|
तुझीच याद
जेव्हा उदास वाटे, खंतावल्या मनाला तेव्हा तुझीच याद, देते मला दिलासा
जेव्हा हिवाळी वारा, देहास दे शहारा तेव्हा तुझीच याद, शेकावया निखारा
जेव्हा तहानलेल्या, ओठास आस न्यारी तेव्हा तुझीच याद, बेधुंद मद्य प्याला
जेव्हा जडावलेल्या, डोळ्यास पेंग भारी तेव्हा तुझीच याद, घेतो जरा उशाला
जेव्हा सतारीतुनी, स्वर ये सुनेसुनेसे तेव्हा तुझीच याद, झंकार देई तारा
जेव्हा निरोप द्याया, येतील लोक अंती तेव्हा तुझीच याद, होईल श्वेत शेला
© सुरेश नायर ३ /२०१० |