षोडशोपचार पूजा

आपण अनेक वेळा षोडशोपचार पूजे बद्दल ऎकतो, पण प्रत्येक वेळी त्याची नेमकी माहीती नसते. दा. कृ. सोमण यांच्या महाराष्ट्र टाइम्स मधील लेखतून ही माहीती घेतली आहे.

षोडशोपचार पूजेत खालिल गोष्टी येतात.

१. आवाहन
२. आसन
३. पाद्य
४. अर्घ्य
५. आचमन
६. स्नान
७. वस्त्र
८. यज्ञोपवीत
९. गंध
१०. पुष्प
११. धूप
१२. दीप
१३. नैवेद्य
१४. नमस्कार
१५. प्रदक्षिणा
१६. मंत्रपुष्प

फूल न मिळाल्यास फळ,
ते न मिळाल्यास पानं, तीही न मिळाल्यास पाणी, तेही न मिळाल्यास शुभ्र म्हणजे धुतलेल्या तांदळांनी म्हणजेच अक्षतांनी देवांची पूजा करावी.

  • आवाहन - अक्षता वाहून देवाला आवाहन केलं जातं.
  • आसन - हा उपचार समर्पित करताना देवतेच्या बैठकीखाली अक्षता किंवा पाच फुलं ठेवतात. विष्णूच्या आसनाखाली तुळशीचीइ पानं ठेवतात.
  • पाद्य - पाद्य उपचार मूर्तीच्या पायांवर फुलाने पाणी शिंपडून अर्पण केला जातो.
  • अर्घ्य - गंधमिश्रीत पाणी फुलाने मूर्तीवर शिंपडतात. अर्घ्यासाठी पाण्यात दही, अक्षता, कुशग्रं, दूध, दूर्वा, मध, यव आणि पांढरी मोहरीही घालतात.
  • आचमन - देवाला पिण्यासाठी आणि चूळ भरण्यासाठी पाणी देण्यालाच 'आचमन' म्हणतात. त्यासाठी पळीत पाणी घेऊन फुलाने चार वेळा मूर्तीवर शिंपडतात. या पाण्यात लवंग, वेलदोडा, वाळा, कंकोळही घालतात.
  • स्नान - यासाठी पळीत पाणी घेऊन दुर्वांनी किंवा फुलांनी ते मूर्तीच्या अंगावर शिंपडतात. तेल, उटण इत्यादींनी अभ्यंग घालून उष्णोदकाने स्नान घालतात्. पंचामृत स्नानासाठी दूध, दही, तूप मध आणि साखर यांचा वापर करतात.
  • वस्त्र - कापसाचं वस्त्र देवाला अर्पण करतात.
  • यज्ञोपवीत - पुरुष देवतांना यज्ञोपवीत (जानवं) अर्पण करतात.
  • गंध - देवाला चंदन, कस्तुरी, कापूर, कुंकू आणि जायफळ लेप लावतात.
  • पुष्प - गणपतीला लाल पुष्प प्रिय आह्e. विष्णूला चंपक, मलती, कुंद व जाईची फुलं आवडतात. शंकराला रुई, करवीर, द्रोण, कुश, धोतरा, नीलकमल प्रिय आहे .
  • धूप - सुगंधी व मन प्रसन्न करणारा असावा. धूपासाठी चंदन, गुग्गुळ, राळ, जटामांसी इत्यादी सुवासिक पदार्थ वापरतात.
  • दीप - तुपाचा व तिळाच्या तेलाचा दिवा प्रशस्त आहे . निरांजनात तूप आणि फुलवात घलून ते प्रज्वलित करून ओवाळतात.
  • नैवेद्य - आपण जे अन्न खातो ते देवाला नैवेद्यासाठी चलतं. नैवेद्य दाखवताना खाली चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्य ठेवतात.
'प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा'
असे म्हणून 'मध्ये पानीय' म्हणून नंतर प्राणाय स्वाहा इत्यादी मंत्र म्हणतात.
  • नमस्कार - देवापुढे नम्र होऊन साष्टांग नमस्कार घालतात.
  • प्रदक्षिणा - देवाभोवती प्रदक्षिणा घालतात. शक्य नसेल तर स्वत:भोवती फिरवून प्रदक्षिणा घालतात.
  • मंत्रपुष्प - मंत्रपुष्प अर्पण करतात.