-

 

                            ग्रंथपालाशी हितगूज करताना बाल वाचक       

जीवन विकास मंडळाने चेतना पुस्तकालयाची स्थापना १० जानेवारी १९६० रोजी केली.त्यावेळचे निर्मळ धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फादर जोसेफ व्हिक्टोरिया यांच्या निवासातील एका खोलीत ही सुरूवात झाली.पुढे होलीक्रॉस हायस्कूलचे त्यावेळचे प्रिन्सिपल फादर डॉमनिक आब्रिओ प्राथमिक शाळेचा एक वर्ग विनामूल्य वापरण्यास दिला.१९७० साली  संस्था व वाचनालय कोरिया सदन या भाड्याच्या खोलीत हलवण्यात आले.१९७२ साली संस्थेने स्वातःची इमारत बांधण्यासाठी जागा खरेदी केली.१९७२ साली

वाचनालयाला ग्रामीण ’क’ वर्ग मिळाला.सरकारी नियमित अनुदान मिळायला सुरूवात झाली.तसेच राजा राममोहन रॉय ट्रस्ट कडून पुस्तकांची देणगी मिळू लागली.१९७७ साला पासून संस्थेने व्याख्यान माला सुरू केली.१९८० साली संस्थेने आंतर राष्ट्रीय बालक वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे केले.१९८४ साली संस्था व वाचनालय आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये आले.दि.९ डिसेंबर १९८४ ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन भरविण्याचा मान संस्थेला मिळाला.१९८५-८६ साली रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला.१९८९-९० साली चेतना पुस्तकालयाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथालयाचा बाबा साहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला.त्याच वर्षी चेतना पुस्तकालयास ’ब’वर्ग मिळाला.३१जानेवारी १९९९रोजी कोकण विभाग

ग्रंथालय संघाचे अधिवेशन येथे संपन्न  झाले.दि.२६ नोव्हेंबर१९९९ रोजी शासनाने वाचनालयास ’अ’वर्ग बहाल केला.चेतना पुस्तकालयास २००४-५ साली दुस-यांदा बाबा साहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला.आज वाचनालयाची सभासद संख्या७५० असून एकूण ग्रंथ संपदा २३५००च्या वर आहे.वाचनालयात रोज २७ दैनिके येतात.त्याचप्रमाणे ११ साप्ताहिके,७ पाक्षिके,५६मासिके व७५ दिवाळी अंक येतात.

    मंडळाच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त स्वतंत्र संदर्भ ग्रंथ दालन.इंटरनेट सुविधेसह अभ्यास कक्ष सुरू करण्यात आला आहे..