patra


∆∆ पहिल्या पानावर जाण्यासाठी वर क्लिक करा ∆∆

माझं लिखाण

'मी' आणि 'ती'

१. पाउस

२. चारोळ्या

३. नेहमी नेहमी

४. दागिना

इतर

१. भेट

२. एखादी कविता

३. सुर्योदय

४. ध्यानस्थ दिवा

५. सरकारी कर्मचारी

६. भर कँपसमध्ये

७. तो वेडा क्षण

८. पत्र

९. ओहोटी

पत्र

To,
Dear _ _ _ ,

तुझ्याशिवाय...
रात्रीच्या चांदण्या अधु-या वाटतात,
तुझ्याशिवाय...
मनात आठवणींच्या द-या साठतात.
नाही-नाही समजावलं मनाला
तरी मागच्या आठवणींनी मन काठोकाठ भरलं,
विसरण्याचा नुसता प्रयत्न करता करताच
आता एक वर्ष सरलं.
मित्रांचे विनोद ऐकून, हसून-हसवून
आठवणी दाबण्याचा प्रयत्न करतो,
बरेचदा जिंकतो मी त्यात
पण एकदा हरलो की आठवडाभर हरतो.
बरेचदा, वेळ पुढे जात असते
नि मन उलटं वाहतं,
डोळे कोरडेच आहेत, पण कधीही आभाळ दाटून येईल,
असं वाटत राहतं.
आज १४ फेब्रुवारी २००५...
माझ्यासाठी वरीलप्रमाणे,
तुझ्यासाठी मात्र 'हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे'

(तुझ्याबद्दल माहीत नाही, पण मी तरी)
तुझा आणि फक्त तुझाच
आस
(प्लीज, हे नाव 'आसु' असं वाचू नकोस)