उच्च व तंत्रशिक्षण विभागाने Infosys कंपनी यांच्यासमवेत दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मंत्रालयातील मा. मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण महोदयांच्या ५ वा मजला मुख्य इमारत येथील दालन क्रमांक ५०१ येथे संपन्न झालेल्या बैठकीत Infosys कंपनीच्या Springboard या ऑनलाईन मंच (Platform) वर उपलब्ध असलेल्या नि:शुल्क ऑनलाईन कोर्सेसचा फायदा हा राज्यातील सर्व शासकीय/अशासकीय महाविद्यालयांतील विध्यार्थी व शिक्षक यांना होण्याच्या दृष्टीने, तसेच विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी व शासकीय विज्ञान संस्था, नागपूर या संस्थाना Infosys कंपनीकडून उचित सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई व संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे आणि इन्फोसिस कंपनी मध्ये एक महत्वपूर्ण "त्री पक्षीय सामजस्य करार (MOU)" करण्यात आलेला आहे.
Infosys कंपनीने त्याच्या Springboard या ऑनलाईन मंच (Platform) वर सामाजिक दायित्व अंतर्गत विविध शाखा / विषयाचे अंदाजे १२०००+ कोर्सेस नि:शुल्क उपलब्ध करून दिलेले आहेत. राज्यातील महाविद्यालयीन विध्यार्थी यांना तसेच शिक्षकांना या कोर्सेसचा फायदा होण्याच्या दृष्टीने शासनाने Infosys कंपनीसोबत उपरोक्त सामजस्य करार केलेला आहे. सदरहू त्री पक्षीय सामजस्य करारामुळे राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात अधिक कार्यक्षमता आणि भविष्यात चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मौलिक मदत होणार आहे. त्यामुळे Infosys कंपनीसोबतच्या उपरोक्त सामजस्य करारास विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.
संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे तसेच संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई आणि राज्यातील शासकीय/अशासकीय विध्यापीठे व त्यांच्याशी सलग्नीत शासकीय/अशासकीय अनुदानित / विना अनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थांना तसेच शिक्षकांना यांना या मध्ये सहभाग घेता येईल.
दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई व संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे आणि Infosys कंपनी मध्ये एक महत्वपूर्ण "त्री पक्षीय सामजस्य करार (MOU)"
विद्यार्थी व शिक्षक यांनी संबंधित संस्थेतील स्प्रिंगबोर्ड नोडल अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉगीन करून त्यांचा प्रोफाईल भरून विविध कोर्सेस साठी नोंदणी करावी.
Technical Webinar Series ( 4:00 PM - 5:30 PM)
Big Data Technology Landscape & Hadoop vs Spark (July 7, 2023) : Understanding Big Data and its technologies Hadoop and NoSQL databases along with use cases and scenarios in real time.
AI First Software Engineering (July 12, 2023 ) : Deep dive into the uses of AI-First strategy in Software Engineering.
Essentials of Cloud Computing (July 19, 2023 ) : Discuss what Cloud Computing is and its various service and deployment models & Overview of leading Cloud Service Providers and Cloud Native Development themes.
Fundamentals of Cybersecurity (July 26 , 2023 ) : Understand Information Security & Cyber Security and the difference between them , Learn basic terminologies used in the paradigm of Cyber Security & Understand cryptography techniques used for Data Security and the significance of Network Security and Platform security