महसुली पुस्तक परिपत्रक क्रमांक 20

महसुली पुस्तक परिपत्रक क्रमांक  20

 

विषय :- अधिकार अभिलेख

 

एक- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 याचे उपबंध

 

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 याच्या प्रकरण 10 मध्ये (कलमे 147 ते 159) अधिकार अभिलेखासंबंधीचे उपबंध आहेत. निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही स्थानिक क्षेत्रात किंवा गांवांच्या वा जमिनींच्या कोणत्याही वर्गाच्या संबंधात हे उपबंध लागू होणार नाहीत असे निदेश राज्य शासनाला अधिसूचना काढून देता येतील (कलम 147).(अशा अशयाची एक अधिसूचना राज्यउ शासनाने यापूर्वीच काढलेली आहे, कृपया परिच्छेद 34 पहा )

 

2.पुढील तपशील उसलेला अधिकार अभिलेख प्रत्येक गावात ठेवण्यात यावेत :-

 

(एक)  जमिनीचे धारक,भोगवटादार,जमिनमालक किंवा गहाणदार किंवा तिचे भाडे वा महसुल याचे अभिहस्तांकिती यांची नावे,

 

(दोन)  संबध्द कुळवहिवाट कायद्याखालील  कुळांसह सरकारी पटटेदारांची किंवा कुळांची नावे,

 

(तिन)  पूर्वोक्त व्यक्तींच्या,जमिनीमधील हितसंबंधाचे स्वरुप  त्यांची मर्यादा आणि त्यांच्याशी संबंध्द असलेल्या शर्ती किंवा दायित्वे,असल्यास,

 

(चार)  पूवोक्त व्यक्तीकडून देय असलेली किंवा त्यांना देय असलेली,भाडयाची किंवा जमीन महसुलाची रक्कम,

 

(पाच)  राज्य शासन नियमान्वये विहीत करील असा इतर तपशील .

 

3. कोणत्याही जमिनीच्या अंबंधात कोणत्याही स्वरुपाचा कोणताही अधिकार संपादन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने,अशा अधिकार-संपादनाच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत आपल्या अशा अधिकार संपादनाबद्दल तलाठयाला मौखिकरित्या किंवा लेखी कळविले पाहिजे.अशी सुचना मिळाल्यावर तलाठयाने ताबडतोब लेखी पोहोच दयावी. अधिकार   संपादन  करणारी व्यक्ती अज्ञान असल्यास,तिच्या पालकाने किंवा तिची मालमत्ता ताब्यात असलेल्या इतर व्यक्तीने तलाठयाला प्रतिवृत्त द्यावे. तथापि,जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीने किंवा नोंदणीकृत दस्तएैवजाच्या आधारे अधिकार संपादन करणाऱ्या व्यक्तीला तिच्या अधिकाराचे प्रतिवृत्त तलाठयाला देण्यापासून सूट देण्यात आली आहे. अधिनियमाच्या किंवा इतर कोणत्याही कायदयाच्या उपबंधांन्वये आवश्यक असल्याप्रमाणे ,जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेऊन एखाद्या व्यक्तीने आधिकार संपादन केल्यास,अशा व्यक्तीस,तलाठयाने तसे फर्माविल्यास,असा पुरावा सादर करावा लागेल (कलम 148)

 

4. जिच्या संबंधात आधिकार अभिलेख तयार करण्यात आला असेल अशा जमिनीवरील कोणताही हक्क किंवा भार निर्माण करणे,त्याचे अभिहस्तांकन करणे किंवा तो नष्ट करणे या गोष्टी अभिप्रत असलेल्या कोणत्याही दस्तएैवजाची,भारतीय नोंदणी  अधिनियमान्वये नोंदणी करण्यात आली असेल तेव्हा नोंदणी अधिकाऱ्याने तलाठयाला आणि संबंधित तहसिलदाराला देखील त्यांसंबंधी सूचना पाठवणे आवश्यक आहे(कलम 154)

 

5. अधिकार संपादनासंबंधी तलाठयाकडे पाठविलेले प्रत्येक प्रतिवृत्त आणि नांदणी आधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेली प्रत्येक सुचना यांची नोंद तलाठयाने फेर फार नोंदवही मध्ये करावी. (तलाठयाला स्वाधिकारे कोणतीही फेरफार नोंद करण्याची शक्ती नाही .) फेरफार नोंदवहीमध्ये केलेल्या ोंदीची प्रत चावडीमध्ये लावण्यात यावी आणि त्याची लेखी सुचना तलाठयाने , फेरफारामध्ये हितसंबंधीत असणाऱ्या किंवा असल्याचे मानण्यात येणाऱ्या सर्व व्यक्तीना पाठवावी . अशा फेरफाराबद्ल तलाठयाकडे कोणताही मौखिक किंवा लेखी आक्षेप आल्यास त्याची त्याने पोच द्यावी  विवादग्रस्त प्रकरणाच्या नोंदवहीमध्ये त्याची ों करावी. विवादग्रस्त प्रकरणांच्या नोंदवहीमध्ये नोंद केलेले वाद , अव्वल कारकुनापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या महसूल किंवा भूमापन अधिकाऱ्याने शक्यतोवर एका वर्षाच्या आत निकालात काढणे आवश्यक आहे. अशा वादांच्या बाबतीत काढलेले आदेश फेरफार नोंदवही मध्ये अभिलिखीत करण्यात यावेत. फेरफार नोंदवहीमधील नोंदीची चाचणी करणे आवश्यक आहे. आणि त्या बरोबर असल्याचे आढळल्यावर किंवा दुरुस्त केल्यावर अव्वल कारकूनापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या महसूल किंवा भूमापन आधिकाऱ्याने त्या विहित पध्दतीने प्रमाणित कराव्यात . मंडल निरिक्षकाला देखिल ज्यांच्या बाबतीत काही वाद नाही अशा नोंदीची तपासणी करुन त्या प्रमाणित करता येतील. तथापि, संबंधित हितसंबंधित व्यक्तिवर तशी नोटीस बजावल्याखेरीज कोणतीही नोंद प्रमाणित करता कामा नये. फेरफार नोंद, रीतसर प्रमाणित करण्यात आल्याखेरीज अधिकार अभिलेयखामध्ये बदली करता येणार नाही.       

 

तसेच तलाठयाने,नियमानुसार विहित करण्यात येईल अशा नमुन्यामध्ये आणि पध्दतीने कुळवहिवाट नोंदवहीदेखील ठेवणे आवश्यक आहे (कलम 150)

 

6.  जिचे अधिकार, हितसंबंध किंवा दायित्वे यांची नोंद करण्यात आली असेल किंवा नोंद करणे आवश्यक असेल अशी व्यक्ती,अधिकार अभिलेखाचे किंवा नोंदवहयांचे अचूक संकलन करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती किंवा दस्तएैवज मागणी केल्यावर सादर करण्यास पात्र राहील. मागणी केल्याच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत माहिती किंवा दस्तएैवज सादर केला पाहिजे. आवश्यक माहिती किंवा दस्तएैवज मिळाल्यावर संबंधित आधिकाऱ्याने किंवा तलाठयाने लेखी पोच देणे आवश्यक आहे.(कलम 151)                     

 

7.  विनिर्दिष्ट कालावधीच्या आत वरील परिच्छेद 2 अनुसार आपल्या अधिकार संपादनाचे प्रतिवृत्त देण्यात किंवा वरील परिच्छेद 6 अनुसार माहिती किंवा दस्तएैवज पुरविण्यात हयगय करणारी कोणतीही व्यक्ती जिल्हाधिकाऱ्याच्या स्वेच्छानिर्णयानुसार  5 रुपयापर्यतच्या  दंडास पात्र असते(कलम 152)                                                     

 

8.  खाते पुस्तिका (पुस्तिका )तयार करणे,ती देणे  ठेवणे या संबंधीचे उपबंध महसुली पुस्तक परिपत्रक क्रमांक 21 मध्ये स्पष्ट केले आहे.

 

9.  अधिनियमाची कलम 80  81 यांनुसार समन्स काढण्यास  जमिनीची मोजमापे घेणे किंवा वर्गीकरण करणे या प्रयोजनार्थ सहाय्य करण्यास जमिनीमध्ये हितसंबंध असलेल्या व्यक्तिंना भाग पाडण्यासाठी किंवा भाडोत्री मजुरांच्या खर्चाची आकारणी देखील करता येईल.भाडोत्री मजुरांच्या खर्चाची आकारणी करण्याच्या शक्तीव्यतिरिक्त भूमापन आधिकाऱ्याच्या या शक्तींचा वापर कोणत्याही महसुल अधिकाऱ्याला किंवा तलाठयाला,कोणत्याही अभिलेखाच्या किंवा नोंदवहीच्या संबंधातील कोणताही नकाशा किंवा योजना तयार करण्याच्या किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याच्या प्रयोजनार्थ करता येईल. सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकारी किंवा भूमापन अधिकारी याच्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही महसूल आधिकाऱ्याला भाडोत्री मजुरांच्या खर्चाची आकरणी करण्याच्या शक्तीचा वापर करता येईल (कलम 153)

 

10.  संबंधित व्यक्तिने कबुल केलेले कोणतेही लेखनप्रमाद आणि अधिकार अभिलेखातील कोणतेही दोष जिल्हाधिकाऱ्याला दुरुस्त करता येतील. तथापि, निरीक्षणाच्या वेळी एखाद्या महसूल अधिकाऱ्याच्या निदर्शनास आलेले दोष वादग्रस्त नोंदी म्हणून मानण्यात यावेत  संबंधित व्यक्तींना नोटिसा पाठविल्यानंतर  त्यांचे आक्षेप विचारात घेतल्यानंतरच ते दुरुस्त करण्यात यावेत (कलम 155)

 

11.  अधिकार अभिलेखातील नोंद  फेरफार नोंदवहीमधील प्रमाणित नोंद ही तद्विरुध्द सिध्द होईपर्यंत किंवा नाविन नोंद वैधरीत्या दाखल करण्यात येईपर्यत खरी असल्याचे गृहीत धरण्यात येईल (कलम 157)

 

12.  अधिकार अभिलेखात किंवा नोंदवहीत एखादी नोंद करविणे किंवा अशी कोणतीही नोंद काढून टाकणे किंवा तीमध्ये सुधारणा करविणे याबाबतच्या हक्काचा निर्णय लावण्यासाठी शासनाविरुध्द किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याविरुध्द दिवाणी दावा दाखल करता येणार नाही. तथापि, राज्य शासन किंवा त्याचा कोणताही अधिकारी हा ज्या मध्ये पक्षकार नसेल असा दावा दिवाणी न्यायालये विचारार्थ घेऊ शकतील. कोणत्याही महसूल अधिकाऱ्याच्या अधिनियमाच्या प्रकरण दहा अन्वये (अधिकार अभिलेख) काढलेल्या आदेशाविरुध्द अशा आधिकाऱ्याच्या निकट वरिष्ठाकडे,अधिनियमाच्या प्रकरण तराच्या उपबंधानुसार अपील किंवा पुनरीक्षण करता येईल.

 

दोन - महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे  ठेवणे )नियम ,1971 असे उल्लेखिलेल्या नियमांच्या तरतुदी

 

अ- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 126 अन्वये भूमापन केलेल्या क्षेत्रांव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील आधिकार अभिलेख

 

 

13.  प्रत्येक भूमापन क्रमांकाकरीता किंवा भूमापन क्रमांच्या हिश्श्याकरिता अधिकार अभिलेख स्वतंत्र पत्रिकेच्या विहित नमुन्यात तयार करण्यात यावा  ठेवण्यात यावा.

 

 

(अ) नवीन अधिकार अभिलेख तयार करणे

 

       14.  कोणताही अधिकार अधिकार अभिलेख अस्तित्वात नसेल आणि तो प्रथमच तयार करावयाचा असेल तेव्हा पुढील कार्यपध्दती अनुसरण्यात यावी :-

 

          (एक) गावकऱ्यांनी जमिनीच्या तपशिलासंबंधी म्हणजेच,भूमापन क्रमांक,हिस्सा,हितसंबंधाचे स्वरुप,भूधारणाप्रकार,जमिनीवरील भार  इ.यासंबंधीची माहिती तलाठयाला तीस दिवसांच्या आत तोंडी किंवा लेखी सादर  करावी असे आदेश देणारी एक जाहीर नोटीस तलाठयाने काढावी. ही जाहीर नोटीस दवंडी पिटवून आणि तिच्या प्रती पचायत कार्यालयात  चावडीमध्ये  लावून जाहीर करावी,

 

          (दोन) तलाठयाकडे ओलेल्या किंवा स्थानिक चौकशाद्वारे त्याने मिळविलेल्या माहितीच्या आधारे,विहित नमुन्यामध्ये आधिकार अभिलेखाची एक कच्ची प्रत  तयार करावी .एखाद्या नोंदीच्या बाबतीत परस्परविरोधी दावे असल्याचे  तलाठयाच्या निदर्शनास आल्यास त्याने अशी नोंदकोरी ठेवावी आणि विवादग्रस्त  प्रकरणांच्या नोंदवहीमध्ये परस्परविरोधी दाव्यांचे तपशील अभिलिखित करावेत,

 

          (तीन)           अशा प्रकारे तयार केलेली अधिकार अभिलेखाची कच्ची प्रत मंडल निरीक्षकाने किंवा मंडल निरीक्षकापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या भूमापन अधिकाऱ्याने  तपासावी आणि ती, आक्षेप मागविण्यासाठी नोटीस काढून प्रसिध्द करावी,

 

          (चार)  काही अक्षेप आलेले असल्यास,विवदग्रस्त प्रकरणांच्या नोंदवहीमध्ये त्यांची नोंद करण्यात यावी  वादामध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तीवर ,आक्षेपांच्या निर्णयासाठी सुनावणी करिता निश्चित केलेल्या दिवशी,वेळेस आणि ठिकाणी उपस्थित राहाण्यासंबंधी आदेश देणाऱ्या वैयक्तिक नोटीसा बजावाव्यात.वरील  (दोन) मध्ये निर्दिष्ट केलेल्या वादांच्या बाबतीत देखील अशी नोटीस पाठविण्यात  यावी ,

         

(पाच) सुनावणीसाठी निश्चित केलेल्या दिवशी,ठिकाणी आणि वेळी अव्वल  कारकूनापेक्षा कमी दर्जाचा नसलेला कोणताही महसूल किंवा भूमापन अधिकारी उपस्थित गावकरऱ्यांना सर्व नोंदी वाचून दाखवतील  ज्यांच्याबद्दल   आक्षेप आणि वाद उपस्थित केलेले असतील अशा जमिनीबद्दल माहिती देईल. नंतर तो विवादग्रस्त प्रकरणांच्या नोंदवहीमध्ये नोंद केलेल्या वादांचा निर्णय  देईल  जमलेल्या गावकऱ्यांसमोर आपले निर्णय जाहीर करील,

 

       (सहा)            नंतर तलाठयाने उक्त निर्णयाप्रमाणे कच्या प्रतिमधील नोंदी लाल शाईने दुरुस्त  करावयाच्या किंवा कोऱ्या असलेल्या नोंदी भराव्यात आणि अधिकार अभिलेखाची स्वच्छ प्रत तयार करावी. अशा प्रकारे तयार केलेली स्वच्छ प्रत  पुन्हा प्रसिध्द करण्यात यावी  आक्षेप मागविण्यासाठी जाहीर नोटीस काढण्यात  यावी,

 

       (सात) स्वच्छ प्रतीबदल काही आक्षेप आलेले असल्यास,तलाठयाने त्यांची पोच द्यावी   आक्षेपांमुळे बाधित झलेल्या किंवा त्यामध्ये हितसंबंधीत असलेल्या     व्यक्तींवर,सुनावणीसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी  वेळी उपस्थित राहण्यासंबंधी आदेश देणारी नोटीस बजावावी,

 

       (आठ) सुनावणीच्या वेळी,उप जिल्हाधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या कोणत्याही   म अधिकाऱ्याने किंवा भूमापन अधिकाऱ्याने,संबंधित व्यक्तीना सुनावणी    दिल्यानंतर आक्षेपांचा निर्णय द्यावा. त्याच्या निर्णयाप्रमाणे त्याने अधिकार अभिलेखामध्ये लाल शाईने दुरुस्त्या करवून ध्याव्यात आणि अशा दुरुस्त्या  अधिप्रमाणित कराव्यात. कोणताही लेखन प्रमाद आढळल्यास,त्याने तो अशाच  प्रकारे दुरुस्त करावा,

 

       (नऊ) अधिकार अभिलेखाची स्वच्छ प्रत अशा प्रकारे दुरुस्त केल्यानंतर, उपस्थित  व्यक्तिंना आवश्यक असेल असा त्याचा भाग वाचून दाखविण्याची व्यवस्था उक्त   अधिकारी करील. त्याला आवश्यक वाटतील अशा कोणत्याही दुरुस्त्या त्याने  कराव्यात आणि आपली दिनांकीत सक्षरी करावी  तसेच,ती रीतसर मंजूर प्रस्थापित करण्यात आल्याचे प्रमाणित करावे.

        

 - विद्यमान अधिकार अभिलेखाच्या  जागी नवीन अधिकार अभिलेख तयार करणे

 

      15.  महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे  ठेवणे)नियम , 1971 येण्यापूर्वीच  विद्यमान अधिकार अभिलेख  तयार करण्यात आलेला असेल आणि तसेच हा अभिलेख उक्त नियमांमध्ये विहित केलेल्या नमुना एक अनुसार नसेल तरच विद्यमान अभिलेखाच्या जागी नवीन अधिकार अभिलेख तयार करण्यात यावा. अशा अधिकार अभिलेखाच्या जागी पूर्वोक्त नमुन्यातील नवीन अधिकार अभिलेख तयार करण्यात यावा. या प्रयोजनार्थ तलाठयाने प्रत्येक भूमापन क्रमांकाच्या आणि भूमापन क्रमांकाच्या हिश्श्याच्या संबंधातील विद्यमान अधिकार अभिलेखातील नोंदी नवीन अधिकार अभिलेखामध्ये बदली कराव्यात आणि मंडल निरीक्षकाने त्या तपासाव्यात.

 

       16. गावातील जमिनीमध्ये हितसंबंधीत असणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी, नोटिसीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दिवशी  वेळी विद्यमान तसेच,नवीन अधिकार अभिलेख निरीक्षणासाठी  खुले ठेवण्यात येतील आणि त्यानी उपस्थित राहाणे आवश्यक असेल अशा विनिर्दिष्ट वेळी  ठिकाणी नविन अधिकार अभिलेख प्रख्यापित करण्यात येतील अशी माहिती देणारी जाहिर नोटीस तलाठयाने काढावी.उक्त दिवशी संबंधित अधिकाऱ्याने नोंद तपासव्यात  आवश्यक तेथे त्या दुरुस्त कराव्यात आणि उक्त दिनांकापासून नवीन अधिकार अभिलेख हे उक्त गावाचे अधिकार अभिलेख राहतील असे उपस्थित गावकऱ्यांसमोर उद्घोषित करावे.

 

       17.  मुंबईच्या जमीनीचे तुकडे पाडण्यात प्रतिबंध करण्याबाबत  त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या कलम 24 अन्वये एकत्रिकरण अधिकाऱ्याने या नियमांखाली विहित केलेल्या नमुन्यात तयार केलेला अभिलेख हा नविन अधिकार अभिलेख मानण्यात येतो.

 

(क) अधिकार अभिलेखाचे पुनर्लेखन

 

      18. साधारणत: दर दहा वर्षानी अधिकार अभिलेखाचे पुनर्लेखन करावयाचे असते.तथापि, फार प्रमाणात ोंदी केल्या गेल्यामुळे आणखी ोंदी करणे अशक्य होईल असे उप- विभागिय अधिका-याला वाटत असल्यास, दहा वर्ष पूर्ण होण्याअगोदरच अधिकार अभिलेखाचे पुनर्लेखन करण्याविषयी निदेश देण्यासंबंधीच्या शक्ती त्याला प्रदान करण्यात आल्या आहेत.पुनर्लेखनाचे काम चालू असताना तलाठयाने मूळ अधिकार अभिलेखातील अद्ययावत नोंदी नवीन प्रतीमध्ये बदली कराव्यात  त्यानंतर मंडल निरीक्षकाने त्या तपासव्यात. त्यानंतर वरील परिच्छेद 15  16 मध्ये विहित केलेली कार्यवाही अनुसरण्यात यावी.

 

(ड) अधिकार अभिलेख  फेरफार नोंदवहया ठेवणे

 

       19.  तलाठी,अधिकारितेखाली असलेल्या गावांचे अधिकार अभिलेख  फेरफार नोंदवही अद्ययावत ठेवण्यास जबाबदार आहे.

 

       20.  नोंदणी प्राधिकाऱ्याकडून दस्तएैवजांची नोंद झाली असल्याची माहिती मिळते तेव्हा तलाठयाने प्रत्येक एस्तएैवजाच्या बाबतीत फेरफार नोंदवहीमध्ये स्वतंत्र नोंदी करावयाच्या असतात.

       21.  ज्या नोंदीची बदली करताना जिल्हाधिकाऱ्याची पूर्व परवाणगी आवश्यक असते अशा नोंदी करताना तलाठयाने, अशा प्रकारची बदली केल्याचे कळविणाऱ्या व्यक्तिने त्याबाबतची परवानगी किंवा आदेश सादर करावे असे त्याला सांगावे  त्यासंबंधीचा उल्लेख फेरफार नोंदवहीतील  स्तंभ 2 मध्ये करावा. अशी परवानगी घेतली नसेल किंवा घेऊनही ती सादर केली नसेल तर तलाठयाने तशीही नोंद करुन ठेवावी.

 

       22.  फेरफार नोंदवहीत नोंद केली जाते तेव्हा तलाठयाने,फेरफार नोंद प्रमाणित करण्यात आली नसल्याच्या शेऱ्यासह अधिकार अभिलेखातील त्या फेरफार नोंदीचा क्रमांक पेन्सिलने दर्शवावयाचा असतो.

 

       23.  फेरफार नोंदी प्रमाणित करणे  विवादांबाबत निकाल देणे या प्रयोजनार्थ,प्रमाणन अधिकाऱ्याने, प्रथम त्या गावात त्याचा ज्या दिवशी मुक्काम असेल, त्या तारखा तलाठयाला कळवून संबंधित व्यक्तीनां नोटीसा पाठविण्यासंबंधी  त्यांना उक्त दिवशी उपस्थित राहाण्यासंबंधी कळविण्याबाबत निदेश द्यावयाचे असतात. तलाठयाने त्याप्रमाणे नोटीस पाठवावयाच्या असतात. नियत दिवशी प्रमाणन अधिकाऱ्याने निर्विवाद फेरफार नोंदी वाचून दाखवावयाच्या असतात. फेरफार नोंदीची अचूकता मान्य केली गेल्यावर,प्रमाणन अधिकाऱ्याने त्यानुसार फेरफार नोंदवहीत नोंद करुन नोंदी योग्य रीतीने प्रमाणित करण्यात आल्या असल्याचे पृष्टांकित करावयाचे असते. एखाद्या नोंदीमध्ये काही चूक असल्यास  ती चूक मान्य असल्यास,प्रमाणन अधिकाऱ्याने नोंद दुरुस्त करुन ती प्रमाणित करावयाची असते. त्यानंतर त्याने कब्जाच्या आधारे,म्हणजेच हक्काच्या दाव्यानुसार प्रत्यक्ष कब्जा धारण करणाऱ्या व्यक्तीची भोगवटादार वर्ग 1, भोगवटादार वर्ग 2 किंवा यथास्थिती, सरकारी पट्ेदार  याप्रमाणे ज्या प्रकारचा कब्जा ती व्यक्ती धारण करीत असेल,त्याच्या अधारे,संक्षिप्त चौकशी करुन विवाद्य प्रकरणांच्या नोंदवहीत नोंद केलेल्या प्रत्येक विवादावर निकाल द्यावयाचा असतेा. प्रत्यक्ष कब्जा बाबत काही शंका असल्यास, सर्वात अधिक साधार हक्क असलेल्या व्यक्तिची अशा रीतीने नोंद करावयाची असते. यानंतर प्रमाणन अधिकाऱ्याने आपल्या आदेशाचे फेरफार नोंदवहीत नोंद करुन त्याच्या आदेशानुसार दुरुस्त केलेला फेरफार प्रमाणित करण्यात आला असल्याचे पृष्टांकित करावे. आदेशामध्ये,पक्षकारांची  साक्षीदारांची नावे, दोन्ही पक्षाकडून सादर केल्या गेलेल्या पुराव्याचा गोषवारा  प्रमाणन अधिकाऱ्याला स्वत:ला अढळून येणाऱ्या गोष्टी यांचा समावेश असावा. फेरफार नोंद प्रमाणित केल्यानंतर लगेच तलाठयाने त्यांची अधिकार अभिलेखाध्ये शाईने नोंद करावयाची  असते.

 

        24.  तलाठयाने फेरफार नोंदवही योग्य रीतीने ठेवली आहे किंवा नाही हे तपासणे हे मंडल निरीक्षकाचे कर्तव्य आहे. तशी ती ठेवली नसल्यास,मंडल निरीक्षकाने ती तयार करवून घेऊन सुस्थितीत ठेवण्यास सांगावे.

 

(इ) पिकांची नोंदवही

 

        25.  काढलेली पिके  जेथे ती काढण्यात आली ते क्षेत्र दर्शविणारी पिकांची नोंदवही प्रत्येक भूमापन क्रमांकाकरीता किंवा भूमापन क्रमांकाच्या पोटहिश्श्याकरिता ठेवावयाची असते. ही नोंदही नियमांखाली विहित करण्यात आली असून, ती अधिकार अभिलेखाच्या नमुन्याखाली समाविष्ट करावयाची असते.

 

       दरवर्षी, जेव्हा पिके तयार होतात  शेतात उभी असतात, त्यावेळी तलाठयाने पीक निरीक्षणाकरिता  पिकांच्या नोंदवहीत नोंद करण्याकरीता, गावाला भेट द्यावयाची असते.या प्रयोजनार्थ तलाठयाने,निदान 7 दिवस आगाऊ तारीख निश्चित करुन,दवंडी पिटवून किंवा इतर सोयीस्कर पध्दतीने आपल्या भेटीची तारीख गावकऱ्यांना कळवून,त्यांनी त्यावेळी आपल्या शेतात हजर राहून पिकांच्या नोंदवहीत केल्या जात असलेल्या नोंदी पाहून घ्याव्यात असे सांगावे. याशिवाय तलाठयाने ग्रामपंचायतीचा सरपंच असल्यास,त्याला आपल्या भेटी विषयी कळवून त्याच्यामार्फत ग्रामपंचायतीच्या सभासदानी त्याच्याबरोबर (तलाठयाबरोबर ) राहाण्याची विनंती करावी . अशा रीतीने निश्चित केलेल्या दिवशी तलाठयाने,तेथे उपस्थित राहाणारे गावकरी,सरपंच  ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्या समक्ष प्रत्येक शेतातील भेट देऊन उक्त नोंदवहीमध्ये नोंदी करावयाच्या असतात. अशा रीतीने केलेल्या नोंदी तलाठयाने हितसंबंधी व्यक्तींना पाहू दिल्या पाहिजेत .

       

         तलाठयाने नोंदी केल्यानंतर,मंडल निरीक्षक किंवा त्याचा कोणताही वरिष्ठ अधिकारी याने नोंदीची पडताळणी करण्यासाठी त्या गावाला भेट दयावयाची असते. अशा अधिकाऱ्याने अपल्या भेटीची अगाऊ सुचना द्यावयाची असते. आणि योग्य ती चौकशी केल्यानंतर चुकीच्या असल्याचे आढळून आलेल्या नोंदी दुरुस्त करावयाच्या असतात.

 

(फ) अधिकार अभिलेखानुसार जमीन ज्यांच्या ताब्यात असल्याचे मानले जाते त्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींची नांेदवही

 

        26.  वरील परिच्छेदात उल्लेखिलेल्या पीक निरीक्षणाच्या वेळी जिच्याकडे जमिनीचा प्रत्येक्ष कब्जा आहे. ती व्यक्ती, जिचे नाव अधिकार अभिलेखामध्ये नोंदलेले आहे. तीच आहे काय याची पडताळणी करावयाची असते. अधिकार अभिलेखामधील नोंदीनुसार जमिनीचा भोगवटा करण्याचा हक्क असलेल्या व्यक्तीखेरीज दुसरी व्यक्ती जमिनीचा कब्जा धारण करीत आहे असे तलाठयाला आढळल्यास,त्याने त्या व्यक्तीचे नाव अधिकार अभिलेखानुसार जमीन ज्याच्या ताब्यात असल्याचे मानले जाते, नोंदवहीमध्ये नोंदी करताच , ती नोंदवही तलाठयाने तहसीलदाराकडे  योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवावी.

 

        उक्त नोंदवही मिळाल्यावर तहसीलदाराने तलाठी, ग्रामपंचायतीचा सरपंच यांच्यामार्फत किमान 7 दिवसांच्या आगाऊ सूचनेनंतर गावाला भेट द्यावयाची असते. तलाठयानेही सर्व हितसंबंधित व्यक्तींना यासंबंधी कळवून त्यांना नियत दिवशी  नियत वेळी उपस्थित राहण्यास सांगावयाचे असते. नियत दिवशी नोंदवहीत उल्लेखिलेल्या व्यक्तिंच्या कब्जात असलेल्या जमिनीबाबत रीतसर चौकशी करुन हितसंबंधित व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावयाचे असते  त्यानंतर आणखी चौकशी करुन त्याला आवश्यक वाटेल त्याप्रमाणे निकाल द्यावयाचा असतो.

 

 

 

 

(ग) कुळवहिवाट नोंदवही

 

 

         27.  नियमांमध्ये विहित केलेली कुळवहिवाट नोंदवहीत तलाठयाने प्रत्येक कृषि वर्षासाठी ठेवावयाची असते.मंडल निरीक्षकाने पिकांची तपासणी करताना या नोंदवहीमधील नोंदी तपासावयाच्या असतात. त्याला काही चुका आढळल्यास त्यामुळे बाधित झालेल्या व्यक्तीला सुनावणी देण्याची संधी दिल्यानंतर त्याने त्या दुरुस्या करुन आद्याक्षरी करावी.

 

 

ब-अधिनियमाच्या कलम 126 अन्वये भूमापन केलेल्या क्षेत्रांतील अधिकार अभिलेख

 

          28.  अधिनियमाच्या कलम 126 अन्वये भूमापन केलेल्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र जमिन महसूल (गाव,शहर  नगर भूमापन) नियम, 1969 अन्वये विहित केलेल्या मालमत्ता पत्रिकेमध्ये अधिकार अभिलेख  फेरफारांची नोंदवही तयार करावयाची असते  ठेवावयाची असते. जिल्हा निरीक्षक , भूमि अभिलेख यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला भूमापन अधिकारी मालमत्ता पत्रिका अद्ययावत ठेवण्यास जबाबदार असतो.

 

           29.  तलाठयाकडे आलेल्या हक्क संपादन किंवा हस्तांतरण याचा अहवाल आणि सूचना यांची मालमत्ता पत्रिकोमध्ये नोंद करावयाची असते. अशा तऱ्हेने नोंद केल्यानंतर तलाठयाने नोंदीची एक प्रत गावाच्या चावडीमध्ये किंवा चावडी नसल्यास , गाव, शहर किंवा नगर यांमधील ठळक ठिकाणी लावावयाची असते. नंतर त्याने सर्व हितसंबंधीत व्यक्तींनात्यांचे आक्षेप 15 दिवसाच्या आत मौखिकरीत्या किंवा लेखी पाठविण्याबदल आदेश देणारी नोटीस द्यावयाची असते.मिळालेल्या आक्षेपांबदल पोच देऊन विवादग्रस्त प्रकरणांच्या नोंदवहीमध्ये त्यांची नोंद करावयाची असते. कलम 126 अन्वये भूमापन केलेल्या क्षेत्रांव्यतिरिक्त इतर क्षेत्रांंमधील विवादांचा ज्या पध्दतीने निर्णय देण्यात येतो  प्रमाणन करण्यात येते त्याच पध्दतीने, अव्वल कारकुनाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल किंवा भूमापन अधिकाऱ्याने  या विवादांचा निर्णय देऊन,ते प्रमाणित करावयाचे असतात.

 

           30.  तलाठयाने फेरफारांची नोंदवही योग्य प्रकारे तयार केली  आणि ठेवले आहे की काय, हे पाहाणे  त्याने तसे केले नसल्यास, त्याला (तलाठयाला) तसे करायला लावणे , हे मंडल निरिक्षकाचे किंवा मंडल निरिक्षकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या भूमापन अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे.

 

क- सर्व क्षेत्रांना लागू असलेले संकीर्ण उपबंध

 

       31.  आधीच्या महिन्यामध्ये नोंदणी केलेल्या दस्तऐवजांच्या संबंधात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवडयात गावामध्ये समाविष्ट केलेल्या जमिनीच्या संबंधात, भारतीय नोंदणी अधिनियमाखाली कोणत्याही दस्तऐवजाची नोंदणी करण्याऱ्या नोंदणी अधिकाऱ्याने तलाठी  तहसिलदार यांना 2 प्रतीत विहित नमुन्यामध्ये स्वतंत्रपणे सूचना पाठवावयाच्या असतात. तलाठयाने ,त्याने केलेल्या फेरफार नोंदीची उक्त सूचनेच्या स्तंभ 13 मध्ये नोंद करावी आणि त्यांची दुसरी प्रत तहसीलदाराला पाठवावी .

 

 

          32.  अंतिम नगररचना योजना अंमलात येते तेव्हा उक्त योजनेशी संवादी होण्यासाठी नवीन अधिकार अभिलेख तलाठयाने तयार करावयाचे असतात. वरील परिच्छे 14 (सहा) अनुसार असा अभिलेख, ही अधिकार अभिलेखाची स्वच्छ प्रत समजावयाची असते. अशा अधिकार अभिलेखाचे प्रवर्तन करण्यासाठी परिच्छेद (सहा) ते (नऊ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करावयाचा असतो.

 

          33.  अपील किंवा पुनरीक्षण प्राधिकाऱ्याने आदेश दिल्यामुळे अधिकार अभिलेखामधील किंवा फेरफारांच्या नोंदवहीमधील एखादी नोंद दुरुस्त करावयाची असते, तलाठयाने तसे करुन उक्त आदेशाचा क्रमांक आणि दिनांक  प्राधिकाऱ्याचे पदनाम दर्शवावयाचे असते. अशी दुरुस्ती बाधित व्यक्तिंना नोटीस  पाठवता करावयाची असते.

 

तीन - पूरक सूचना

 

       34.  शासकीय अधिसूचना,महसूल  वन विभाग क्र. युएनएफ/2267-आर,दिनांक 10ऑगस्ट 1967.- अधिनियमाची कलमे 148 ते 159 (दोन्हींचा समावेश करुन) यामध्ये असलेले अधिकार अभिलेखासंबंधीचे उपबंध पुढील क्षेत्रांमध्ये अंमलात नाहीत :-

 

(एक) अधिनियमाच्या कलम 122 अन्वये निश्चित केलेली आणि उक्त अधिनियमाखाली भूमापन  केलेली गावठाणे  गावाच्या जागा,

 

          (दोन) भूमापन  केलेली गावे,

 

          (तीन) राखीव वन क्षेत्रातील गावे.

 

       35.  शासकीय परिपत्रक महसूल विभाग क्रमांक सीओएन.3553,दिनांक 31जूलै1954. - अधिकार अभिलेखामध्ये आढळून येणारे कुळांचे अधिकार, ते कायदेशीरपणे निर्वापित होईपर्यंत योग्य प्रकारे सुरक्षित राखण्यात येत आहेत  केवळ काही चुकीमुळे किंवा लबाडीमुळे कुळांची नावे जमिनीचे प्रत्यक्ष लागवडदार म्हणून कुळवहिवाट नोंदवहीमध्ये नमूद केलेली नसल्यामुळे अशा कुळांना बेदखल करण्यात किंवा अन्यथा त्यांचे अधिकार कमी करण्यात जमीनमालक यशस्वी होत नाहीत हे पाहण्याची काळजी महसूल अधिकाऱ्याने सर्व प्रकरणांमध्ये ध्यावयाची असते. चौकशी केल्यानंतर तलाठयाने कुळवहीवाट नोंदवहिमध्ये केलेली नोंद बनावट असल्याचे तहसीलदाराला आढळल्यास उक्त तलाठयाला परावर्तक शिक्षा देण्यात यावी.

 

36.  शासकीय परिपत्रक महसूल विभाग क्रमांक सीओएन. 3553,दिनांक 31 जूलै 1954 .- मुंबईचा जमिनीचे तुकडे करण्यास प्रतिबंध करण्याबाबत  त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या तरतूदींमुळे प्रभावशून्य (व्हाईड) असलेल्या व्यवहारांच्या अधिकार अभिलेखामध्ये नोंदी करण्यासंबंधी तपशीलवार सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत. व्यवहार प्रभावशून्य असेल तेथे देखील चौकशी केल्यानंतर कब्जाच्या वस्तुस्थितीनुसार नोंद करण्यात यावी परंतु, इतर अधिकारांच्या स्थंभामध्ये कब्जा अवैध असल्याची नोंद करण्यात यावी. शंकास्पद प्रकरणे जमाबंदी आयुक्त  संचालक ,भूमि अभिलेखा यांच्याकडे पाठविण्यात यावीत.

 

37.  शासकीय परिपत्रक महसूल विभाग क्रमांक टीएनसी - 1957-103275-एम,-दिनांक 9 सप्टेबर 9157 .- मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिनी (सुधारणा) अधिनियम 1955,च्या प्रारंभाच्या लगतपूर्वी अधिकार अभिलेखामध्ये ज्याच्या नावाची नोंद स्थायी कूळ म्हणून केलेली असेल ते कूळ उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ स्थायी ,कूळ असते,मात्र अधिकार अभिलेखामध्ये त्याच्या नावाची नोंद वैध रीतीने केलेली असावी. तथापि, कोणत्याही जमीनमालकाला, त्याला उपलब्ध असेल अशी कार्यवाही करुन  कुळाचा दर्जा अमान्य करुन नोंदीच्या अचूकपणाबद्दल अक्षेप घेण्यास मोकळीक राहील.अशा एखादया कार्यवाहीमध्ये नोंद चुकीची असल्याबदलचा दावा सिध्द करण्यात जमीन मालक यशस्वी झाल्यास ,त्याप्रमाणे नोंद दुरुस्त करावी लागेल. हा अचूकपणा चुकीची नोंद केल्याच्या दिनांकापासून भूतलक्षी प्रभावाने अमलात राहील आणि अशी दुरुस्ती केल्यानंतर ,ज्याच्या नावाची नोंद चुकीने करण्यात आली त्या कुळाला स्थायी कुळांच्या अधिकारावर हक्क सांगता येणार नाही.

 

38.  शासकीय प्ररिपत्रक महसूल विभाग क्रमांक टीएनसी-6758/3725-,एम,दिनांक 15 मार्च 1958 .-  वार्षिक पिक निरीक्षणाच्या वेळी, बऱ्याच प्रकरणांमध्ये तलाठी कुळांच्या नोंदवहीमध्ये चुकीच्या नोंदी करीत असल्याचे आढळून आले आहे.मंडल निरीक्षक आणि भेट देणारे कूळ वहिवाट आणि महसूल कर्मचारी यांनी शक्य असेल तितक्या नांेदी तपासाव्यात,परंतू कोणत्याही परिस्थितीत तलाठयाने उक्त नोंदवहीमध्ये केलेल्या बदलांच्या किमान  50 टक्के इतके बदल तपासले पाहिजेत .

 

39.  शासकीय परिपत्रक महसूल  वन विभाग आरटीएस-4363 /1027-एम,दि.9 डिसेंबर   1964.-  पाटबंधारे अधिनियमाखाली जलसिंचनासाठी पाण्याच्या वापरास परवानगी देण्याच्या प्रयोजनार्थ पाठबंधारे  वीज विभागाच्या अधिकाऱ्यानी अधिकार अभिलेखाच्या प्रती ठेवावयाच्या असतात . या प्रती अद्ययावत करण्यासाठी वर्षातून दोनदा त्याची मुळ प्रतींबरोबर पडताळणी करणे आवश्यक असते.म्हणून,पाठबंधारे  वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या अभिलेखांची पडताळणी करणे  ते अद्ययावत करणे शक्य व्हावे म्हणून, त्यांना संपूर्ण सहकार्य देण्याचे निदेश महसूल अधिकाऱ्यांना आणि विशेषत: तलाठयांना देण्यात आले आहेत.

 

40.  शासकीय परिपत्रक महसूल  वन विभाग क्रमांक आरटीएस -4368/14699-एम,दि.19 सप्टेंबर 1968.-  महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियमाच्या कलम 25 अन्वये, व्याप्त जमिनीत उभ्या असलेल्या किंवा वाढणाऱ्या सर्व झाडांवरील हक्क ती जमिन धारण करणाऱ्यांकडे निहित होत असले तरी झाडे पाडण्याबाबतच्या (विनियत ) अधिनियमाच्या उपबंधांनुसार पुढील झाडे तोडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

 

 

(एक) साग,

 

(दोन) हिरडा,

 

(तीन) मोह,

 

(चार) चिंच,

 

(पाच) आंबा,    ) रत्नागिरी जिल्हयामधील वगळून

 

(सहा) फणस,  )  रत्नागिरी जिल्हयामधील वगळून

 

(सात) खैर,

 

     भोगवटादारांनी तारतम्य  ठेवता ही झाडे पाडू नयेत म्हणून तलाठयाने त्या जमिनीशी संबंध्द असलेल्या अधिकार अभिलेखामध्ये , त्या जमिनीवर उभ्या असलेल्या,पूर्वोक्त जातींच्या झाडांच्या निश्चित संख्येची नोंद करावी.

 

   41.  शासकीय ज्ञापन महसूल  वन विभाग क्र. एस- 14/127652-एम, दि. 7 फेब्रुवारी 1968 आणि आरटीएस ज्ञ्4368-33144-एम,दिनांका 16 एप्रील 1968.- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 150 (4) खाली राज्यातील बहूतेक सर्व जिल्हयामध्ये ज्यांचे प्रमाणन अद्याप व्हावयाचे आहे अशा फेरफार नोंदीची संख्या फार मोठी असल्याचे शासनास आढळून आले आहे. फक्त विवादविशयक प्रकरणे शक्यतोवर एका वर्षाच्या आत निकालात काढणे आवश्यक आहे. कोणताही विवाद नसेल अशा प्रकरणांमध्ये,हितसंबंधित व्यक्तिंना अगदी अल्पावधितच योग्य नोटीस पाठवून त्यानंतर फेरफारांच्या नोंदी प्रमाणित करता येतात. म्हणून, उच्च पातळीवरील महसूल अधिकाऱ्यांनी ठराविक कालावधिनंतर फेरफार नोंदीच्या प्रमाणनाच्या कामाची तपासणी करावी आणि शक्य तितक्या लवकर त्या प्रमाणित करण्यात येत आहेत हे पहावे.

 

42.  शासकीय परिपत्रक महसूल  वन विभाग एलएनडी - 1065/46503-बी दि. 17 ऑगस्ट 1965 .-  मुंबई ग्राम पंचायत अधिनियम,1958 च्या कलम 51 अन्वये शासनाला, ते घालून देईल अशा शर्तीच्या आणि निर्बंधांच्या अधिन राहून, मोकळया जागा ,पडीत ,रिकाम्या किंवा चराईच्या जमिनी किंवा सार्वजनिक  मार्ग आणि रस्ते इत्यादी पंचायतीकडे निहित करता येतील. अशा प्रकारे मालमत्ता निहित करता येतील.अशा प्रकारे मालमत्ता निहित केल्यावर , मालमत्तांच्या मालकीसंबंधीचे वाद टाळण्यासाठी, अशा मालमत्तांचे ग्राम पंचायतीकडे हस्तांतरण घडवून आणणाऱ्या नोंदी गाव अभिलेखांमध्ये करणे आवश्यक आहे.

Comments