v)सांगता समारंभ वृतांत

जीवन विकास मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभाचा वृत्तांत

        जीवन विकास मंडळाचा सुवर्णमहोत्सव ते मे ह्या तीन दिवशी झालेल्या वेगवेगळ्या चार कार्यक्रमातून संपन्न झाला.शुक्रवारी दि. १मे रोजी स्व.बिशप आब्रियो यांची पुण्यतिथी.त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करुन,सर्वांचे  स्वागताध्यक्ष पास्कोल गोम्स यांनी स्वागत करुन ग्रंथ दिंडीला सुरूवात झाली.पालखीत ज्ञानेश्वरीची विधीवत स्थापना करून प्रसिद्ध विज्ञान लेखक श्री.जोसेफ तुस्कानो यांच्या हस्ते पूजा करुन दिंडीला प्रारंभ झाला.सर्वांना उन्हात घालण्यासाठी टोप्या देण्यात आल्या.सोबत नाश्ता  पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.शुभारंभासाठी परिसरातील शंभरावर स्त्री-पुरुष हजर होते.दिंडीमध्ये सुरवातील ढोल ड्र्म वाजवणारी मुले एका उघडया गाडीमध्ये.त्यानंतर दुस-या गाडीत पालखी पारंपारिक वेशातील काही मुले तसेच मेगाफोनवर घोषणा करण्याची सोय.त्यानंतर जेष्ठ कार्यकर्ते महिला यांची गाडी.दहा पंधरा मोटार सायकलीवर पंचवीसेक कार्यकर्ते अशी दिंडी निघाली.ती प्रथम भुईगावला गेली.तेथे युवा वाचनालयाच्या ग्रंथपाल होत्या.त्यांना मन्या काकांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.तेथून दिंडी गासात गेली.तेथेही परस्पर् सहायक वाचनालयाच्या ग्रंथपालांना स्मृतिचिन्ह प्रदान करुन दिंडी सोपा-यात गेली.सोपा-यातील संस्कार वाचनालयात मात्र जंगी स्वागत झाले.प्रशांत वाळिंजकरने सर्व कार्यकर्त्यांना जमवून दिडीतील पालखी खांद्यावर घेऊन त्यांच्या वाचनालया पुढे नेऊन ठेवली.वाचनालयात सर्वांच्या चहापाण्याची सोय केली.खाली आरती भजन पूजन भाषणे होऊन तेथून बाहेर पडलो.पुढे उमराळ्यात गेलो तेथील ज्ञान-ज्योत वाचनालय नवीन आहे.तेथे ऑस्टीन रॉकी यांनी स्वागत केले आईसक्रिम देऊन थंड केले.त्यानी त्यांच्या पॅरीश प्रिस्टच्या हस्ते स्मृतिचिन्ह स्वीकारले.तेथून आगाशीला गेलो.आगाशीचे सार्वजनिक वाचनालय खूपच जुणे आहे.स्वातंत्र्या पूर्वीचे! तेथेही चांगले स्वागत झाले.तेथून नंदाखालच्या दिशेने येताना आशिषचे मित्र लोपीस यांनी आईसक्रिम दिले.तेथून नंदाखालवरून परत निर्मळला लुद्रिक स्टॉप मार्गे आलो.मंडळात पोहोचून दुपारी एक वाजता दिंडीची सांगता झाली.

          दुस-या दिवशी म्हणजे शनिवार दि. मे २००९ रोजी संध्याकाळी आठ वाजता अंध कलाकारांचा आर्केस्ट्राचा कार्यक्रम आवाजही पेहचान है झाला.त्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष रे.फा.थॉमस लोपीस होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्री. चंद्रकांत राऊत समाजकार्यकर्ते श्री.एलायस डिसोजा होते.कार्यक्रमाच्या दरम्यान अध्याक्षांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी देणगी दारांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाहुण्यांची ओळख करून देण्याचे काम संस्थेचे प्रमुख विश्वस्त आलेक्स डाबरे यांनी केले.आभार प्रदर्शन सरचिटणीस आशिष लोपीस यांनी केले.सर्व देणगीदाराना स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. सदर आर्केस्ट्राचा कार्यक्रम विनामूल्य दाखवण्यात आला.

            तिस-या दिवशी रविवार दि. मे २००९ रोजी सकाळी साडे नऊ वाजता सर्व सुवर्ण महोत्सवी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून रे.फा. जॉन रुमाव,पॅरीशप्रिस्ट,सेंट झेवियर चर्च, पार्ले,मुंबई हे लाभले होते.त्या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष श्री.पास्कोल गोम्स यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. सिल्वेस्टर परेरा यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली प्रास्ताविक केले.रे.फा. ज्यो परेरा यांना भारत सरकारणे पद्मश्रीची पदवी दिल्याबद्दल, अध्यक्षांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.त्यांच्या मानपत्राचे वाचन उपाध्यक्ष श्री फ्रान्सिस आल्मेडा यांनी केले.त्यानंतर होलीक्रॉस चर्चचे प्रमुख धर्मगुरू हायस्कूलचे प्राचार्य रे.फा.थॉमस लोपीस यांची निर्मळ धर्म ग्रामातून बदली होत असल्या मुळे त्यांच्या कार्याचा गौरव करणारे सन्मानपत्र, अध्यक्षांच्या हस्ते त्यांना अर्पण करण्यात आले.सन्मानपत्र वाचन श्री जेजू परेरा यांनी केले.फादरांनी निर्मळच्या  आध्यात्मिक विकासासाठी मोठे कार्य केले आहे.त्याबरोबरच जीवन विकास मंडळाचे ते कायम आधारस्तंभ होते.सदर कार्यक्रमासाठी सन्माननीय पाहुणे म्हणून संस्थेचे आश्रयदाते डॉ.दीपक देसाई,विरार, डॉ.जोसेफ डिसोजा,वसई,विज्ञान लेखक श्री.जोसेफ तुस्कानो,मुंबई,मर्चन्ट नेव्हीचे कॅप्टन श्री.फ्लेवियेन तुस्कानो,मुंबई ,कॅथोलिक बॅंकेच्या अध्यक्ष कुमारी डॉमनिका डाबरे हे उपस्थित होते.सर्व पाहुण्यांचा सत्कार झाल्या नंतर,पन्नास वर्षे सेवा करणा-या संस्थेच्या कार्यकर्त्यांचा स्मृतिचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला.संस्थेचे सरचिटणीस आशिष लोपीस यांना महाराष्ट्र शासना तर्फे ख्रिस्ती विवाह कायद्याखाली लग्न लावण्याचा अधिकार प्राप्त झाला म्हणून त्यांचाही सत्कार करण्यात आला. संस्थेच्या संस्थापक सदस्या पासून आज पर्यंत कार्य केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले.भाषणा मध्ये डॉ.देसाई यानी मुलांना वेगळ्या काव्यमय पद्धतीने कसे शिकवावे ते सांगितले.डॉ.डिसोजा आणि कॅप्टन फ्लेवियन यांनी त्याच्या काळातील शाळेतील आठवणींना उजाळा आणला.फा.ज्यो परेरा यांनी आपले कृपा फौडेशनचे कार्य,वसईतील मद्यपी एड्सची समस्या यावर चर्चा केली.तसेच त्यांच्या कार्यात वसईकरांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला.अध्य्क्ष फा.रुमाव यांनी संस्थेच्या इतिहासा विषयी समाजाच्या भविष्याविषयी चर्चा केली.  आभार मानण्याचे काम पतपेढीचे अध्यक्ष श्री.सिल्वेस्टर दोडती यांनी केले.

                 त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता प्रा.मोहन आपटे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम बिशप आब्रियो हॉल मध्ये झाला.विषय होता'चला चंद्रावर'. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष फा थॉमस लोपीस होते तर प्रमुखपाहुणे म्हणून प्रयोगातून विज्ञान प्रसार करणारे प्रा. भगवान चक्रदेव उपस्थित होते.प्रथम उपाध्यक्ष श्री. फ्रान्सिस आल्मेडा यांनी सर्वांचे स्वागत करून चक्रदेव सरांची ओळख करून दिली. चक्रदेव सरांनी आपटे सरांची ओळख करून दिली.आपटे सरांना अध्यक्षांच्या हस्ते शाल स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर आपटे सरांनी दीडतास एलसीडी प्रोजेक्टरच्या मदतीने चद्राच्या सफरीवर नेऊन आणले.चंद्राविषयीच्या पुराण कथांपासून सुरुवात करून,आजची चंद्र प्रवासाची स्थिती भविष्यातील योजना यावर प्रकाश टाकला.तसेच भारताने चांद्रयान१ पाठवून केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.व्याख्यान संपल्यावर उशिराने आलेल्या डॉ.दीपक देसाईंनी आपल्या खगोल शास्त्रविषयावरील कविता ऐकवून श्रोत्यांना खिळवून ठेवले.

             सांगता समारंभाच्या वरील तीन दिवसाच्या चार कार्यक्रमा बरोबरच आपले एक कार्यकर्ते श्री.जोकिम करास यांनी एक आठवड्या पूर्वी क्रिकेट सामनेही आयोजित केले होते.या सर्व कार्यक्रमासाठी मंडळाच्या नव्याजुण्या कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली.