श्रीमद् वाल्मीकि रामायण
UPDATE ON 1st / 15th of Month - [use ctrl+ or ctrl- for zoom in/zoom out] प्रास्ताविक अयोध्याकाण्ड अरण्यकाण्ड किष्किंधाकाण्ड सुंदरकाण्ड युद्धकाण्ड उत्तरकाण्ड
| moving/migrating hence please visit [http://sites.google.com/site/shreevalmikiramayan/Home ]
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे । वेद ज्या परमात्माचे वर्णन करतात तेथे श्रीमन्नारायणतत्त्व श्रीमद्रामायणात श्रीरूपाने निवेदित आहे. वेदवेद्य परमपुरुषोत्तमाचे दशरथनंदन श्रीरामाच्या रूपामध्ये अवतरण झाल्यवर साक्षात् वेदच श्रीवाल्मीकिंच्या मुखातून श्रीरामायणरूपात प्रकट झाले, अशी आस्तिकांची चिरकालापासून मान्यता आहे. म्हणून श्रीमद्वाल्मीकीय रामायणास वेदतुल्यच प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. तसेच महर्षि वाल्मीकि आदिकवि आहेत, म्हणून विश्वातील समस्त कवींचे गुरु आहेत. त्यांचे 'आदिकाव्य' श्रीमद्वाल्मीकीय रामायण भूतलावरील प्रथम काव्य आहे. ती सर्वांसाठी पूज्य वस्तू आहे. भारतासाठी तर ती परम गौरवाची गोष्ट आहे आणि देशाचा खराखुरा बहुमूल्य राष्ट्रीय निधि आहे. या नात्यानेही ती सर्वांसाठी संग्रह, पठण, मनन आणि श्रवण करण्याची वस्तु आहे. याचे एकेक अक्षर महापातकाचा नाश करणारे आहे - एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् । तसेच हे समस्त काव्यांचे बीज आहे - काव्यबीजं सनातनम् ( बृहद्धर्म १.३०.४७) पठं रामायणं व्यास काव्यबीजं सनातनम् । यत्र रामचरितं स्यात् तदहं तत्र शक्तिमान् ॥ )बृहद्धर्म १.३०.४७,५१) या उक्तीनुसार श्रीव्यासदेवादि सर्व कवींनी श्रीवाल्मीकि रामायणाचे अध्ययन करून पुराणे, महाभारत आदिंची निर्मिती केली आहे. हेच बृहद्धर्म पुराणात विस्ताराने सांगितले आहे. श्रीव्यासांनी अनेक पुराणांतून रामायणाचे माहात्म्य वर्णन केले आहे. स्कंदपुराणातील रामायणमाहात्म्य तर या ग्रंथाच्या आरंभीच दिलेले आहे. इतरत्रही काही ठिकाणी माहात्म्य वर्णन आढळते. श्रीव्यासांनी युधिष्ठिराच्या विनंतीवरून वाल्मिकी रामायणावर 'रामायणतात्पर्य दीपिका' नामक एक टीका लिहिली होती आणि तिची हस्तलिखित प्रत आजही उपलब्ध आहे (असे श्री. के. एस्. रामशास्त्री त्यांच्या 'Riddles in Ramayana' या ग्रंथात म्हणतात). श्री वाल्मीकिंची आदिकवि म्हणून श्रद्धापूर्वक गौरवयुक्त वचने स्कंदपुराण, अध्यात्मरामायण, श्रीमद्भागवत, कालिदासांचे 'रघुवंश' इत्यादि अनेक ठिकाणी आढळतात. तसेच महाकवि भास, आचार्य शंकर, रामानुजाचार्य, राजा भोज, गोस्वामी तुलसीदास यांच्या साहित्यातून वाल्मीकिंचे आदिकवि म्हणून वारंवार श्रद्धापूर्वक स्मरण व कृतज्ञता प्रकट केली आहे. महर्षि वाल्मीकिंचे संक्षिप्त चरीत्र महर्षि वाल्मीकिंना काही लोक निम्न जातिचे मानतात. पण वाल्मीकि रामायण तसेच अध्यात्मरामायण येथे त्यांना प्रचेताचे पुत्र मानले गेले आहे. मनुस्मृतिनुसार प्रचेतस यास वसिष्ठ, भृगु आदिंचा बंधु म्हाटले आहे. स्कंदपुराणातून त्यांना जन्मांतरातील व्याध असे सांगितले गेले आहे. व्याध जन्माच्या आधीही ते 'स्तम्भ' नामक श्रीवत्सगोत्रीय ब्राह्मण होते. व्याध जन्मात शंख ऋषिंच्या सत्संगाने रामनामाच्या जपाने ते दुसर्या जन्मात 'अग्निशर्मा' (मतभेदानुसार 'रत्नाकर') या नावाने होते. नंतर शप्तर्षिंच्या सत्संगाने मरा मराचा दीर्घकाळ जप, अंगावर वारूळ वाढेपर्यंत केल्याने ते पुढे वाल्मीकि नामाने प्रसिद्ध झाले आणि त्यांनी वाल्मीकि रामायणाची रचना केली. कृतिवास रामायण (बंगाली), रामचरितमानस, अध्यात्मरामायण, आनंदरामायण, भविष्यपुराण येथेही थोड्याफार फरकाने अश्याच आशयाचे वर्णन आढळते. यावरून त्यांना नीच जातिचे मानणे सर्वथा भ्रममूलक वाटते. ( काम चालू आहे) |
