्द करताना साडी-खण नारळासहित तिचा  हात वरमाईच्या हातात देतो व सांगणे करतो कि,आजवर सांभाळलेली  मुलगी आजपासून तुमची  झाली  आहे.तिचा मुली प्रमाणेच सांभाळ  करा.नंतर वरपक्षाकडून वधुच्या मातेस तसाच मान दिला जातो.पहिला मान मामाचा.वधूच्या  मामीस साडी,खण,नारळाचा मान दिला जातो.नवीन काळानुसार मामालासुध्दा वस्त्रे दिली जातात.डामरे गावातील मुलगी असेल तर वरपक्षाला देवी साठी साडी द्यावी लागते.ती ज्या वेळी गावी देवीच्या पाया पडण्यास जाईल तेव्हा .बाकी कुणाचा मान पान करायचा असेल तो हौसेन करतात.
 
वधुवरांचा गृह प्रवेश
            वधु- वर घरी येताना नजीकच्या मंदिरात जाऊन नमस्कार करून येतात. घरी आल्यावर बाहेरच अंगावरून नारळ उतरून काढतात.हौस मौज  करणारे वरात काढतात.वरात घरात येताना वधूची माहेरची ओटी दरवाज्यात बदलून घरची ओटी बांधतात.उंबरठयावर तांदुळाने भरलेले माप ठेवतात,वधु ते माप उजव्या पायाने घरात ढकलून आत  प्रवेश करते.देवघरापर्यंत पायघड्या घातलेल्या असतात.पायघड्यावर तांदुळाचे पुंजके म्हणजे राशी ठेवलेल्या असतात.घरातील  सवाष्ण रोवळीत  लामण दिवा घेते व वधूच्या पाशातील तांदूळ वधु थोडे थोडे लामण दिवा ठेवलेल्या रोवळीत टाकते.पाय घड्यांवरील तांदुळाच्या राशीवरून वधु-वर चालत गेल्यावर मागोमाग त्या पाय घड्या गुंडाळून ठेवतात.देवाला नमस्कार केल्यानंतर लोन  उतरले जाते.म्हणजे दृष्ट काढली जाते.वधु-वरास पाटावर बसवून,तव्यात निखारे घेऊन, मीठ-मिरची व सुटी नाणी घेऊन दृष्ट काढतात.वधु-वर आपापले बाशिंग,मुंडावळ्या,शाल-उपरणे देवा समोर काढून ठेवतात व हा समारंभ  संपतो. 
 
 
© Damre Village