ohoti


∆∆ पहिल्या पानावर जाण्यासाठी वर क्लिक करा ∆∆

माझं लिखाण

'मी' आणि 'ती'

१. पाउस

२. चारोळ्या

३. नेहमी नेहमी

४. दागिना

इतर

१. भेट

२. एखादी कविता

३. सुर्योदय

४. ध्यानस्थ दिवा

५. सरकारी कर्मचारी

६. भर कँपसमध्ये

७. तो वेडा क्षण

८. पत्र

९. ओहोटी

ओहोटी

मनभरून हुंदक्यांचे तुकडे,
आवरता आवरत नाही...
वाटेचेच पाऊल जर पडे वाकडे,
सावरता सावरत नाही...
मनात माझ्या...
कधीकधी सावरासावर, सारवासारव कधीकधी,
मनात माझ्या...
कधीकधी आवराआवर, आरवाआरव कधीकधी...
मन मन पाणी पाणी
डोळा थेंबभर ओला नाही,
मन हलती पारंबी
जरी दिला कुणी झुला नाही...
मन भरूनिया आले, तरी का वाटे रिते रिते
ही कोणती आली ओहोटी,
जी भासते भरते...
ही कोणती आली ओहोटी,
जी भासते भरते...

-आस