SE Logo

    free counters

    Home

    -----------------------------------------------------

     चुन्याचा घाणा

    भीमाचे मंदीर किंवा दारुकोठार

    गडावरुन दिसणारे दृश्य 

    पाण्याचा तलाव

    केंजाई मंदीर

    केंजाई मंदीर

    कोळी गुहा

    कातळामध्ये खोदलेल्या पाय-या 

    केंजळमाची

    कोण कोण गेले होते - आल्हाद, मनीष, शैलेश, प्रमोद, चैतन्य,  भालचंद्र

     

                (उर्फ कासलोसगड उर्फ केळंजा उर्फ मोहनगड)

     

    किल्ल्याचा प्रकारः गिरीदुर्ग        उंची: 4269 फूट  

    जवळचे ठिकाण: भोर, वाई          जिल्हा: सातारा

     

    सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांपैकी ज्या किल्ल्याच्या पाय-या फार श्रम करुन खोदलेल्या आहेत असा हा केंजळगड आहे. महादेव डोंगराचा मांढरदेव नावाचा एक सुळका पुढे आलेला आहे त्यावर हा किल्ला बांधलेला आहे.

    ------------------------------------------------------------------

    इतिहासः-

    शिलाहार राजा भोज द्वितीय याने निर्मीलेल्या अनेक किल्ल्यांपैकी एक असा केंजळगड. हा प्राचीन दुर्ग शिवकाळात ओस पडला होता. हा भाग विजापूरच्या आदिलशाहीत येत होता. शिवाजीमहाराजांनी हा ओसाड गड वसवण्याचे ठरवले. त्यांनी हे काम बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर सोपवले. . . 1659 मध्ये महाराजांनी केंजळगड वसवला. पुढे सन 1666 मध्ये हा गड आदिलशाहीच्या ताब्यात आला. म्हणजे पुरंदरच्या तहानंतरच्या काळात कधीतरी हा आदिलशाही कडे आला असावा.  24 एप्रिल 1674 रोजी मराठ्यांनी सुलतानढवा केला, त्यात गडाचा नाईक गंगाजी विश्वासराव मारला गेला गड मराठ्यांच्या ताब्यात आला. 1701 मध्ये औरंगजेबाने जिंकलेला हा गड लगेच 1702 मध्ये मराठ्यांनी जिंकला.  1818  मध्ये इंग्रजानी बाकी किल्ल्यांबरोबर केंजळगड पण जिंकला.

     

    कसे जावे:- 

    1. भोरमार्गे:-  पुणे- भोर हे अंतर साधारण 65-70 कि.मी आहे. भोरहून पायथ्याचे कोर्ले गाव 22-25 कि.मी अंतरावर आहे. गडावर पोचायला साधारण 2 तास लागतात.
    2. वाईमार्गे:- पुणे-वाई अंतर 85-90 कि.मी आहे. वाईहून साधारण 20 कि.मी लांब खावली गावात यावे. इथून गड चढायला दिड-दोन तासात गडावर जाणा-या सोंडेवर आपण पोचतो.
    3. रायरेश्वरमार्गे:- रायरेश्वरच्या देवळाच्या समोर उजवीकडच्या शेताच्या बांधावरून उतरावे. पठार संपल्यावर लोखंडी शिडी लागते. शिडी उतरल्यावर उजवीकडे खावली गाव दिसते. या मार्गाला श्वानदरा मार्ग म्हणतात. या वाटेने चालत गेल्यावर दोन-तीन तासात केंजळगडाच्या कातळापाशी आपण पोचतो.

    गडावर काय आहे:-  गडाचे आकारमान लहान आहे. केंजळगडाचा माथा केवळ 230 मीटर लांब, 92 मीटर रुंद आहे. अवशेष फार नाहीत. कातळाच्या अलीकडे एक गुहा लागते, त्यात काळ्या रंगाचे कोळी प्रचंड प्रमाणात आहेत. कोळ्यांचे पुजंके गुहेच्या छ्तावरुन कोसळत असतातकातळामध्ये खोदलेल्या 55 रुंद पाय-या चढुन बालेकिल्ल्यावर यावे. डावीकडे पाण्याचा तलाव आहे. पश्चिमेकडे जाताना एक छत नसलेली इमारत लागते. याला भीमाचे मंदीर किंवा दारुकोठार पण म्हणतात. याच्या चारही भिंती शाबूत आहेत. आत मध्ये एक झाड पण आहे. छ्त बांधल्यास इथे 4-5 जणांची निवा-याची उत्तम सोय होऊ शकते. जवळच मंदीराचे भग्नावशेष आहेत, केंजाई देवीची मूर्ती, नक्षीकाम केलेले दगड आहेत. गडावर दोन चांगल्या स्थितीत असलेले चुन्याचे घाणे आहेतपश्चिमेकडे पडझड झालेला बुरुज आहे, काही पाण्याच्या टाक्या आहेत. पूर्ण गडावर कमरे इतके गवत माजलेले आहे, त्यामुळे बांधकाम कुठे-कुठे केलेले आहे याचा अंदाज येत नाही. गडावरुन पश्चिम दिशेकडे बघितल्यास खाली खावली गाव, वाळकी नदी दिसते, उत्तरेकडे रायरेश्वराचे पठार दिसते तर दक्षिणेकडे कमळगड, पाचगणी महाबळेश्वरची पठारें दिसतात.

     

    महत्त्वाचे:-

    1. गडावर राहण्याची सोय नाही, गडाखालच्या केंजळमाचीवरच्या केंजळाई मंदीरात 8-10 जण राहू शकतात
    2. जेवणाची सोय आपली आपणच करावी
    3. गडावरंच्या तलाव टाक्यांमध्ये  पाणी फक्त पावसाळ्यात मिळेल, उन्हाळ्यात पाणी आटून जाते.

    आपण करण्यासारखे काही:-  

    1. गडावर झाडे अजिबात नाहीत त्यामुळे जाताना विविध झांडाच्या बिया वाटेवर आणि गडावर टाकल्या तर पावसाळ्यात त्या रुजतील काही वर्षात झाडे वाढतील. यासाठी वर्षभर बिया साठवायला हव्यात.
    2. पाण्याचे तळे स्वच्छ ठेवावे.
    3. प्लास्टिकचा किंवा अन्य कचरा करु नये
    4. गडावर कुठेही कशानेही नाव लिहु नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारुन सुद्धा आपले नाव कुठेही लिहले नाही तर आपण लिहीणारे कोण. कुठे नाव लिहीलेले आढळल्यास फोटो काढून आम्हास पाठविणे
    5. गडावर दारू पिऊन धिंगाणा घालु नये इतरांनाही परावृत्त करावे.

    ====================================================

    आभारः हा लेख लिहीताना आम्हाला आदरणीय कै. गो. नी. दाडेंकरांच्या ' किल्ले' (मॅजेस्टिक प्रकाशन, मुबंई), श्री सतीश अक्कलकोट यांच्या ' दुर्ग' (सह्याद्री भ्रमण मंडळ प्रकाशन, सांगली), या पुस्तकांची मोलाची मदत झालीही पुस्तके संग्राह्य आहेत ती जरुर वाचावीत.

    ------------------------------------------------------------------ 

     गडावरची काही फुले