iii)कार्यकर्त्यांचा सत्कार


सुवर्ण महोत्सवी कार्यकर्त्यांचा सत्कार 

रविवार दि.३मे२००९

 रविवार दि.१मे२००९ रोजी सकाळी साडेनऊ वाजता होलीक्रॉस चर्चच्या बिशप डॉमनिक आब्रिओ हॉलमध्ये मंडळाच्या  आता पर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांचा  सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष रे. फा. जॉन रुमाव हे होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री फा.ज्यो परेरा,कॅथोलिक बॅंकेच्या अध्यक्षा श्रीमती डॉमनिका डाबरे,होलीक्रॉस चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. थॉमस लोपीस,डॉ.दीपक देसाई,डॉ जोसेफ डिसोजा,  विज्ञान लेखक श्री जोसेफ तुस्कानो व  कॅप्टन फ्लेवियन तुस्कानो उपस्थित होते.मंडाळाचे प्रमुख विश्वस्त आलेक्स डाबरे व अध्यक्ष सिल्वेस्टर परेराही स्टेजवर होते.

                   [फोटो मोठे करण्यासाठी त्यावर क्लिक करा]
सर्व पाहुणे व्यासपीठावर.



         डॉ.दीपक देसाई भाषण करताना