२०१७ मध्ये स्थापना झाल्यापासून श्रीमती इंद्राणी बालन सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटरने (एसएसी) हजारो शालेय मुले व शिक्षकांसह कृती-आधारित प्रात्यक्षिके आणि कार्यशाळा व सत्रे घेतली आहेत. २०१९ मध्ये आयोजित केलेल्या ओपन हाऊसने केवळ एका दिवसात १०,००० पेक्षा जास्त लोकांना आकर्षित केले. COVID-19 दरम्यानही, बालन सेंटर ऑनलाईन मालिकांमार्फत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सतत संपर्कात राहिले आहे. या मालिका संपूर्ण भारतभर हजारोंपर्यंत पोहोचल्या आणि यूट्यूबवरील दर्शकांची संख्या लाखांवर पोहोचली आहे. यापैकी काही प्रकल्प बाहेरील समर्थनाने तर बहुतेक प्रकल्प स्वतः संस्थेतर्फे चालविले जातात. पुढील अनेक महिने आणि वर्ष हे प्रकल्प सुरळीत चालू ठेवण्यास आम्ही मदतीचे आवाहन करण्यास आपल्याशी संपर्क साधत आहोत.
सध्या COVID -१९ च्या अनुषंगाने लागलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थी आणि शिक्षक घरीच आहेत, शाळा एकतर बंद आहेत किंवा ऑनलाइन कार्यक्रमांना सुरुवात करीत आहेत. हि परिस्थिती लक्षात घेऊन जून २०२० मध्ये ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे ‘द नेक्स्ट जेन सायन्स कॅम्प’ मालिका सुरू करण्यात आली. सदर मालिकेत दर रविवारी सकाळी अकरा वाजता ऍक्टिव्हिटी सेंटरची टीम विज्ञान विषयक प्रात्यक्षिके घेते. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे वैज्ञानिकांसह असणारे प्रश्नोत्तर सत्र. या मालिकेचे यूट्यूबवर ५ लाखाहून जास्त प्रेक्षक आहेत.
आयसर पुणे आणि सीबीएसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयआयटी गांधीनगर येथील क्रिएटिव्ह लर्निंग सेंटरने शिक्षकांसाठी नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून ३०-३० स्टेम ही कार्यशाळा सुरू केली आहे. हा कार्यक्रम मूलभूत संकल्पनांचे आकलन आणि गणित व विज्ञानासंबंधीत विचारांवर केंद्रित आहे. दर रविवारी संध्याकाळी ४ ते ५ या दरम्यान या सत्राचे यूट्यूबवर थेट प्रक्षेपण केले जाते. मालिकेच्या प्रत्येक सत्राला देशभरातून १.५ लाखाहून जास्त प्रेक्षक लाभले आहेत.
रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या सहकार्याने, १२ भागांची वेबिनार मालिका १२ सप्टेंबरपासून सुरु केली गेली. हि वेबिनार मालिका दर शनिवारी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत थेट प्रक्षेपित केली जाते. हे वेबिनार डिजिटल शैक्षणिक अध्यापनशास्त्र आणि डिजिटल वर्गांमध्ये त्याचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करतात. या मालिके मार्फत जगभरातील तज्ञांना एकत्र आणून विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, त्यांची आकलन क्षमता, मूल्यांकन तंत्र, सिम्युलेशनवर आधारित शिक्षण, डिजिटल लर्निंगसाठी वर्गीकरण इत्यादी विषयांवर चर्चा करीत केली जाते. शेकडो शिक्षकांनी सत्रांचा लाभ घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (एमएससीईआरटी) च्या सहकार्याने महाराष्ट्रातील शालेय शिक्षकांसाठी, १० भागांची मालिका ऑनलाईन सादर केली जात आहे. या कार्यशाळेत वर्ग हँड्स-ऑन मॉडेलद्वारे परस्परसंवादी आणि आकर्षक बनविण्याचा मानस आहे. या कार्यक्रमाचे उद्दीष्ट शिक्षण परस्परसंवादी, संकल्पनांवर आधारित बनविणे आणि विज्ञान व गणितासाठी कुशल शिक्षक तयार करणे आहे. मालिकेतील पहिल्याच भागाला ९०,००० हुन जास्त प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे.
आयसर पुणे, आयकर कायदा १९६१ च्या कलम १२ अ अंतर्गत नोंदणीकृत आहे. देणगीदारांतर्फे मिळालेली रक्कम ही आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० जी अंतर्गत करातून सूट मिळण्यासाठी पात्र आहे. वैज्ञानिक संशोधनासाठी वापरले जाणारे कॉर्पोरेट योगदान हे आयकर कायदा 1961 च्या कलम ८० जी (५) (vi) आणि कलम 35 (1) (ii) अंतर्गत कपातीस पात्र आहेत